crime (फोटो सौजन्य : social media)
बीड:बीड तालुक्यातून एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. 6 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप राष्ट्रवादी छत्रपती संभाजीनगर शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांचे स्वीय सहाय्यक नयन शेजूळ यांच्यावर करण्यात आलं आहे. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
आई वडील….; आधी बनवला ह्रदयस्पर्शी व्हिडिओ नंतर तरुणाने संपवले जीवन
अधिकची माहिती अशी की, नयन शेजूळ याने आमदार निधितूम किंवा जिल्हा परिषदेमार्फत काम मिळवून देतो, असे म्हणत सरपंच पती उत्तरेश्वर खताळ यांच्याकडून 6.70 लाख रुपये घेतले पैसे मिळाल्यानंतर शेजूळ याने सतत टाळाटाळ केली आणि कोणतेही काम केले नाहीत. फसवणुकीदरम्यान शेजुळ याने बनावट ई-मेल तयार करून त्याद्वारे खताळ यांना विश्वासात घेतले. या ई-मेलमध्ये काम मंजूर झाल्याचे खोटे दाखवून त्यांनी रकमेची मागणी केली होती. विश्वास ठेवून खताळ यांनी पैसे ही दिले, मात्र प्रत्यक्षात कोणतेही काम मंजूर झाले नव्हते हे समोर आले. तेव्हा फसवणूक झाल्याचे समजले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच उत्तरेश्वर खताळ यांनी बीड शहर पोलीस ठाणे गाठले आणि शेजुळविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणामुळे आमदाराच्या स्वीय सहाय्यकावरच फसवणुकीचा आरोप झाल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, आमदार विक्रम काळे यांची या प्रकरणावर भूमिका काय असेल? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Walmik Karad : वाल्मिक कराडची अचानक प्रकृती बिघडली; रक्तदाबाचा त्रास होऊनही ॲडमिट का केलं नाही?
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. दरम्यान यां हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सध्या तुरुगांत असून त्याची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे. मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास जाणवत होता. शनिवारी रात्री वैद्यकीय पथकाकडून त्याची तपासणी करण्यात आली मात्र त्याला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट न करता उपचार करण्यात आल्याची माहिती आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून सध्या ते बीडच्या तुरुंगात आहेत. वाल्मिक कराडने तुरुंगात असताना अनेकदा प्रकृती ठीक नसल्याचे कारण दिले आहे. आता शनिवारी पुन्हा एकदा त्याची प्रकृती बिघडली होती. त्याला मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास जाणवत होत असल्याचं वृत्त होतं.
डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग, तर लॉजच्या नावाखाली कुंटणखाना…; मोहोळमध्ये चाललयं काय?