Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Neral News: मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, ₹4.78 लाखांचा मुद्देमाल जप्त

Neral News Marathi: रायगड जिल्ह्यातील नेरळ पोलिसांनी मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत रायगडमधील चार आणि नवी मुंबईतील एका गुन्ह्याचा उलगडा झाला असून, सुमारे ₹4.78 लाखांचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 30, 2026 | 05:14 PM
मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, ₹4.78 लाखांचा मुद्देमाल जप्त

मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, ₹4.78 लाखांचा मुद्देमाल जप्त

Follow Us
Follow Us:
  • मोबाईल टॉवर मधील बॅटरी चोरणाऱ्या टोळीला अटक..
  • पाच गुन्हे उघड, दोन आरोपी गजाआड
  • ₹4.78 लाखांचा मुद्देमाल जप्त
कर्जत: रायगड जिल्हा पोलिसांच्या नेरळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत रायगड जिल्ह्यातील चार आणि नवी मुंबईतील एका अशा एकूण पाच गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला असून, चोरीस गेलेल्या सुमारे ₹4.78 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नेरळ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. या कारवाईत रबीउलइस्लाम तामजुइस्लाम शेख (वय 45) याला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने साथीदारांच्या मदतीने रायगड आणि नवी मुंबई परिसरातील मोबाईल टॉवरमधून बॅटऱ्या चोरी केल्याची कबुली दिली. तपासात सोनू, आवेस, ‘चिनीदादा’ आणि वृषभ धनराज जैन यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचेही समोर आले आहे.

तरुणासह त्याच्या आई-वडिलांना बेदम मारहाण; धक्कादायक कारणही आलं समोर

तपासात या टोळीने नेरळ, खालापूर, पेण (रायगड) तसेच नवी मुंबई परिसरातील विविध मोबाईल टॉवरमधून बॅटऱ्या चोरी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून 144 बॅटऱ्या फोडून त्यातील सुमारे 1,800 किलो वजनाचे शिसे (Lead) जप्त करण्यात आले. तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेले वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत वरक, सुशील काजरोळकर, पोलीस हवालदार एस. एम. वाघमारे, आर. बी. केकान, व्ही. आर. वांगणेकर आणि ए. बी. बेंद्रे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. रायगड पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे मोबाईल टॉवर बॅटरी चोरी करणाऱ्या टोळ्यांवर प्रभावी आळा बसण्यास मदत होणार असून, जिल्ह्यात अशा प्रकारच्या गुन्ह्यांविरोधात भविष्यातही कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Rapido RTO Action: रॅपिडो कंपनीच्या संचालकांवर संभाजीनगरात थेट गुन्हा दाखल! अनधिकृत प्रवासी वाहतूक प्रकरणी आरटीओचा मोठा दणका

Web Title: Neral police bust mobile tower battery theft gang five cases solved raigad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 05:14 PM

Topics:  

  • maharashtra
  • neral
  • police

संबंधित बातम्या

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत
1

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
2

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न
3

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न

Ladki Bahin Yojana: ‘योजनेत हा १० लाखांचा घोळ…’, सुप्रिया सुळे यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेबद्दल केला धक्कादायक खुलासा
4

Ladki Bahin Yojana: ‘योजनेत हा १० लाखांचा घोळ…’, सुप्रिया सुळे यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेबद्दल केला धक्कादायक खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.