Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parbhani Crime: दिवाळीच्या रात्री वृद्ध दांपत्याची लूट अन् तरुणाचा खून; आरोपी अखेर गजाआड

दिवाळीच्या रात्री वालूर येथे वृद्ध दांपत्यावर दरोडा टाकून तरुणाची हत्या करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. मुख्य आरोपी बाबुराव पवार अटकेत असून झरी व पार्डीतील गुन्ह्यांचीही कबुली दिली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 17, 2026 | 01:55 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • दिवाळीत वालूर येथे दरोडा टाकून संतोष सोनवणे याची निर्घृण हत्या
  • मोडस ऑपरेंडीच्या आधारे तपास; ६० वर्षीय मुख्य आरोपी अटकेत
  • झरी व पार्डीतील गुन्ह्यांचीही आरोपीकडून कबुली, दोन साथीदार फरार
परभणी: दिवाळीच्या सुमारास परभणी येथून एक धक्कदायक घटना समोर आली होती. एका तरुणाचा खून करून वृद्ध दाम्पत्याला लुटल्याचा प्रकार समोर आला होता. आता खुनी दरोडेखोर टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी बाबुराव उर्फ बाबुशा सावळा पवार (वय ६०, रा. जालना) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने आपल्या दोन साथीदारांसह वालूर झरी आणि पार्डी येथील गुन्ह्यांचीही कबुली दिली आहे.

Telangana Crime: पत्नी माहेरून परत येईना, संतापलेल्या पतीने थेट सासरच्या घरालाच पेटवले

नेमकं काय प्रकरण?

२२ ऑक्टोबर २०२५ च्या मध्यरात्री वालूर येथील श्रीकृष्ण मंदिरात अज्ञात दरोडेखोरांनी प्रवेश केला होता. तेथे दत्तराव भोकरे आणि सुरूबाई भोकरे या वृद्ध दांपत्याला बेदम मारहाण करून त्यांच्या कानातील दागिने हिसकावले. त्यानंतर शेजारच्या शेत आखाड्यावर झोपलेला तरुण संतोष सोनवणे याच्यावर लोखंडी गजाने प्रहार करून त्याची निर्घृण हत्या केली. त्याची आजी वच्छलाबाई यांनाही मारहाण करून दागिने लुटून दरोडेखोर फरार झाले होते.

पोलिसांनी या घटनेचा छडा लावण्यासाठी विशेष पथके नेमली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. विवेकानंद पाटील यांनी झरी येथील ९ ऑक्टोबरच्या घटनेचा अभ्यास केला. झरी आणि वालूर या दोन्ही ठिकाणी दरोडेखोरांची अंगकाठी आणि गुन्हा करण्याची पद्धत सारखीच असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. हाच धागा पकडून पोलिसांनी तांत्रिक पुरावे गोळा केले. वेगाने आपली तपासाची चक्रे फिरवत १५ जानेवारीला सापळा रचून बाबुराव पवारला ताब्यात घेतले. त्याने सर्व गुन्ह्यांची कबुली दिली.

कसा रचला दरोड्याचा कट

बाबुराव पवारने दिलेल्या माहितीनुसार, वालूरमध्ये चोरी करण्यापूर्वी त्यांनी दुपारी त्याच मंदिरात चहा पिला होता. तिथेच रात्रीचा ‘प्लॅन’ ठरला. खून आणि दरोड्या नंतर त्यांनी पार्डी येथून एक दुचाकी चोरून पळ काढला होता. सध्या आरोपी २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत आहे. त्याचे इतर दोन साथीदार आणि चोरीचा माल हस्तगत करण्यासाठी सेलू पोलीस अधिक तपास करत आहे.

Beed Crime: बीडमध्ये अमानुष कौटुंबिक हिंसाचार; मुलांच्या भांडणातून पेटला संताप, विवाहितेला तापत्या लोखंडी गजाने चटके

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कधी आणि कुठे घडली?

    Ans: २२ ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या रात्री परभणी जिल्ह्यातील वालूर येथे.

  • Que: आरोपी कसा सापडला?

    Ans: झरी व वालूर येथील गुन्ह्यांची पद्धत सारखी असल्याने तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अटक केली.

  • Que: पुढील तपासात काय सुरू आहे?

    Ans: फरार दोन साथीदारांचा शोध आणि चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Parbhani crime elderly couple robbed and young man murdered on diwali night

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • crime
  • Parbhani
  • parbhani crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.