Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar News : पहिले अत्याचार अन् मग पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न! पालघर जवळच्या ढाब्यावर नेमकं घडलं तरी काय?

मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाडा-खडकोना गावाजवळील जय अंबे ढाब्यावर एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. टेम्पो चालकाला बेदम मारहाण केली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 05, 2026 | 05:57 PM
Palghar News : पहिले अत्याचार अन् मग पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न! पालघर जवळच्या ढाब्यावर नेमकं घडलं तरी काय?
Follow Us
Follow Us:
  • संतापजनक! ढाब्यावर अमानुष अत्याचार
  • टेम्पो चालकाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न
मनोर : मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाडा-खडकोना गावाजवळील जय अंबे ढाब्यावर एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. टेम्पो चालकाला बेदम मारहाण केली. ढाबा मालक आणि कामगार यावरच थांबले नाहीत तर चालकाच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत दानिश खान (वय 30) हा टेम्पो चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ढाबा मालक आणि त्याच्या 8 ते 10 कामगारांविरोधात मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडले नेमके?
शनिवारी सायंकाळी सुमारास मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गुजरातकडे जात असताना दानिश खान आणि त्याचा सहाय्यक सोनू पाल हे जय अंबे ढाब्यावर विश्रांतीसाठी थांबले होते. कोल्ड्रिंक घेतल्यानंतर टेम्पोची चावी हरवल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ढाबा मालकाकडे चौकशी केली.चावी परत मिळाल्यानंतर ढाबा मालकाने मंदिरासाठी 20 रुपये दक्षिणा देण्याची मागणी केली. सुट्टे पैसे नसल्याने चालकाने नकार दिला, यामुळे संतप्त झालेल्या मालकाने कामगारांसह चालकावर हल्ला चढवला.

Nashik Crime: जमीनची किंमत ६० लाख, मात्र खरात ने घेतली २२ लाखात! महसूल अधिकारी ते एजेंट सगळे अडकणार?

खोलीत नेऊन अमानुष मारहाण

दानिश खान याला काउंटरलगतच्या खोलीत ओढून नेण्यात आले. त्याचे कपडे काढून लाकडी काठ्या आणि पट्ट्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर “आज तू इथून जिवंत जाणार नाही” अशी धमकी देत त्याच्या अंगावर आणि गुप्तांगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.दरम्यान, मदतीसाठी धावून आलेल्या सहाय्यक सोनू पाल यालाही मारहाण करण्यात आली.

पोलिसांची तत्पर कारवाई
अपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चालकाची सुटका केली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पुढील कारवाई

पीडित चालकाच्या तक्रारीवरून ढाबा मालक आणि संबंधित कामगारांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उशीरा रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या सगळ्या प्रकरणावर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. या सगळ्याचा तपास सुरु असून नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.

क्रूरतेची परिसीमा! गॅस सिलेंडरवरुन वाद, जेवण मागताच पतीने 9 महिन्याच्या गरोदर पत्नीची केली निघृण हत्या

Web Title: Palghar newsattempt to burn tempo driver at jai ambe dhaba near wada khadkona village under manor police station limits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 05:56 PM

Topics:  

  • crime news
  • Marathi News
  • navrashtra news
  • palghar crime case

संबंधित बातम्या

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
1

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
2

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
3

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
4

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.