Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khamgaon Accident: कार अपघातात दोघांचा मृत्यू, अपघातग्रस्त वाहनात आढळला २६ किलो गांजा; टेंभुर्णा येथे ट्रकने दिली धडक

Buldhana Khamgaon Car-Truck Accident Drug Seizure: खामगाव येथे कार-ट्रकच्या भीषण धडकेत दोघांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त कारमध्ये २६.६७० किलो गांजा आढळल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 02, 2026 | 04:28 PM
Buldhana Khamgaon Car-Truck Accident

Buldhana Khamgaon Car-Truck Accident

Follow Us
Follow Us:
  • टेंभुर्णा उड्डाणपुलावर भीषण अपघात
  • कार-ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू
  • अपघातानंतर गांजा तस्करीचा प्रकार उघड
खामगाव: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील टेंभुणा फाटा उड्डाणपुलावर शनिवारी रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास कार आणि ट्रक यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर वाहनांची तपासणी करताना २६.६७० किलो गांजासदृश अंमलीपदार्थ आढळून आल्याने एकच उडाली. मृतांमध्ये सतीष सय्यद फिरोज सखाराम जाधव (५३, रा. माडाखळी, जि. परभणी) आणि सय्यद फिरोज सय्यद महेबुब (४६, रा. हिंगोली) यांचा समावेश आहे. पोलिसांनी गांजा आणि कार, असा एकूण १८ लाख ३३
सतीष जाचव कारमध्ये तब्बल हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, गांजाच्या पुरवठा साखळीचा तपास सुरू आहे. शनिवारी रात्री सुमारे १०.३० वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील टेंभुणा फाटा उड्डाणपुलावर एमएच ३० / एएफ ८३८५ क्रमांकाची कार आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त कारमधील दोघांना बाहेर काढून उपचारासाठी खामगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले.

मात्र, या दोघांचाही मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनांची तपासणी सुरू असताना कारमधून उग्र वास येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी कारची अधिक तपासणी केली असता मागील सीटवर पोत्यामध्ये पॅक केलेल्या २५ पुड्यांमध्ये गांजासदृश अंमली पदार्थ आढळून आला. वजन केले असता त्याचे प्रमाण २६.६७० किलो भरले.

या पदार्थाची किंमत १३ लाख ३३ हजार ५०० रुपये असल्याचे सांगण्यात आले, तर अपघातग्रस्त कारची किंमत पाच लाख रुपये असल्याने एकूण १८ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी सागर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, या अंमली पदार्थांचा उगम, पुरवठा साखळी आणि यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जात आहे.

अपघातामुळे गांजा तस्करीचा पर्दाफाश

टेंभुणा फाटा उड्डाणपुलावरील भीषण अपघातामुळे कारमधील दोघांचा मृत्यू झाला. मात्र, याच अपघातामुळे कारमध्ये लपवून ठेवलेल्या २६.६७० किलो गांजासदृश पदार्थांचा प्रकार उघडकीस आला. अपघात झाला नसता, तर या कारमधून एवढ्या मोठ्याप्रमाणात अंमली पदार्थांची वाहतूक होत असल्याची माहिती समोर आली असती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महामार्गावरून अंमली पदार्थांची वाहतूक होत असताना नियमित तपासणी यंत्रणेचे लक्ष कुठे होते? अपघातामुळे हा प्रकार उघड झाला.

Washim News: वाशिम जिल्ह्यात वाढतोय साथरोगांचा प्रादुर्भाव; आरोग्य विभागाचे काळजी घेण्याचे आवाहन

💡

Frequently Asked Questions

  • Que: खामगावमध्ये कार आणि ट्रकचा अपघात कुठे झाला?

    Ans: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील टेंभुर्णा फाटा उड्डाणपुलावर हा अपघात झाला.

  • Que: खामगाव कार-ट्रक अपघातात किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: या भीषण अपघातात कारमधील दोन जणांचा मृत्यू झाला.

  • Que: अपघातग्रस्त कारमध्ये किती गांजा आढळला?

    Ans: पोलिसांना कारमध्ये २६.६७० किलो गांजा सापडला.

Web Title: Buldhana khamgaon accident car truck collision 26 kg ganja seized pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 04:28 PM

Topics:  

  • Accident Case
  • buldhana news
  • Khamgaon News

संबंधित बातम्या

Buldhana: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ६७.३६ कोटींची भेट, मिळणार दुहेरी आर्थिक दिलासा; केंद्रीय राज्यमंत्री जाधवांची माहिती
1

Buldhana: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ६७.३६ कोटींची भेट, मिळणार दुहेरी आर्थिक दिलासा; केंद्रीय राज्यमंत्री जाधवांची माहिती

Jalna Accident News: पुलावरील नियंत्रण सुटले अन् कंटेनर ढाब्यावर आदळला; चेंदामेंदा झालेल्या गाडीत दोघे जागीच मृत!
2

Jalna Accident News: पुलावरील नियंत्रण सुटले अन् कंटेनर ढाब्यावर आदळला; चेंदामेंदा झालेल्या गाडीत दोघे जागीच मृत!

Buldhana News : पावसाने वाळणारी पिकं आता वाचणार? तूर, कपाशी आणि हळदीला सिंचनासाठी पाणी देण्याचा निर्णय!
3

Buldhana News : पावसाने वाळणारी पिकं आता वाचणार? तूर, कपाशी आणि हळदीला सिंचनासाठी पाणी देण्याचा निर्णय!

Tur Crop: तुरीवर घाटे अळीचा प्रादुर्भाव; फुलोरा अवस्थेतील पिकाची काळजी घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन
4

Tur Crop: तुरीवर घाटे अळीचा प्रादुर्भाव; फुलोरा अवस्थेतील पिकाची काळजी घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.