अमरावती: अमरावतीतून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचे धक्कदायक घटना समोर आली आहे. त्याच्या चेहऱ्यावर राफ्टरने वार करून त्याला ठार मारण्यात आलं. ही घटना पथ्रोट येथील झेंडा चौक येथे मंगळवारी रात्री 10:45 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मृतकाचे नाव अरविंद नजीर सुरत्ने असे आहे. याप्रकरणी पथ्रोट पोलिसांनी ३ सेप्टेंबरला पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास महिलेसह तिच्या प्रियकराविरुद्ध खून व ॲट्रासिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी प्रियकराला मंगळवारी अटक करण्यात आली. तर महिलेला बुधवारी अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे.
अमली पदार्थ खरेदी व्यवहारातून वाद; टोळक्याकडून तरुणांवर तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार
नेमकं काय घडलं?
अरविंद हा व्यवसायाने चालक आहे. त्याचा प्रेमविवाह झाला होता. तो पत्नी व दोन मुलांसमवेत झेंडा चौक परिसरात भाड्याने राहत होता. २ सप्टेंबर रोजी रात्री ११: ४५च्या सुमारास मृतकाचा मोठा भाऊ फिर्यादी अशोक हे परतवाडा येथे असतांना त्यांच्या भाचा अनिलने त्यांना फोन केला. अरविंद मामा व मामी यांच्यात अमित मिश्रा याच्याशी असलेल्या प्रेमसंबंधामुळे कडाक्याचा वाद झाला. यातूनच हत्या झाल्याचे अनिलने फोनवरून सांगितले. त्या दोघांनीच अरविंदला मारून टाकल्याचे अशोक सुरत्ने यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत सांगितले आहे. लाकडी राफ्टरने अरविंदच्या चेहऱ्यावर वार करण्यात आले त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे.
अरविंद यांना 7 व 5 वर्षांची दोन मुले आहेत. त्यांना आपल्या पत्नीच्या प्रेमसंबंधांची कुणकुण लागली होती. दोन दिवसांपूर्वी अरविंद यांच्या घरचे गॅस सिलिंडर संपले होते. त्यावेळी पत्नीच्या प्रियकराने म्हणजे आरोपी अमितने ते भरून आणले होते. ती गोष्टी अरविंद यांना समजल्यानंतर त्यांनी पत्नीला याबाबत जाब विचारला. आरोपीने आणून दिलेल्या सिलिंडरमुळे त्यांच्यातील वाद अधिक वाढला. २ सप्टेंबरला रात्री अरविंद व त्यांच्या पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. ती बाब तिने आरोपीला सांगितली. आरोपी प्रियकर अरविंदच्या घरी पोहोचला. दोघांनी मिळून अरविंदचा खून केला.अरविंद यांची पत्नी आरोपीकडे स्वयंपाकाचे काम करायची. आरोपी अविवाहित आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने देखील पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या. पती पत्नीत आरोपीने आणून दिलेल्या सिलिंडरवरून वाद सुरू झाला होता. मारेकऱ्याला मंगळवारी रात्रीच अटक केली. तर, महिलेला बुधवारी अटक केली. न्यायालयाने दोन्ही आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
Ratnagiri Crime: तिहेरी हत्याकांडाने रत्नागिरी हादरली! बारमध्येच रचले खुनाचे कट; सीरिअल किलर अटकेत