काय घडलं नेमकं?
मृतक दत्ताराम केसरकर हे उचत येथे राहतात. त्यांचा मुलगा संतोष याला दारूचे व्यसन आहे. तो गावडी येथे शेती करत होता. महिन्यातून घरी येत असे, गुरुवारी (दि. ११) गावडीहून उचत येथे आला होता. संतोष याने घरातील बॅगेत ठेवलेले पैसे न सापडल्याने पैश्यांबाबत चौकशी केली. मात्र घरातील कोणीही कबुली दिली नाही.
यांनतर त्याने वडिलांवरच पैसे घेतल्याचा संशय आला. त्यांनतर वडील दत्ताराम केसरकर आणि संतोष यांच्यात पैश्यांच्या कारणावरून कडाक्याने भांडण झाले. रागाच्या भरात संतोषने दगडी वरवंटा डोक्यात मारून वडिलांना गंभीर जखमी केले. डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने दत्ताराम केसरकर यांचा जागीची मृत्यू झाला..
कोल्हापुरात मृत्यूचे तांडव! Hit-Run केसमध्ये बाप-लेकीचा दुर्दैवी अंत; तब्बल 7 जणांना…
कोल्हापूर शहरातील राजारामपुरी, शाहू मिल चौकात शनिवारी दुपारी हिट अँड रनची घटना घडली. या अपघातात कोल्हापूर मनपाचे सेवानिवृत्त अधिकारी आणि त्यांची वकील मुलगी अशा दोघांचा दुदैवी मृत्यू झाला. दीपक महादेव वंसे ( रा.साईबाबा मंदिरलगत, दिलबहार तालीम चौक, कोल्हापूर), त्यांची नवविवाहित मुलगी अॅड.भाग्यश्री लक्ष्मण गवळी उर्फ वंसे (रा. कसबा बावडा, कोल्हापूर, मुळ रा. खोकुर्ले, ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. तर दोन तरुण जखमी झाले. अपघातानंतर कार चालक मयुरेश योगेश पाटील (वय २०, रा. आठवी गल्ली, राजारामपूरी, कोल्हापूर) याला जमावाने चांगलाच चोप देत, कार रस्त्यावर उलटून टाकली. या अपघात प्रकरणी राजारामपूरी पोलिसांनी कार चालक मयुरेश पाटील याला रात्री उशिरा अटक केली आहे.
चाकूचा धाक दाखवून विद्यार्थ्याला बेदम मारहाण; दप्तरातील 150 रूपये काढून घेतले अन्…
Ans: घरातील नऊ हजार रुपये घेतल्याचा मुलाला संशय होता.
Ans: मुलाने दगडी वरवंट्याने डोक्यात वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
Ans: पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.






