Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Crime : घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक , शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत

सानपाडा परिसरात घरफोडी करून 21 लाख रुपयांचे दागिने चोरी केल्याची घटना घडली होती. याबाबत सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.मात्र त्यानंतर नवी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 19, 2025 | 02:27 PM
घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक , शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत

घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक , शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत

Follow Us
Close
Follow Us:
  • घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक
  • दोन गुन्ह्यांची उकल करून शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत
  • दोघांवर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात एकूण 7 गुन्हे दाखल
सावन वैश्य | नवी मुंबई: सानपाड्यात घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरून घेऊन जाणाऱ्या दोघांना, गुन्हे शाखा १ कक्षाने टिटवाळा येथून अटक केली आहे. इस्तियाख मोबीन अन्सारी आणि आरिफ शफिक अन्सारी हे दोघे सराईत गुन्हेगार असून, दोघांवर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात एकूण 7 गुन्हे दाखल आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी सानपाडा परिसरात घरफोडी करून 21 लाख रुपयांचे दागिने चोरी केल्याची घटना घडली होती. याबाबत सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा कक्ष एक ही समांतर तपास करत असताना, गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपी निष्पन्न केले. व त्या दिशेने तपास फिरवला असता विश्वसनीय गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सानपाडा येथील घरफोडीचे आरोपी हे टिटवाळा येथील बनेली या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली.

“रोली ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ अटक करा,” नवी मुंबई पोलिसांकडे मागणी

मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा कक्ष एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांनी सहाय्यक निरीक्षक बनकर, उपनिरीक्षक काकड, बोरुडे, सहाय्यक उपनिरीक्षक पवार, हवालदार चंद्रकांत कदम, अतिश कदम, साळुंखे, पोलीस नाईक मिर्झा, पोलीस शिपाई सचिन पाटील, सावरकर यांचे एक पथक स्थापन करून, टिटवाळा बनेली या ठिकाणी सापळा लावून आरोपी आरिफ शफिक अन्सारी, वय 34 वर्ष, व इस्तियाक मोबीन अन्सारी, वय 58 वर्ष, या दोघांना अटक करून त्यांच्या जवळून सानपाडा घरकुल येथील चोरीस गेलेल्या शंभर टक्के मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. आरोपी इस्तियाख मोबीन अन्सारी याच्यावर मुंबईतील 3 पोलीस ठाण्यात याआधी देखील गुन्हे दाखल आहेत. तर दुसरा आरोपी आरिफ शफिक अन्सारी याच्यावर मुंबईतील 4 पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

मोबाईल चोरीच्या संशयावरून चुलत भावाला मारहाण

नवी मुंबईत एका ३४ वर्षीय व्यक्तीला त्याच्या चुलत भावाने आणि त्याच्या सहकाऱ्याने मोबाईल चोरीच्या संशयावरून मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, आरोपी अर्जुन अडागळे (५५) याला त्याचा चुलत भाऊ सुधाकर पाटोळे याने त्याचा मोबाईल चोरल्याचा संशय होता. याचा बदला घेण्यासाठी त्याने गुरुवारी सकाळी विधान मंडल नावाच्या व्यक्तीसोबत मिळून त्याची हत्या केली. त्यांनी सुधाकर पाटोळे यांना सार्वजनिक शौचालयात नेले, जिथे त्यांनी दारू पाजली आणि नंतर त्यांना बेदम मारहाण केली, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर दोघेही घटनास्थळावरून पळून गेले.

Jalgaon Crime: जळगाव रेल्वे रुळ प्रकरणाचा उलगडा; अपघात नव्हे, पूर्वनियोजित खून! एक आरोपी अटकेत

Web Title: Navi mumbai crime two skilled burglars arrested one hundred percent of the stolen goods recovered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 02:27 PM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • police

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : “रोली ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ अटक करा,” नवी मुंबई पोलिसांकडे मागणी
1

Navi Mumbai Crime : “रोली ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ अटक करा,” नवी मुंबई पोलिसांकडे मागणी

Jalgaon Crime: जळगाव रेल्वे रुळ प्रकरणाचा उलगडा; अपघात नव्हे, पूर्वनियोजित खून! एक आरोपी अटकेत
2

Jalgaon Crime: जळगाव रेल्वे रुळ प्रकरणाचा उलगडा; अपघात नव्हे, पूर्वनियोजित खून! एक आरोपी अटकेत

Nagpur Crime: एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन विद्यार्थिनीवर हातोड्याने जीवघेणा हल्ला; आरोपी अटक
3

Nagpur Crime: एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन विद्यार्थिनीवर हातोड्याने जीवघेणा हल्ला; आरोपी अटक

Uttarpradesh Crime: पत्नी प्रियकरासोबत अंथरुणात नको त्या अवस्थेत आढळली, दोघांनी मिळून लॉयल पतीला…
4

Uttarpradesh Crime: पत्नी प्रियकरासोबत अंथरुणात नको त्या अवस्थेत आढळली, दोघांनी मिळून लॉयल पतीला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.