Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Accident : नवीन कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात, कंटेनरवर कार आदळली अन्…

नवीन कात्रज बोगद्याजवळ कंटेनरवर कार आदळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. अपघातात कारमधील दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी कंटेनर चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 03, 2026 | 06:00 PM
नवीन कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात, कंटेनरवर कार आदळली अन्...

नवीन कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात, कंटेनरवर कार आदळली अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : नवीन कात्रज बोगद्याजवळ कंटेनरवर कार आदळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. अपघातात कारमधील दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी कंटेनर चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रघुनाथ मारुती घारे (वय ५५, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. अपघातात घारे यांचे नातेवाईक संजय चाळके, नात गाथा हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

याप्रकरणी कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी चालक प्रदीपकुमार कल्पनाथ प्रजापती (वय ३, रा. कुरली फाटा चाकण) याला ताब्यात घेतले आहे. याबाबत कारचालक रोहित रघुनाथ घारे (वय २५, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, कारचालक रोहित घारे, त्यांचे वडील रघुनाथ, वडिलांचे मामा संजय चाळके, तसेच भाची गाथा हे गुरुवारी (३० एप्रिल) दुपारी कारने मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरुन निघाले होते. नवीन कात्रज बोगदा येथून जात होते. तेव्हा भरधाव कंटेनरने अचानक मार्गिका बदलली. कंटेनर चालकाने ‘इंडिकेटर’ दाखविला नाही. त्यामुळे कंटनेरच्या एका बाजूवर कार आदळली. कारमधील प्रवासी गंभीर जखम झाले. चालक चालक रोहित यांना दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी अपघातग्रस्त कारमधील चौघांना बाहेर काढले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल झाले. गंभीर जखमी झालेले कारमधील प्रवासी रघुनाथ घारे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपनिरीक्षक लक्ष्मण डोईफोडे अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : ग्रामीण भागात गॅसपुरवठ्यात विलंब, ग्राहकांमध्ये नाराजी; 25 दिवसांत सिलिंडर देण्याची मागणी

मद्यधुंद कारचालकांने दोन दुचाकींना उडवले

गेल्या काही दिवसाखाली मद्यधुंद अवस्थेतील कार चालकाने समोरून येणाऱ्या दोन दुचाकीना जोरदार धडक दिली आहे. या भीषण अपघातात एका दुचाकीवरील दोघांचा जागीच मूत्यू झाला आहे. तर दुसऱ्या एका दुचाकीवरील एका महिलेसह दोघे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर सासवड येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. रविंद्र गोपाळ काकडे (वय ६५) आणि महेद्र संपत काकडे( वय ५३, दोघेही रा. पांगारे ता. पुरंदर) अशी अपघात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर तुकाराम जयवंत पोमण (वय ६०) आणि सुरेखा तुकाराम पोमण (वय ५०, दोघेही रा. पिंपळे, ता. पुरंदर) हे पती पत्नी गंभीर जखमी आहेत. याप्रकरणी कारचालक अक्षय सुहास परख ( वय ३०, रा. अँमेनोरा हडपसर पुणे. मुळ रा. नेहापुजा कोऑपरेटीव्ह सोसायटी मिटानगर, गोरेगाव वेस्ट मुबई) याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रकाश राजाराम काकडे (वय ४०, रा पांगारे) यांनी सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Web Title: One person has died in a horrific accident near the new katraj tunnel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 06:00 PM

Topics:  

  • Accident Death
  • Accident News
  • crime news

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.