Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gauri Garje Case:’नाहीतर मी वरळी पोलिस ठाण्यासमोर फाशी घेणार…’; गौरी गर्जेच्या आईच्या प्रतिक्रीयेमुळे प्रकरण चिघळणार

गौरीच्या मृत्यूबाबत तिच्या कुटुंबीयांनी सुरुवातीपासूनच संशय व्यक्त केला. अनंत गर्जे, त्याचा भाऊ अजय गर्जे आणि नणंद शीतल आंधळे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी त्यांनी कायम ठेवली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 25, 2025 | 05:04 PM
गौरी गर्जेच्या आईचा थेट इशारा

गौरी गर्जेच्या आईचा थेट इशारा

Follow Us
Close
Follow Us:
  • आम्ही येईपर्यंत आमच्या मुलीला आम्ही येईपर्यंत तशीच ठेवायला हवे होते
  • आमचं लेकरू गेलं, आम्ही कोणाला फोन का करावा
  • तू खरं बोललास तर तुला माफ करेन
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी व डॉक्टर गौरी पालवे-गर्जे यांनी शनिवारी राहत्या घरी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली होती. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या कटू आठवणी आजही ताज्या असतानाच आता गौरीच्या आत्महत्येमुळे राज्यभरातून पुन्हा संतापाची लाट उसळली आहे. गौरी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अनंत गर्जे, त्याचा भाऊ अजय गर्जे आणि नणंद शीतल आंधळे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. गौरीवर मानसिक आणि कौटुंबिक स्तरावर ताण आणल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून अनेक महत्त्वाचे धागेदोरे तपास अधिकाऱ्यांच्या हातात लागल्याची माहिती समोर येत आहे.

Gauri Garje Case: लग्नापूर्वीच गौरीच्या कुटुंबियांना अनंत गर्जेंच्या प्रेमसंबंधाची माहिती; गर्जेंच्या वकिलाचा कोर्टात दावा

या पार्श्वभूमीवर गौरी यांच्या आईनेही त्यांच्या मुलीले झालेल्या त्रासाबद्दल आणि घडलेल्या घटनेबद्दल त्यांच्या वेदना व्यक्त केल्या. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गौरीच्या मृत्यूवर संशय व्यक्त करत, आम्ही येईपर्यंत आमच्या मुलीला आम्ही येईपर्यंत तशीच ठेवायला हवे होते, असं म्हणत गौरी यांच्या आईने संतापही व्यक्त केला आहे. गौरी यांच्या आई म्हणाल्या, “गौरीने खरंच आत्महत्या केली असेल, तर अनंतने तिचा मृतदेह तसाच ठेवायला हवा होता. त्याने मुलीला हात कसा लावला? तो डॉक्टर होता का?” असा प्रश्न उपस्थित केला. तसेच, “माझ्या मुलीने आत्महत्या केली होती तर आम्ही पोहोचेपर्यंत तिला तसेच ठेवायला हवे होते.” असंही त्यांनी सांगितलं. त्याचवेळी ‘ गौरीच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

“आमचं लेकरू गेलं, आम्ही कोणाला फोन का करावा?” — गौरीच्या आईचा सवाल

डॉ. गौरी पालवे गर्जे यांच्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडाली असून या प्रकरणात गौरीच्या आईने जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. तपासाच्या घडामोडींबाबत आणि आरोपांवरून चर्चा सुरू असताना, “या प्रकरणावर तुम्ही पंकजा मुंडेंशी संपर्क केला का?” असा सवाल विचारला असता त्यांनी भावनिक होत संतप्त प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या,“आम्ही त्यांच्याशी संपर्क का करावा? आमचं लेकरू गेलंय. तुम्हाला मुलगा जवळचा की सून? यावर मला काहीच बोलायचं नाही… पण माझ्या लेकराला मारलं. मला न्याय पाहिजे. मला या तिघांना शिक्षा झालेली बघायची आहे. मी एकालाही सोडणार नाही.”

गौरीच्या मृत्यूबाबत तिच्या कुटुंबीयांनी सुरुवातीपासूनच संशय व्यक्त केला आहे. अनंत गर्जे, त्याचा भाऊ अजय गर्जे आणि नणंद शीतल आंधळे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी त्यांनी कायम ठेवली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून गौरीच्या मृत्यूमागील कारणांबाबत अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत.

Gauri Garje News: डॉ. गौरी गर्जेच्या आत्महत्या प्रकरणाची सेटलमेंट; वरळी पोलिस स्टेशनमध्ये आलेला ‘तो’ व्यक्ती कोण?

“न्याय न मिळाल्यास वरळी पोलीस ठाण्यासमोर फाशी घेईन” — गौरीच्या आईची भावनिक प्रतिक्रिया

डॉ. गौरी पालवे गर्जे यांच्या मृत्यूप्रकरणात कुटुंबीयांनी गंभीर आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली असताना, गौरीच्या आईने आता थेट आत्महत्येचा इशारा दिला आहे. “ तुमची पुढील भूमिका काय असेल?” असा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या: “आज मी पत्रकार परिषद घेणार आहे. पुढची भूमिका उद्या किंवा परवा ठरवणार आहे. जर माझ्या मुलीला न्याय मिळाला नाही, तर मी वरळी पोलीस ठाण्याबाहेर फाशी घेणार आहे.” पण त्यांच्या प्रतिक्रियांमुळे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

“अनंत गर्जे खूप खोटं बोलतो. माझं लेकरू गेलं… आता मी तरी जगून काय करू? तू खरं बोललास तर तुला माफ करेन, पण तू खरं बोल. मला खोटं बोलणारे आवडत नाहीत. हा भामटा वकील लावून खोटं बोलतो.” गौरीच्या आईने केलेल्या या गंभीर टिप्पणींनी प्रकरणात भावनिक आणि नाट्यमय वळण आले आहे. दरम्यान, गौरीच्या मृत्यूमागील कारणांचा तपास सुरू असून आरोपांच्या अनुषंगाने पोलीस पुढील पुरावे व माहिती गोळा करत आहेत.

 

Web Title: Otherwise i will hang myself in front of worli police station gauri garjes mothers direct warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 05:04 PM

Topics:  

  • Mumbai crime news
  • Mumbai Police
  • Pankaja Munde
  • Sucide News

संबंधित बातम्या

आत्महत्या की हत्या? पोलीस उपनिरीक्षकाने विषप्राशन करून संपवले जीवन; कारण अद्याप गूढ
1

आत्महत्या की हत्या? पोलीस उपनिरीक्षकाने विषप्राशन करून संपवले जीवन; कारण अद्याप गूढ

Tata Hospital Bomb Threat : बॉम्ब धमक्यांची मालिका सुरूच, टाटा कॅन्सर मेमोरिअल हॉस्पिटलला धमकीचा मेल; पोलिसांचा हायअलर्ट
2

Tata Hospital Bomb Threat : बॉम्ब धमक्यांची मालिका सुरूच, टाटा कॅन्सर मेमोरिअल हॉस्पिटलला धमकीचा मेल; पोलिसांचा हायअलर्ट

भाजपच्या हातून परळी निसटली? पंकजा मुंडेंच्या ‘या’ वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
3

भाजपच्या हातून परळी निसटली? पंकजा मुंडेंच्या ‘या’ वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.