Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyber Crime : सावधान! सायबर फसवणुकींचे नवे डावपेच, सर्वसामान्यांवर वाढता धोका, कशी घ्याल काळजी? जाणून घ्या

Cyber Crime News : घोटाळेबाज आता अत्यंत नेमकेपणाने कुरियर कंपनीपासून ते पेमेंट गेटवेपर्यंत कोणीही असल्याचे नाटक करू शकतात, यामधून स्वत:ची काळजी कशी घ्याल ते जाणून घ्या...

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 20, 2025 | 06:46 PM
सावधान! सायबर फसवणुकींचे नवे डावपेच, सर्वसामान्यांवर वाढता धोका, कशी घ्याल काळजी? जाणून घ्या

सावधान! सायबर फसवणुकींचे नवे डावपेच, सर्वसामान्यांवर वाढता धोका, कशी घ्याल काळजी? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • सायबर फसवणुकींचे नवे डावपेच
  • सर्वसामान्यांवर वाढता धोका
  • फेडएक्सन दिला सल्ला
मुंबई : सायबर गुन्हे आपल्याला कल्पनाही येणार नाही, इतक्या वेगाने बदलत चालले आहेत. तसेच घोटाळेबाज आता अत्यंत नेमकेपणाने कुरियर कंपनीपासून ते पेमेंट गेटवेपर्यंत कोणीही असल्याचे नाटक करू शकतात. एखादा खोटा डिलिव्हरी मेसेज, छोट्या पेमेंटची मागणी करणारी एक लिंक किंवा ओटीपी मागणारा कॉल एवढ्यानेही आपण त्यांच्या डिजिटल सापळ्यात अडकत असल्याचे फेडएक्सने निदर्शनास आणले. जर तुम्हाला नुकताच एखादा मेसेज किंवा व्यवहार संशयास्पद असल्याचे जाणवले असेल, तर तुम्ही असे काय केले पाहिजे, जे योग्य असेल? झटपट कार्यवाही केल्यामुळे नुकसान कमी करता येते आणि इतरांचे रक्षण करता येते.

कुत्र्याला पाहून इलेक्ट्रिशियन कामगार घाबरला; पळताना तिसऱ्या मजल्यावरून पडला अन्…

यावर फेडएक्सचा सल्ला आहे की , जर एखादा ठग संशयास्पद नंबर, ईमेल किंवा सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून तुमच्याशी संपर्क साधत असेल, तर सर्वप्रथम त्या संवादाला तात्काळ पूर्णविराम द्या आणि कोणतीही प्रतिक्रिया न देता संबंधित अकाउंट ब्लॉक करा. कोणत्याही परिस्थितीत ओटीपी, कार्ड नंबर, पासवर्ड किंवा कोणतीही संवेदनशील माहिती शेअर करू नये. आणि जर ती चुकून शेअर झाली असेल, तर लगेच आपल्या बँकेशी संपर्क साधून कार्ड ब्लॉक किंवा खाते फ्रीझ करून घ्यावे. याशिवाय, संशयास्पद संदेश, ईमेल, ट्रान्झॅक्शन आयडी आणि संपर्क क्रमांकांचे स्क्रीनशॉट सुरक्षित ठेवावेत, कारण ते पुढील तपासणी आणि तक्रार प्रक्रियेत अत्यंत उपयुक्त ठरतात. तसेच, आपल्या बँक आणि युपीआय अॅपमधील अलीकडील सर्व व्यवहारांची तपासणी करणे आवश्यक आहे. जर कुठलीही संशयास्पद नोंद आढळली, तर संबंधित अॅपद्वारे त्वरित तक्रार नोंदवा किंवा कस्टमर केअरला कळवा.

