Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyber Crime: पुण्यात सायबर चोरट्याचं जाळ झालं घट्ट; ‘या’ प्रकारांच्या मदतीने केली जाते सर्वाधिक फसवणूक

सांस्कृतिक शहरातील स्ट्रीट गुन्हेगारीपेक्षा भयावह परिस्थिती सायबर गुन्ह्यांची झाली आहे. फक्त, सायबर गुन्हेगार वैयक्तिक संदंर्भात असल्याने तिची भिषणता तितकी सध्या तरी दिसत नाही किंवा पाहिली जात नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 20, 2024 | 02:35 AM
Cyber Crime: पुण्यात सायबर चोरट्याचं जाळ झालं घट्ट; 'या' प्रकारांच्या मदतीने केली जाते सर्वाधिक फसवणूक

Cyber Crime: पुण्यात सायबर चोरट्याचं जाळ झालं घट्ट; 'या' प्रकारांच्या मदतीने केली जाते सर्वाधिक फसवणूक

Follow Us
Close
Follow Us:

पुणे/ अक्षय फाटक: पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील ६५ हजार नागरिकांना वर्षाच्या आत ११०० कोटींहून अधिक गंडा घालणाऱ्या सायबर चोरट्याचं जाळ अधिक घट्ट होऊ लागलं असून, यंदाचे वर्ष शेअर मार्केट, गुंतवणूकीवरील जादा नफा, वर्क फ्रॉर्म होम, टास्क फ्रॉड या चार प्रकारात सर्वाधिक फसवणूक केल्याचे पोलीस दप्तरी दाखल झालेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. तर ‌वर्षानुवर्षे सुरू असलेला डेबीड कार्ड तसेच सेक्सस्टॉर्शन फसवणूकही सुरूच असून, त्यात देखील तक्ररी वाढत असल्याचे दिसत आहे.

सांस्कृतिक शहरातील स्ट्रीट गुन्हेगारीपेक्षा भयावह परिस्थिती सायबर गुन्ह्यांची झाली आहे. फक्त, सायबर गुन्हेगार वैयक्तिक संदंर्भात असल्याने तिची भिषणता तितकी सध्या तरी दिसत नाही किंवा पाहिली जात नाही. मात्र खऱ्या अर्थाने हे गुन्हेगार थेट आर्थिकनुकसान करत असल्याने पुर्ण आयुष्याची घडी विसकटली जात आहे. त्यासोबतच मानसिक त्रास देखील प्रचंड सहन करावा लागतो. कुटूंबाला ही धग सोसावी लागत असल्याचे काही प्रकरणातून समोर आलेले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, बहुंताश सायबर गुन्हे देशातून घडतात, तर काही परदेशातून. धक्कादायक म्हणजे, काही प्रकरणातील रक्कम ही देशाबाहेर जात असल्याचेही समोर आले आहे. तसेच हैद्राबाद पोलिसांनी एका गुन्ह्याचा तपास करताना त्यातील रक्कम ही जागतिक दहशतवादी संघटनेला गेल्याचे समोर आणले होते. त्यामुळे सायबर गुन्हेगारीकडे रस्त्यावरील गुन्हेगारीपेक्षाही गांर्भियतेने पहावे लागणार आहे. यात पोलिसींग स्मार्ट करावी लागणार तर आहेच, पण नागरिकांनी देखील सतर्कता बाळगावी लागणार आहे. त्यानंतरच हे गुन्हे कमी होऊ शकणार असल्याचे पोलीस सांगतात.

वर्षभरात दोन जिल्हा भरातील ६५ हजार नागरिकांकडून तब्बल ११५० कोटींची रक्कमेची फसवणूक झाली आहे. विशेष म्हणजे, हे पोलिसांपर्यंत आलेल्या तक्रारींचा आकडा आहे. पोलिसांकडे भितीपोटी न आलेल्या नागरिकांची संख्या वेगळीच म्हणता येईल.

हेही वाचा: Cyber Crime: पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल १,१६१ कोटींचा सायबर फ्रॉड; गुन्हेगारीसाठी ‘या’ पॅटर्नचा सर्वाधिक वापर

यंदा सर्वाधिक सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींचे प्रकार…

१) शेअर मार्केट, गुंतवणूक, पॉलिसी फ्रॉड

२) ऑनलाईन काम, वर्क फ्रॉर्म होम, टास्क फ्रॉड

३) फिशींग कॉल, लिंकद्वारे फ्रॉड, फेक नावाने कॉल

४) डेबीड, क्रेडिट कार्ड, क्लोन कार्ड व ओटीपी शेअरद्वारे झालेले फ्रॉड

५) इतर सायबर` फ्रॉड

६) सेक्सस्टॉर्शन

शेअर मार्केटच्या फसवणूकीत जवळपास दीडशे कोटींची फसवणूक झाल्याचे सांगण्यात येते. यंदा सर्वाधिक सायबर गुन्हेगारांनी या फ्रॉडद्वारे नागरिकांची फसवणूक केली आहे. त्यानंतर टास्क फ्रॉड तसेच वर्क फ्रॉर्म होम व ऑनलाईन काम देण्याच्या बहाण्याने फसवणूक झाली आहे. तसेच डिजीटल अॅरेस्ट हा नवीनच प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सायबर गुन्हेगारीत पाहिला मिळत आहे.

हेही वाचा: Cyber Crime: ६५ हजार पुणेकर सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात..! तक्रारीत 15 टक्क्यांनी वाढ, कोटींची फसवणूक

वर्षभरातील सायबर फ्रॉडमधील रक्कम

पिंपरी-चिंचवड—२७ हजार तक्रारी – ४२९ करोड

पुणे शहर—३८ हजार तक्रारी – ६६९ करोड

पुणे ग्रामीण- फसवणूक रक्कम ६४ कोटी

Web Title: Online fraud scammer crime with people with share market wfh and task fraud option crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2024 | 02:35 AM

Topics:  

  • cyber crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

चौकशीबद्दल कोणाशी बोलू नकोस, अन्यथा…; अमेरिकेतील भारतीयाला 45 लाखांना घातला गंडा
1

चौकशीबद्दल कोणाशी बोलू नकोस, अन्यथा…; अमेरिकेतील भारतीयाला 45 लाखांना घातला गंडा

अमली पदार्थ तस्करांच्या आवळल्या मुसक्या, तब्बल 76 लाखांचे मेफेड्रॉन जप्त; वाघोलीत पोलिसांची मोठी कारवाई
2

अमली पदार्थ तस्करांच्या आवळल्या मुसक्या, तब्बल 76 लाखांचे मेफेड्रॉन जप्त; वाघोलीत पोलिसांची मोठी कारवाई

पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या; पुण्यातील कात्रज भागात सापळा रचून पकडले
3

पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या; पुण्यातील कात्रज भागात सापळा रचून पकडले

पुण्यातील लोहगाव भागात टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला; तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार
4

पुण्यातील लोहगाव भागात टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला; तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.