Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात संस्थाचालकाची फिल्मी स्टाईल फसवणूक ! ५० कोटींचा चेक दाखवला, बदल्यात ८७ लाख घेतले; पेट्या उघडताच निघाल्या…

पुण्यात शिक्षण संस्थाचालकाला कोट्यवधींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ८७ लाख ६१ हजार रुपये उकळण्यात आले. पैसे परत मागितल्यावर आरोपींनी सहा बॅगा आणि दोन पेट्या दिल्या. मात्र घरी जाऊन त्या उघडताच पैशांऐवजी विटा, वृत्तपत्रांची रद्दी, चादरी आणि उशा पाहून संस्थाचालकाच्या पायाखालची जमीनच सरकली.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 11, 2026 | 04:36 PM
पुण्यात संस्थाचालकाची फिल्मी स्टाईल फसवणूक ! ५० कोटींचा चेक दाखवला, बदल्यात ८७ लाख घेतले; पेट्या उघडताच निघाल्या...

पुण्यात संस्थाचालकाची फिल्मी स्टाईल फसवणूक ! ५० कोटींचा चेक दाखवला, बदल्यात ८७ लाख घेतले; पेट्या उघडताच निघाल्या...

Follow Us
Follow Us:
  • कोट्यवधींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून ८७.६१ लाख उकळले
  • ५०, २५, १० आणि ५ कोटींचे बनावट चेक देऊन विश्वास संपादन
  • पैशांच्या सहा बॅगा व दोन पेट्यांत निघाल्या विटा, रद्दी अन् उशा 
पुणे : कोट्यवधी रुपयांचे कर्ज सहज मिळवून देण्याचे आमिष दाखवून शिक्षण संस्थाचालकाची तब्बल ८७ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. कर्जाचे चेक न वटल्याने पैसे परत मागितल्यानंतर आरोपींनी सहा बॅगा आणि दोन पेट्या देत त्यामध्ये पैसे असल्याचे भासवले. मात्र घरी जाऊन पेट्या उघडल्यानंतर त्यातून विटा, जुन्या वर्तमानपत्रांची रद्दी, चादरी आणि उशा निघाल्याने संस्थाचालकाला मोठा धक्का बसला. या प्रकरणी अनुप दिवेकर (४२), आनंद दिवेकर (४४, दोघे रा. निगडी प्राधिकरण) आणि देशमुख नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ‘जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’चे संस्थापक सुधाकरराव उद्धवराव जाधव (६५, रा. नऱ्हे) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. फसवणुकीचा हा प्रकार २५ डिसेंबर २०२३ ते जून २०२६ या कालावधीत घडला.

हेही वाचा: Crime News: अडीच लाखांची बोली लावून आणली नवरी; तिसऱ्याच दिवशी जेवणातून विष देण्याचा प्रयत्न…

दहा टक्के रक्कम भरण्याचे आमिष

संस्थेच्या विस्तारासाठी सुधाकरराव जाधव यांना मोठ्या कर्जाची गरज होती. याची माहिती मिळाल्यानंतर आरोपींनी त्यांना कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. कर्जाच्या एकूण रकमेच्या दहा टक्के रक्कम आधी भरावी लागेल, असे आरोपींनी सांगितले. आरोपींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून जाधव, त्यांच्या पत्नी आणि संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी रोख तसेच ऑनलाइन पद्धतीने वेळोवेळी ८७ लाख ६१ हजार रुपये आरोपींच्या वैयक्तिक बँक खात्यांवर तसेच ‘आदेश एंटरप्रायजेस’ या खात्यावर जमा केले.

५० कोटींच्या चेकसह बनावट कागदपत्रे

विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी जाधव यांना ५० कोटी, २५ कोटी, १० कोटी आणि ५ कोटी रुपयांचे बनावट धनादेश दिले. मात्र हे सर्व चेक बँकेत वटले नाहीत. एवढेच नव्हे तर आरोपींनी जाधव यांना वेगवेगळ्या आलिशान कार्यालयांमध्ये नेऊन कर्ज मंजूर झाल्याची बनावट पत्रे दाखवली. त्याद्वारे त्यांची सतत दिशाभूल करण्यात आली. कर्ज मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर जाधव यांनी आरोपींकडे आपले पैसे परत मागण्यास सुरुवात केली. त्यावेळी आरोपींनी पैशांनी भरल्याचे भासवून सहा बॅगा आणि दोन पेट्या त्यांच्या स्वाधीन केल्या.

पेट्या उघडताच फसवणूक उघड

बॅगा आणि पेट्या वजनाने जड असल्याने त्यामध्ये पैसे असल्याचा जाधव यांचा विश्वास बसला. मात्र घरी गेल्यानंतर पेट्या उघडल्या असता त्यात पैशांऐवजी विटा, जुन्या वर्तमानपत्रांची रद्दी, चादरी आणि उशा असल्याचे समोर आले. आपली तब्बल ८७ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जाधव यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींनी आणखी कोणाची अशाच पद्धतीने फसवणूक केली आहे का, याचा तपास सुरू आहे.

Web Title: Pune education institute owner cheated of rs 87 lakh loan fraud bricks newspapers sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 04:36 PM

Topics:  

  • Fake Currency
  • Fraud Case
  • maharashtra. pune crime
  • pune crime case

संबंधित बातम्या

Pune Crime: नाव सारखं असल्याचा फायदा घेतला, जमीनही परस्पर विकली; 3 कोटींच्या फसवणुकीने पिंपरीत खळबळ
1

Pune Crime: नाव सारखं असल्याचा फायदा घेतला, जमीनही परस्पर विकली; 3 कोटींच्या फसवणुकीने पिंपरीत खळबळ

मृत्यूपूर्वी आई-बहिणीला सांगितलं पोलिस ठाण्यात काय घडलं; 31 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, पुण्यात खळबळ
2

मृत्यूपूर्वी आई-बहिणीला सांगितलं पोलिस ठाण्यात काय घडलं; 31 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, पुण्यात खळबळ

Crime News: ओळखीच्या व्यक्तीची घरात एन्ट्री अन् काही वेळातच हत्येचा थरार; पैशांचा वाद ठरला कारणीभूत
3

Crime News: ओळखीच्या व्यक्तीची घरात एन्ट्री अन् काही वेळातच हत्येचा थरार; पैशांचा वाद ठरला कारणीभूत

सायंकाळी दुचाकीवरून निघाला अन् अचानक गायब! तीन रिक्षा-कारच्या रहस्याचा पोलिसांनी लावला छडा
4

सायंकाळी दुचाकीवरून निघाला अन् अचानक गायब! तीन रिक्षा-कारच्या रहस्याचा पोलिसांनी लावला छडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.