Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: डोंगरावरून कार थेट रेल्वे रुळावर; पनवेल-उरण मार्गावरील अप-डाऊन रेल्वे वाहतूक ठप्प

पारसिक हिलवरून भरधाव कार थेट खाली रेल्वे रुळावर कोसळली आणि काही क्षणांतच मोठा अनर्थ टळला. अपघाताच्या वेळी रुळावर लोकल नसल्याने संभाव्य जीवितहानी टळली; मात्र कारमधील तरुण गंभीर जखमी झाला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 24, 2026 | 05:25 PM
Accident News: डोंगरावरून कार थेट रेल्वे रुळावर; पनवेल-उरण मार्गावरील अप-डाऊन रेल्वे वाहतूक ठप्प

Accident News: डोंगरावरून कार थेट रेल्वे रुळावर; पनवेल-उरण मार्गावरील अप-डाऊन रेल्वे वाहतूक ठप्प

Follow Us
Follow Us:
  • पारसिक हिलवरून कार थेट पनवेल-उरण रेल्वे मार्गावर कोसळली.
  • कारमधील तरुण गंभीर जखमी; रुग्णालयात दाखल.
  • OHE आणि रेल्वे ट्रॅकची तपासणी; अप-डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प.
 

नवी मुंबई : बेलापूर येथील पारसिक हिल परिसरात गुरुवारी दुपारी भीषण अपघात झाला. डोंगरावरून एक कार थेट खाली असलेल्या रेल्वे रुळावर कोसळली. या दुर्घटनेत कारमधील तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पारसिक हिलवरून कार थेट पनवेल-उरण दरम्यानच्या रेल्वे मार्गावर पडली. कार प्रचंड उंचीवरून रुळावर कोसळल्याने तिचे मोठे नुकसान झाले. अपघाताच्या वेळी या रुळावरून कोणतीही लोकल जात नसल्याने मोठा अनर्थ टळला. या मार्गावर नियमित लोकल वाहतूक सुरू असल्याने संभाव्य दुर्घटनेची तीव्रता अधिक असण्याची शक्यता होती.

हेही वाचा: Accident News: तरुणाला धडक दिल्यानंतर पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न; क्षणात बाजूला उडी अन्…

रेल्वे वाहतूक ठप्प

कार रेल्वे रुळावर पडल्याने पनवेल-उरण मार्गावरील अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक तात्पुरती ठप्प करण्यात आली आहे. कारमुळे रेल्वे ट्रॅक तसेच ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरिंगचे (OHE) नुकसान झाले आहे का, याची रेल्वे प्रशासनाकडून तपासणी सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील गाड्या थांबवण्यात आल्या असून रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ओव्हरहेड वायर, विद्युत खांब किंवा अन्य रेल्वे यंत्रणेला नुकसान झाल्याचे आढळल्यास दुरुस्तीचे काम करावे लागणार आहे. त्यामुळे रेल्वे वाहतूक पूर्ववत होण्यास वेळ लागू शकतो.

हेही वाचा:  Crime News: काही तासांत तीन महिलांना लुटले; गोल्ड लोनच्या माध्यमातून चार लाखांची उचल, सहा गुन्हे उघडकीस

बचावकार्याला वेग

अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, स्थानिक पोलिस तसेच आपत्कालीन यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. रुळावर पडलेली कार हटवून रेल्वे मार्ग मोकळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच ट्रॅक आणि विद्युत यंत्रणेची पाहणी केली जात आहे.दरम्यान, कारमधील तरुणाला बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, तसेच कारमध्ये अन्य कोणी होते का, याबाबत रेल्वे आणि पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे.

Web Title: Parsik hill car accident belapur railway track

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • Accident Case
  • Accident News
  • Navi Mumbai Crime

संबंधित बातम्या

Accident News: तरुणाला धडक दिल्यानंतर पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न; क्षणात बाजूला उडी  अन्…
1

Accident News: तरुणाला धडक दिल्यानंतर पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न; क्षणात बाजूला उडी अन्…

Accident News: मोठी बातमी ! कॅबिनेट मंत्र्याचा मुलीसह कार अपघातात मृत्यू; कारला ट्रकची जोरदार धडक बसली अन्…
2

Accident News: मोठी बातमी ! कॅबिनेट मंत्र्याचा मुलीसह कार अपघातात मृत्यू; कारला ट्रकची जोरदार धडक बसली अन्…

Accident News : स्टेअरिंग जाम झाल्याने बस उलटून अपघात; 7 जण गंभीर जखमी तर 31 प्रवासी…
3

Accident News : स्टेअरिंग जाम झाल्याने बस उलटून अपघात; 7 जण गंभीर जखमी तर 31 प्रवासी…

Accident News: पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; कारची ट्रकला जोरदार धडक , २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
4

Accident News: पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; कारची ट्रकला जोरदार धडक , २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.