Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati Crime: २ तस्कर जेरबंद, १०४ किलो गांजा जप्त; ओडिशाच्या गांजातस्करीचा पर्दाफाश

अमरावती जिल्ह्यात गांजाची तस्करीत तब्बल १०४ किलो ८७९ ग्रॅम गांजा किंमत २० लाख ६६ हजार ९६०, तसेच ५.५० लाखांचे वाहन असा एकूण २६ लाख १६ हजार ९६० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 01, 2025 | 06:09 PM
२ तस्कर जेरबंद, १०४ किलो गांजा जप्त; ओडिशाच्या गांजातस्करीचा पर्दाफाश

२ तस्कर जेरबंद, १०४ किलो गांजा जप्त; ओडिशाच्या गांजातस्करीचा पर्दाफाश

Follow Us
Close
Follow Us:

  • गांजाची तस्करी करणाऱ्या २ आरोपींना अटक
  • २६ लाख १६ हजार ९६० किंमतीचा मुद्देमाल जप्त
  • पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहिती मिळाली
अमरावती : ओडिशा राज्यातून अमरावती जिल्ह्यात गांजाची तस्करी करणाऱ्या २ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या ग्रामीण पथकाने अटक केली. रवी रामराव राठोड (३६, रा. भिवापूर कुऱ्हा, ता. तिवसा) व आकाश गौतम भडके (३२, रा. वाई बोध, ता. नांदगाव खंडेश्वर) अशी आरोपींची नावे आहेत. या कारवाईत तब्बल १०४ किलो ८७९ ग्रॅम गांजा किंमत २० लाख ६६ हजार ९६०, तसेच ५.५० लाखांचे वाहन असा एकूण २६ लाख १६ हजार ९६० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

रूपाली पाटील आणि माधवी खंडाळकर दोघींवर पण गुन्हा दाखल ! मारहाणीवरून राजकारण

गुरुवारी (दि. ३०) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबूरकर पथकासह तिवसा हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहिती मिळाली. काही इसम नागपूरहून अमरावतीकडे अवैध गांजाची वाहतूक करीत आहेत. त्यानुसार, पोलिसांनी नागपूर-अमरावती हायवेवरील मोझरी दासटेकडी-डवरगाव उड्डाण पुलाखाली नाकाबंदी केली. दरम्यान, एक विनाक्रमांकांचे वाहन थांबविले असता त्यातील दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संशय आला. पोलिसांनी तपास केल्यावर वाहनात एमएच-१७/एजे-२२८३ आणि २ सीजी-१०/एबी-२८४९ अशा नंबरप्लेट आढळल्या.

सखोल चौकशीत आरोपींनी वाहनात गांजा लपविल्याचे कबूल केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे अमरावती जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांना मोठा धक्का बसला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत पोलिस उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर, सागर हटवार, अमोल देशमुख, बळवंत दाभणे, भूषण पेठे, सुधीर बावणे, मंगेश लकडे, सचिन मसांगे, पंकज फाटे, दिनेश कनोजिया, अरविंद गांवडे, महेश काळे, सायबरचे सागर धापड, विकास अंजीकर, शिवा शिरसाठ, तसेच चालक पोलीस हवालदार कैलास भागडकर, संजय प्रधान, नीलेश आवंडकर यांनी सहभाग घेतला.

गुप्त चेंबरमध्ये गांजाचा साठा

वाहनाच्या मागील बाजूच्या दोन्ही टेललाइटच्या आत, चालक व वाहकाच्या दरवाज्यांच्या खाली आणि वाहनाच्या चेंबरमध्ये तयार केलेल्या गुप्त कप्प्यांमध्ये एकूण ५३ खाकी टेपमध्ये गुंडाळलेले गांजाचे पुडे सापडले. या दोन्ही आरोपींवर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये तिवसा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. जप्त मुद्देमाल व आरोपींना तिवसा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Dawood Ibrahim: दाऊद इब्राहिमला मोठा दणका! 4 मालमत्तांचा ‘या’ तारखेला होणार लिलाव

Web Title: Odisha marijuana smuggling busted 2 smugglers arrested and 104 kg of marijuana seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 06:09 PM

Topics:  

  • amravati
  • crime
  • police

संबंधित बातम्या

JHANSI CRIME: 25 वर्षीय विवाहितेने विष प्राशन करून जीवन संपवलं, चार वर्षांच्या मुलाचा धक्कादायक खुलासा; पप्पाने आणि आत्याने…
1

JHANSI CRIME: 25 वर्षीय विवाहितेने विष प्राशन करून जीवन संपवलं, चार वर्षांच्या मुलाचा धक्कादायक खुलासा; पप्पाने आणि आत्याने…

Pune Crime: गोळीबार-कोयत्याच्या हल्ल्याचा मुख्य आरोपी अखेर गजाआड; पुणे पोलिसांचा गँगवरवर घाव
2

Pune Crime: गोळीबार-कोयत्याच्या हल्ल्याचा मुख्य आरोपी अखेर गजाआड; पुणे पोलिसांचा गँगवरवर घाव

Bihar Crime: प्रॉपर्टीच्या वादातून सुनेने रचला कट, सासऱ्याची केली निर्घृण हत्या; चार आरोपी अटकेत
3

Bihar Crime: प्रॉपर्टीच्या वादातून सुनेने रचला कट, सासऱ्याची केली निर्घृण हत्या; चार आरोपी अटकेत

Kolhapur: जयसिंगपूरमधील तरुण दंतचिकित्सकाने संपवले जीवन, पाठीवरच्या बॅगेत दगड भरले आणि…
4

Kolhapur: जयसिंगपूरमधील तरुण दंतचिकित्सकाने संपवले जीवन, पाठीवरच्या बॅगेत दगड भरले आणि…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.