काय घडल नेमकं?
पिटलम बलैया यांची मुलगी सायव्वा हिचा विवाह १५ वर्षांपूर्वी रवी नावाच्या तरुणाशी झाला होता. तीन मुले देखील या दाम्पत्याला आहे. मात्र रवीला दारूचे व्यसन होते. तो रोज दारू पिऊन पत्नीला अमानुष मारहाण आणि छळ करत होता. म्हणून या सततच्या त्रासाला कंटाळून सायव्वा गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुलांसह माहेरी राहत होती.
पंचायतीची भरवण्यात आल्या मात्र…
या दोघांमधील वाद मिटवण्यासाठी आनंद गावातील ज्येष्ठांच्या उपस्थितीत पंचायतीही भरवण्यात आल्या. मात्र रवीचा दारूचा व्यसन करणं आणि छळ करण यात काही बदल झाला नाही. त्यामुळे सायव्वा पुन्हा पतीच्या घरी जाण्यास तयार नव्हती. याचाच राग रवीच्या मनात होता.
पेट्रोल ओतून लावली आग
गुरुवारी रात्री रवी आपल्या सासरच्या घरी पोहोचला. तिथे त्याने पत्नीला आपल्यासोबत पाठवण्यासाठी सासरच्या मंडळींशी जोरदार वाद घातला. परंतु त्याच्या वागणुकीत बदल न आल्याने सासरच्यांनी मुलीला त्याच्यासोबत पाठवण्यास स्पष्ट नकार दिला. हा नकार ऐकताच रवीचा पारा चढला. त्याने आपल्यासोबत बाटलीत आणलेले पेट्रोल संपूर्ण घरात शिंपडले आणि आग लावून दिली.
सुदैवाने जीवितहानी नाही
या आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केले. घराच्या आवारात उभी असलेली सायकल आणि इतर साहित्य जळून खाक झाले. आग लागल्याचे लक्षात येताच घरातील सदस्यांनी प्रसंगावधान राखत मागच्या दाराने बाहेर धाव घेतली. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. या गोंधळाचा फायदा घेत आरोपी रवी घटनास्थळावरून पसार झाला.
गुन्हा दाखल
सासरच्या मंडळींनी आगीला शांत करत पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला असून त्याचा शोध सुरु केला आहे. पोलिसांनी त्याला लवकरात लवकर अटक करण्याचा आश्वासन दिले आहे.
Belgaum crime: विधवा मुलीच्या पैशांवर डोळा? प्रेमसंबंधाच्या संशयातून अभियंत्यावर जीवघेणा हल्ला
Ans: पत्नी माहेरून परत येण्यास तयार नसल्यामुळे रागाच्या भरात हे कृत्य केले.
Ans: नाही. सासरच्या मंडळींनी प्रसंगावधान राखून मागील दाराने पळ काढला.
Ans: आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.






