Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv Crime: परंड्यात तहसीलदारांची गाडी अडवून शिवीगाळ; दोघांवर गुन्हा दाखल

परंडा येथे तहसीलदारांची गाडी अडवून शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 17, 2026 | 06:43 PM
परंड्यात तहसीलदारांची गाडी अडवून शिवीगाळ; दोघांवर गुन्हा दाखल

परंड्यात तहसीलदारांची गाडी अडवून शिवीगाळ; दोघांवर गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:
  • परंड्यात तहसीलदारांची गाडी अडवून शिवीगाळ
  • दोघांवर गुन्हा दाखल
  • अवैध वाळू उपसा आणि वाळू माफियांचा अँगल
धाराशिव : जिल्ह्यातील परंडा येथे तहसीलदारांची गाडी अडवून त्यांना शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शासकीय कर्तव्यावर असताना अधिकाऱ्यांनाच अडवून दमदाटी करण्यात आल्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदार निलेश मारुती काकडे (वय ३२, रा. शासकीय निवासस्थान, तहसील कार्यालय परिसर, परंडा) हे बुधवार १५ एप्रिलला सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आपल्या मुलीस दवाखान्यात नेत असताना ही घटना घडली.

धावत्या पीएमपी बसमध्ये महिला कंडक्टरवर जीवघेणा हल्ला; चाकू मांडीत खुपसला अन्…

यावेळी तहसील कार्यालयाच्या आवारात योगेश मेटकरी (रा. पिठापुरी, ता. परंडा) आणि त्याचा एक अनोळखी साथीदार यांनी काकडे यांची गाडी अडवली. माझ्या निवेदनावर कारवाई का केली नाही? आत्ताच्या आत्ताच माझ्या अर्जावर कारवाई कर, असा दम देत दोघांनी मोठमोठ्याने आरडाओरड केली. यावेळी त्यांनी तहसीलदारांना शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. दरम्यान, या घटनेमागे अवैध वाळू उपसा आणि वाळू माफियांचा अँगल असल्याचेही बोलले जात असून, याच कारणामुळे हा गंभीर प्रकार घडल्याची चर्चा स्थानिक स्तरावर सुरू आहे. मात्र याबाबत अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही.

घटनेनंतर तहसीलदार काकडे यांनी रात्री उशिरा परंडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार योगेश मेटकरी व एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा (गु.र.नं. १६५/२०२६) दाखल करण्यात आला आहे. यात कलम १३२, २२१, २२४, १२६(२), ३५१(२), ३५२, ३(५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११०, ११२, ११७ यांचा समावेश आहे.

या घटनेमुळे शासकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजात अडथळे निर्माण होण्याबरोबरच कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही चिंता व्यक्त केली जात आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, घटनेमागील कारणे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

धाराशिवमध्ये तरुणाची निर्घृण हत्या

तसेच धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे एका ३५ वर्षीय युवकाची डोक्यात दगड घालून आणि तीक्ष्ण हत्याराने वार करून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, प्राथमिक तपासाअंती पोलिसांनी मृताच्या पत्नीसह ७ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

Romance Scam: डॉक्टर, वकील, प्रेमिका…! ५०० हून अधिक महिला ‘रोमांस स्कॅम’चे बळी, असं गुपित झाले उघड

Web Title: Paranda tehsildar car stopped abuse case registered dharashiv crime news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 06:43 PM

Topics:  

  • crime
  • Dharashiv
  • police

संबंधित बातम्या

Kalyan Crime: प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत; 24 तास बाथरूमचा नळ सुरू… अन् ‘त्या’ एका व्हॉईस मेलने पोलिसही चक्रावले!
1

Kalyan Crime: प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत; 24 तास बाथरूमचा नळ सुरू… अन् ‘त्या’ एका व्हॉईस मेलने पोलिसही चक्रावले!

CJP Protest : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी CJPचा संसद मोर्चा; जंतरमंतरवर गोंधळ, पोलिसांची लाठीचार्जची कारवाई
2

CJP Protest : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी CJPचा संसद मोर्चा; जंतरमंतरवर गोंधळ, पोलिसांची लाठीचार्जची कारवाई

Beed Crime: बीडच्या बनावट ट्रस्टचे पाकिस्तानी कनेक्शन? एटीएसच्या तपासात धक्कादायक खुलासा
3

Beed Crime: बीडच्या बनावट ट्रस्टचे पाकिस्तानी कनेक्शन? एटीएसच्या तपासात धक्कादायक खुलासा

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर काळाचा कहर! टेम्पोच्या धडकेनंतर कार पेटली, पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू
4

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर काळाचा कहर! टेम्पोच्या धडकेनंतर कार पेटली, पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.