Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parbhani News: गोदावरीत बुडून दोन सख्ख्या बहिणींसह चुलत बहिणीचा मृत्यू; सोनपेठ हादरलं

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील मोहळा गावात गोदावरी नदीत अंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणी आणि त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेल्या चुलत बहिणीचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 14, 2026 | 02:12 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • गोदावरी नदीत बुडून दोन सख्ख्या बहिणींसह चुलत बहिणीचा मृत्यू.
  • मुलींना वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेल्या महिलेचाही जीव गेला.
  • तिन्ही मृतदेह सोनपेठ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
परभणी: परभणी येथून एक अतिशय दुर्दैवी घटना समोर आली आहे. यात गोदावरी नदीत अंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींसह त्यांच्या चुलत बहिणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही घटना परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील मोहळा येथे आज (14 जून) सकाळी घडली. (Parbhani News)

काय घडलं नेमकं?

मोहळा येथील उत्कर्षा उत्तम जाधव (वय 18) व समीक्षा उत्तम जाधव (वय 16) आणि सिंधू दत्ता जाधव (वय 45) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. उत्कर्षा आणि समीक्षा या दोघी सख्ख्या बहिणी. (Parbhani News) या दोघी आपल्या चुलत बहिणीसोबत गोदावरी नदीत अंघोळीसाठी गेल्या होत्या. मात्र पाण्याचा अंदाज न समजल्याने त्या पाण्यात बुडाल्या. मुलींना वाचविण्यासाठी पाण्यात उतरलेल्या त्यांची चुलत बहीण सिंधू दत्ता जाधव (वय 45) याही पाण्यात बुडाल्या. याची माहित गावातील नागरिकांना त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली.

भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडले, तिघांचा मृत्यू; संभाजीनगर- गंगापूर रोडवरील धक्कादायक घटना

या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. ग्रामस्थांनी तिघींना शोध घेऊन त्यांना बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. तिघींचे मृतदेह पुढील तपासणीसाठी सोनपेठ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मोहळा गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Parbhani News)

धाराशिवमध्ये भोंदूबाबाचा दरबार! भूतबाधा घालवण्याच्या नावाखाली अमानुष प्रकार; VIDEO व्हायरल

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या धक्कादायक प्रकाराने खळबळ उडाली आहे. उपचार आणि भुतबाधा घालवण्याच्या नावाखाली एका तथाकथित भोंदूबाबाकडून लोकांचा अमानुष छळ केला जात असल्याचा आरोप होत असून, (Dharashiv News) याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, स्थानिकांकडून तातडीने कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

साताऱ्यात मध्यरात्री भीषण अपघात; कार 3 वेळा पलटी, एका तरुणाचा जागीच मृत्यू

सातारा जिल्ह्यातून अपघाताची बातमी समोर आली होती. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गणपतीमुळे येथे फिरण्यासाठी निघालेल्या तीन मित्रांचा चारचाकी कारचा भीषण अपघात झाला. (Accident News) या अपघातात एका २३ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. एका जण गंभीर तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना मध्यरात्री कराड तालुक्यातील वडोली भिकेश्वर गावाजवळ घडली. एक जण गंभीर तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे.(Accident News)

Chhatrapati Sambhajinagar Crime: मित्राने भाडे न देता खोली सोडली, पण जीव गेला मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा; तिघांवर गुन्हा

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही दुर्दैवी घटना कुठे घडली?

    Ans: परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील मोहळा गावाजवळील गोदावरी नदीत ही घटना घडली.

  • Que: मृत मुलींची नावे काय आहेत?

    Ans: उत्कर्षा उत्तम जाधव, समीक्षा उत्तम जाधव आणि सिंधू दत्ता जाधव अशी मृतांची नावे आहेत.

  • Que: सिंधू जाधव यांचा मृत्यू कसा झाला?

    Ans: त्या बुडणाऱ्या मुलींना वाचवण्यासाठी पाण्यात उतरल्या होत्या, मात्र त्याही पाण्यात बुडाल्या.

Web Title: Parbhani news two biological sisters and their cousin die by drowning in the godavari river sonpeth in shock

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • crime
  • Parbhani
  • parbhani crime

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Crime: मित्राने भाडे न देता खोली सोडली, पण जीव गेला मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा; तिघांवर गुन्हा
1

Chhatrapati Sambhajinagar Crime: मित्राने भाडे न देता खोली सोडली, पण जीव गेला मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा; तिघांवर गुन्हा

Dharashiv News: धाराशिवमध्ये भोंदूबाबाचा दरबार! भूतबाधा घालवण्याच्या नावाखाली अमानुष प्रकार; VIDEO व्हायरल
2

Dharashiv News: धाराशिवमध्ये भोंदूबाबाचा दरबार! भूतबाधा घालवण्याच्या नावाखाली अमानुष प्रकार; VIDEO व्हायरल

Latur Accident: भरधाव ट्रकचा कहर! दुचाकी आणि कारला धडक; लातूरमध्ये तिघांचा मृत्यू
3

Latur Accident: भरधाव ट्रकचा कहर! दुचाकी आणि कारला धडक; लातूरमध्ये तिघांचा मृत्यू

Beed Crime: लग्नानंतर मुलगी गर्भवती; रुग्णालयातील तपासणीत धक्कादायक खुलासा
4

Beed Crime: लग्नानंतर मुलगी गर्भवती; रुग्णालयातील तपासणीत धक्कादायक खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.