नेमकं काय घडलं?
महारुद्र बळीराम राऊत (22) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो खासगी कंपनीत नोकरी करीत होता. काही महिन्यापूर्वी त्याने मित्र प्रदीप मापारी व त्याची पत्नी पल्लवी मापारी यांना पवननगर परिसरातील बाबासाहेब बटुळे याची खोली भाड्याने मिळवून दिली होती. या खोलीचं भाडं दरमहा 2 हजार 800 रुपये होत. ही खोली प्रदीप व पल्लवी यांनी न सांगता व घरभाडे न देता रिकामी केली होती. (Chhatrapati Sambhajinagar Crime)
शुक्रवारी दुपारी सुमारे 12 वाजता घरमालक बाबासाहेब बटुळे महारुद्रला सोबत घेऊन त्याच्या कुटुंबीयांच्या सलून दुकानात आला. तिथे त्याने भाड्याच्या पैशांबाबत जाब विचारले. यावेळी महारुद्रने पायल आणि प्रदीपकडून पैसे मागवून देतो, असे म्हंटले. मात्र बटुळे याने त्याचा मोबाइल हिसकावून घेत भाड्याची रक्कम न दिल्यास हातपाय तोडण्याची व मारहाण करण्याची धमकी दिली. (Chhatrapati Sambhajinagar Crime) सर्वांसमोर बाबासाहेब अपमानास्पद बोलत होता. तरीही महारुद्र आणि त्याचा भाऊ वीरभद्र राऊत यांनी तुमचे पैसे मागून देऊ असे म्हंटले. मात्र बाबासाहेब काहीच ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता.
भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडले, तिघांचा मृत्यू; संभाजीनगर- गंगापूर रोडवरील धक्कादायक घटना
महारुद्राचा भाऊ वीरभद्र याने सांगितले की वडिलांच्या समोर त्याने तोंडाला येईल त्या भाषेत बोलणी केली. त्यामुळे महारुद्र लगेच घरी गेला. आई गावाला गेली असल्याने घरी कोणीही नव्हते काही वेळाने वीरभद्र घरी गेल्यावर दरवाजा उघडत नव्हता. तेव्हा त्याने खिडकीतून डोकावून पाहिले तेव्हा महारुद्र गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.
अवघ्या तासाभरात महारुद्रने फॅनला साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात घरमालक बाबासाहेब बटुळे, मित्र प्रदीप मापारी आणि एका महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. (Chhatrapati Sambhajinagar Crime)
Ans: महारुद्र बळीराम राऊत (वय 22) असे मृत तरुणाचे नाव होते.
Ans: मित्राने भाडे न देता खोली रिकामी केल्याने घरमालकाने महारुद्रकडे पैशांची मागणी केली होती.
Ans: घरमालक बाबासाहेब बटुळे, मित्र प्रदीप मापारी आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






