Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: पैठणमध्ये एसटीची दुचाकीला जोरदार धडक; बाप-लेकीसह तिघांचा दुर्दैवी अंत

दुचाकीवर तिघे निघाले होते... पण काही क्षणांतच काळाने घाला घातला. एसटी बसने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली आणि पाच वर्षांच्या चिमुकलीसह तिच्या वडिलांचा आणि आणखी एका व्यक्तीचा दुर्दैवी अंत झाला. या भीषण अपघाताने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 05, 2026 | 11:42 AM
Accident News: पैठणमध्ये एसटीची दुचाकीला जोरदार धडक; बाप-लेकीसह तिघांचा दुर्दैवी अंत

Accident News: पैठणमध्ये एसटीची दुचाकीला जोरदार धडक; बाप-लेकीसह तिघांचा दुर्दैवी अंत

Follow Us
Follow Us:
  • एसटीच्या धडकेत बाप-लेकीसह तिघांचा जागीच मृत्यू
  • कापड दुकानासमोर दुचाकीला पाठीमागून बसची जोरदार धडक
  • पैठण पोलिसांकडून अपघातग्रस्त एसटी बस ताब्यात
 

पैठण : दुचाकीवरून तिघे जण निघाले होते… मात्र काही क्षणांतच एसटी बसने मागून जोरदार धडक दिली आणि तिघांचाही जीव गेला. पैठण शहरातील एका कापड दुकानासमोर झालेल्या भीषण अपघातात पाच वर्षांच्या चिमुकलीसह तिचे वडील आणि आणखी एका नातेवाइकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दुचाकीला बसची पाठीमागून जोरदार धडक

मृतांमध्ये कृष्णा अशोक गायकवाड (वय २५), त्यांची पाच वर्षांची मुलगी छकुली कृष्णा गायकवाड आणि अशोक गणेश भालेराव यांचा समावेश आहे. कृष्णा गायकवाड आणि अशोक भालेराव हे दोघे सख्खे साडू होते. दोघेही छकुलीसह दुचाकीवरून पैठण येथून आगरनांदरकडे निघाले होते.  दरम्यान, छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक दोनची एसटी बस (एमएच ०६, बीएल ४३६९) पैठण शहरातून मार्गस्थ होत होती. शहरातील एका कापड दुकानासमोर बसने त्यांच्या दुचाकीला (एमएच २०, जीए २९७९) पाठीमागून जोरदार धडक दिली.

हेही वाचा: पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सात राऊंड फायरिंगनंतर मारेकऱ्यांपैकी एक जखमी? संतोष कनोजिया उर्फ ‘टल्ली’चा शोध सुरू

धडक इतकी भीषण; तिघांचा जागीच मृत्यू

एसटी बसची धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर कोसळले. या भीषण अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातामुळे परिसरात काही काळ गर्दी झाली होती. अपघातानंतर नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. मात्र तिघांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तिघांचे मृतदेह पैठण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे मृतांच्या नातेवाइकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अपघातग्रस्त एसटी बस पोलिसांच्या ताब्यात

घटनेनंतर पैठण पोलिसांनी अपघातग्रस्त एसटी बस ताब्यात घेतली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण कसे सुटले आणि अपघाताच्या वेळी नेमकी परिस्थिती काय होती, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

हेही वाचा: Pune Crime: बिबवेवाडीत धक्कादायक प्रकार; अल्पवयीनाच्या हातातील पिस्तुलातून सुटली गोळी, तरुणाच्या पार्श्वभागात घुसली

बाप-लेकीच्या मृत्यूने हळहळ

कृष्णा गायकवाड आणि त्यांची अवघी पाच वर्षांची मुलगी छकुली यांचा एकाच अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कृष्णा गायकवाड यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. तर अशोक भालेराव यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

Web Title: Paithan st bus bike accident three killed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 11:42 AM

Topics:  

  • Accident Case
  • Mharashtra
  • Road Accident
  • ST Bus Accident

संबंधित बातम्या

Accident News: शहीद पित्याला अखेरचा निरोप देण्यासाठी निघाला मुलगा; वाटेतच रुग्णवाहिकेला भीषण अपघात, चौघांचा मृत्यू!
1

Accident News: शहीद पित्याला अखेरचा निरोप देण्यासाठी निघाला मुलगा; वाटेतच रुग्णवाहिकेला भीषण अपघात, चौघांचा मृत्यू!

Accident News: दुचाकीवरून चौघे निघाले होते घरी; पाठीमागून ट्रेलर आला अन् पती-पत्नीसह चिमुकल्याचा मृत्यू
2

Accident News: दुचाकीवरून चौघे निघाले होते घरी; पाठीमागून ट्रेलर आला अन् पती-पत्नीसह चिमुकल्याचा मृत्यू

Accident News: पहिल्यांदाच हट्ट केला अन् काळाने हिरावून नेले; दिवेआगरच्या समुद्रात सुमितचा दुर्दैवी अंत
3

Accident News: पहिल्यांदाच हट्ट केला अन् काळाने हिरावून नेले; दिवेआगरच्या समुद्रात सुमितचा दुर्दैवी अंत

Raigad News:सहलीसाठी दिवेआगरला गेले अन् समुद्राने घात केला; आळंदीच्या ८ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू
4

Raigad News:सहलीसाठी दिवेआगरला गेले अन् समुद्राने घात केला; आळंदीच्या ८ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.