कुठे आणि कशी करावी तक्रार

फेडएक्सच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही प्रकारच्या सायबर फसवणुकीच्या प्रसंगी त्वरित तक्रार नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सर्वप्रथम १९३० या राष्ट्रीय सायबर फसवणूक हेल्पलाइनवर कॉल करावा, जी वित्तीय फसवणूक प्रकरणांमध्ये तत्काळ मदत उपलब्ध करून देते. तसेच, सायबरक्राईमडॉटजीओव्हीडॉटइन या संकेतस्थळावर “रिपोर्ट अदर सायबर क्राईम” या विभागात फिशिंग, सोशल मीडिया फसवणूक किंवा बनावट ओळख (इम्पर्सोनेशन) यांसारख्या प्रकरणांची तक्रार नोंदवता येते. याशिवाय, आपल्या बँक किंवा युपीआय अॅप जसे गूगल पे, फोनपे, पेटीएम यांना ताबडतोब कळवावे, कारण या सर्व प्लॅटफॉर्मवर ‘रिपोर्ट फ्रॉड’ हा पर्याय उपलब्ध आहे आणि त्याचा त्वरित वापर करणे गरजेचे आहे. जर आर्थिक नुकसान गंभीर असेल, तर जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर दाखल करावी, जेणेकरून पुढील तपास जलदगतीने पुढे जाऊ शकेल.

घोटाळा जितक्या लवकर पकडता येईल तितके चांगले, पण त्याची तक्रार नोंदवल्यामुळे इतरांना त्या सापळ्यातून वाचायला मदत होते. घोटाळेबाज बऱ्याचदा आपले लिखाण, लिंक आणि संपर्क नंबर वेगवेगळ्या शहरांत आणि प्लॅटफॉर्म्सवर पुन्हा पुन्हा वापरतात. त्यामुळे तुम्ही केलेली झटपट कृती पुढे बळी पडणाऱ्या संभाव्य व्यक्तीला वाचवू शकते. भारताच्या सायबर प्रतिसाद प्रणाली आता खूपच सशक्त आहेत. पण केव्हाही, जागरूकता हाच पहिला बचाव असतो. फेडएक्स आजच्या झपाट्याने बदलत चाललेल्या डिजिटल अर्थव्यवस्थेत उपभोक्ते, छोटे व्यापारी आणि समुदाय यांना सुरक्षितपणे कार्य करण्यासाठी मदत करणाऱ्या सायबर जागरूकता आणि शिक्षण उपक्रमांना पाठिंबा देण्यास वचनबद्ध आहे.

Kalyan Crime: हिंदी भाषेने घेतला अल्पवयीन विद्यार्थ्याचा जीव! लोकलमध्ये धक्का लागला अन् ‘हिंदी-मराठी’ वरून पेटला वाद

Web Title: New tactics of cyber fraud how to protect yourself from the growing threat to the common man what did fedex say

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 06:46 PM

Topics:  

  • crime
  • cyber crime
  • police

संबंधित बातम्या

PCMC Election Results 2026: पिंपरी-चिंचवडचा रणसंग्राम; ‘खाकी’चा कडा पहारा आणि प्रशासकीय शिस्तीचा कस!
1

PCMC Election Results 2026: पिंपरी-चिंचवडचा रणसंग्राम; ‘खाकी’चा कडा पहारा आणि प्रशासकीय शिस्तीचा कस!

Dharashiv Crime : व्याजाने रक्कम देणाऱ्या मित्राच्या घरी चोरी; तीन मित्र गजाआड, ७९,७८०चा मुद्देमाल जप्त
2

Dharashiv Crime : व्याजाने रक्कम देणाऱ्या मित्राच्या घरी चोरी; तीन मित्र गजाआड, ७९,७८०चा मुद्देमाल जप्त

Thane : धक्कादायक! पक्ष्याचा जीव वाचवताना जवानाचा जागीच गेला जीव; शॉक लागून एकाचा झाला मृत्यू
3

Thane : धक्कादायक! पक्ष्याचा जीव वाचवताना जवानाचा जागीच गेला जीव; शॉक लागून एकाचा झाला मृत्यू

Bihar Crime: लग्नाला महिना होत नाही तोच सासरी जावयाचा खून, जावई सासरी गेला आणि…; कारण काय?
4

Bihar Crime: लग्नाला महिना होत नाही तोच सासरी जावयाचा खून, जावई सासरी गेला आणि…; कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.