(फोटो सौजन्य: Pinterest)
माळशिरसमधील ‘त्या’ तरुणीच्या खूनप्रकरणी मोठी अपडेट; जेजुरी पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्रीच्या प्रहरी ही घटना घडली. १० दिवस झाले गॅस सिलेंडर संपला होता ज्यामुळे लक्ष्मीला चूलीवर जेवण बनवावे लागत होते. लक्ष्मी ९ महिन्यांची गरोदर असल्याकारणाने तिला चूलीवर जेवण बनवताना त्रास सहन करावा लागत होता. हिच बाब घेऊन तिने पतीला घरात गॅस कधी येणार असा सवाल केला आणि यातूनच त्याच्यांत वाद निर्माण झाला. लक्ष्मीच्या वडिलांनी जावई राज चौधरीला गॅस खरेदी करण्यासाठी एक हजार रुपये दिले होते पण त्याने जुगारामध्ये सर्व पैसे गमावले. रात्री गॅसवरुन दोघांमध्ये वाद सुरु असतानाच रागाच्या भरात राजने लक्ष्मीला बेदम मारहाण केली. त्याने लक्ष्मीच्या डोक्यात वीट फेकून मारल्याचेही सांगण्यात येत आहे.
Nagpur Crime: लालसेचा कळस! विद्यार्थ्यांनी व्यापाऱ्याची हत्या करून कार लंपास; 12 तासात हत्येचा उलगडा
आपली पत्नी गर्भवती आहे याचेही त्याने भान ठेवले नाही आणि जेव्हा ती बेशुद्ध झाली तेव्हा तिच्या घरच्यांना फोन करुन त्याने लक्ष्मी जिन्यावरुन पडली असल्याचे सांगितले. यानंतर आरोपी पतीने कुटुंबियांसोबत पत्नीला बेगुसराय येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले जिथे डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या निधनांंनंतर सासरच्या आणि माहेरच्या दोन्ही पक्षांमध्ये रुग्णालयातच वाद सुरु झाला. लक्ष्मीच्या बहिणीचा आरोप आहे की, तिला रुग्णालयात नेण्याऐवजी, तिचा मृत्यू घडवून आणून तो एक अपघात आहे असे भासवण्याच्या आशेने तिचा पती तिला गाडीतून फिरवत राहिला. दरम्यान पतीने सर्व आरोप फेटाळत तो घरी आला तेव्हा लाईट गेली होती आणि पत्नी जिन्यावरुन खाली पडली होती असा वेगळाच दावा केला आहे. आता दोन्ही पक्षांच्या कथेनंतर खरं सत्य काय हे तर पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतरच उघड होईल. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून पती राजविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही अडीज वर्षांची मुलगी देखील असल्याचे स्पष्ट झाले आहे.






