
crime (फोटो सौजन्य: social media)
प्लीज मला वाचवा, मला मरायचे नाहीये…
युवराज मेहता (२७) हा गुरुग्राममधील एका खासगी आयटी कंपनीत कार्यरत होता. तो दोन दिवसाची सुट्टी आहे घरी जाणार असे विचार करत तो निघाला. मात्र वाटेत तोल गेला आणि सेक्टर-150 मध्ये एका निर्माणाधीन मॉलच्या उघड्या बेसमेंटमध्ये युवराजची विटारा कार कोसळली. रिफ्लेक्टर नसल्याने युवराजला रस्त्यावरील त्या मृत्यूच्या सापळ्याचा अंदाज आला नाही. त्याला कार बेसमेंटमध्ये पडली आहे. आणि कार मध्ये पाणी शिरत आहे हे समजले. त्याने तातडीने आपल्या वडिलांना फोन केला. “पप्पा, मी खोल खड्ड्यात पडलो, मी बुडतोय… प्लीज मला वाचवा, मला मरायचे नाहीये,” अशी आर्त हाक मारली.
त्याच्या वडिलांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पोलिसांना कळवले. पोलीस आणि बचाव पथक तिथे पोहोचले. त्याचा वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले मात्र ढिल्ली सिस्टिम अन् मृत्यूच्या दारातून त्याला वाचवता आलं नाही.
विशेष चौकशी पथक गठीत
या प्रकरणाची सखोल तपासणीसाठी सरकारने तीन सदस्यीय विशेष चौकशी पथक म्हणजेच एसआयटी गठीत केलं आहे. या पथकामध्ये मेरठचे विभागीय आयुक्त, मेरठ झोनचे एडीजी आणि पीडब्ल्यूडीचे मुख्य अभियंता यांचा समावेश करण्यात आला आहे. हे पथक घटनेच्या मुळाशी जाऊन जबाबदारी निश्चित करण्याचे काम करणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशी पथकाला आपला अहवाल सादर करण्यासाठी केवळ 5 दिवसांची मुदत दिली आहे.या पाच दिवसात दोष कोणाचा? इंजिनिअरच्या मृत्यूस कारणीभूत कोण? हे सिद्ध होईल. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर अधिक कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मोठी कारवाई
या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून नोएडा प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) लोकेश एम यांना पदावरून हटवण्यात आले आहे. प्रशासकीय स्तरावर झालेली ही मोठी कारवाई मानली जात आहे. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Ans: उघड्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात कार पडून बुडाल्याने.
Ans: नोएडा प्राधिकरणाचे CEO हटवले, SIT स्थापन.
Ans: SIT ला 5 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश.