Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime News: वाद दोन जणांचा, बळी तिसऱ्याचा; तीन लाखांच्या वादात तरुणाचा रक्तरंजित अंत

वाद दोन जणांचा होता... मध्यस्थी करण्यासाठी तिसरा पुढे आला आणि अखेर त्याचाच जीव गेला! तीन लाखांच्या व्यवहारातून सुरू झालेल्या वादात सहदेव शर्मा याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी सहदेवला फुटपाथवर नेऊनही मारहाण करण्यात आली; उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 13, 2026 | 11:34 AM
Pune Crime News: वाद दोन जणांचा, बळी तिसऱ्याचा; तीन लाखांच्या वादात तरुणाचा रक्तरंजित अंत

Pune Crime News: वाद दोन जणांचा, बळी तिसऱ्याचा; तीन लाखांच्या वादात तरुणाचा रक्तरंजित अंत

Follow Us
Follow Us:
  • तीन लाखांच्या व्यवहारावरून वाद पेटला
  • मध्यस्थी करणाऱ्या सहदेववर तीक्ष्ण शस्त्राने वार
  • हल्ल्यानंतरही फुटपाथवर नेऊन मारहाण
 

पुणे : दोन जणांच्या पैशांच्या वादात मध्यस्थी करणे एका तरुणाच्या जीवावर बेतले. मित्राने घेतलेल्या तीन लाख रुपयांच्या उसने पैशांवरून सुरू असलेल्या वादात मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा तीक्ष्ण शस्त्राने भोसकून खून करण्यात आला. पाषाण परिसरातील आयटीआय मैदानाच्या प्रवेशद्वारासमोर रविवारी रात्री उशिरा ही धक्कादायक घटना घडली. सहदेव रामप्रकाश शर्मा (वय ३३, रा. सूस गाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

तीन लाखांच्या पैशांवरून वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहदेवचा मित्र ज्ञानेश्वर भोई याने बंटी नावाच्या व्यक्तीकडून तीन लाख रुपये उसने घेतले होते. हे पैसे परत करण्यावरून ज्ञानेश्वर आणि बंटी यांच्यात वाद सुरू होता. सहदेव या व्यवहारात मध्यस्थी करत होता. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास सहदेव आणि त्याचा मित्र ओंकार डोईफोडे आयटीआय मैदानाच्या परिसरात गेले होते. याचवेळी आरोपी तेथे आले. पैशांच्या व्यवहारात मध्यस्थी करण्यावरून तसेच आरोपीच्या कुटुंबीयांबद्दल सहदेवने अपशब्द वापरल्याच्या गैरसमजातून वाद आणखी चिघळला.

हेही वाचा: Pune Crime: १३ तोळे सोने अन् कोटीच्या घराची मागणी; छळाला कंटाळून आयटी अभियंता विवाहितेने केली आत्महत्या 

भोसकल्यानंतरही लाथाबुक्क्यांनी मारहाण

वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी सहदेवला मारहाण करण्यास सुरुवात केली. सहदेवने प्रतिकार केल्यानंतर आरोपींनी तीक्ष्ण शस्त्राने त्याच्यावर वार करून त्याला भोसकले. गंभीर जखमी झाल्याने सहदेव रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला. धक्कादायक बाब म्हणजे, गंभीर जखमी झाल्यानंतरही आरोपींनी सहदेवला ओढत फुटपाथवर नेले. त्यानंतर तेथेही त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

उपचारादरम्यान मृत्यू

जखमी अवस्थेत सहदेवला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पाषाण परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सहदेवचा भाऊ कृष्णा रामप्रकाश शर्मा (वय ३६, रा. सूस गाव) यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार बंटी उर्फ आशिष चक्रनारायण याच्यासह तिघांविरुद्ध बाणेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Pashan three lakh money dispute youth murder pune sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 11:34 AM

Topics:  

  • maharashtra. pune crime
  • murder case news
  • Pashan
  • pune crime news

संबंधित बातम्या

Crime News: घरगुती वादातून महिलेचा खून; रक्तरंजित घटनेनंतर पतीची पोलिस ठाण्यात हजेरी
1

Crime News: घरगुती वादातून महिलेचा खून; रक्तरंजित घटनेनंतर पतीची पोलिस ठाण्यात हजेरी

Crime News: ‘टेम्पो हळू चालवा’ म्हटल्याचा राग; वराळेत दोन गटांत तुफान हाणामारी, एकाच्या डोक्याला ९ टाके
2

Crime News: ‘टेम्पो हळू चालवा’ म्हटल्याचा राग; वराळेत दोन गटांत तुफान हाणामारी, एकाच्या डोक्याला ९ टाके

पुण्यात संस्थाचालकाची फिल्मी स्टाईल फसवणूक ! ५० कोटींचा चेक दाखवला, बदल्यात ८७ लाख घेतले; पेट्या उघडताच निघाल्या…
3

पुण्यात संस्थाचालकाची फिल्मी स्टाईल फसवणूक ! ५० कोटींचा चेक दाखवला, बदल्यात ८७ लाख घेतले; पेट्या उघडताच निघाल्या…

फुटपाथवर मृतदेह आढळला, अकस्मात मृत्यूची नोंद; तपासात २१ वर्षीय तरुणाच्या हत्येचा धक्कादायक उलगडा
4

फुटपाथवर मृतदेह आढळला, अकस्मात मृत्यूची नोंद; तपासात २१ वर्षीय तरुणाच्या हत्येचा धक्कादायक उलगडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.