Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: ‘टेम्पो हळू चालवा’ म्हटल्याचा राग; वराळेत दोन गटांत तुफान हाणामारी, एकाच्या डोक्याला ९ टाके

टेम्पो हळू चालवण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला आणि काही वेळातच त्याचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले. वराळे गावात दोन गटांनी लाकडी दांडक्यांनी एकमेकांवर हल्ला केला. यात एका तरुणाच्या डोक्याला ९ टाके पडले, तर दुसऱ्याच्या हाताचे हाड मोडले.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 12, 2026 | 02:29 PM
Crime News: ‘टेम्पो हळू चालवा’ म्हटल्याचा राग; वराळेत दोन गटांत तुफान हाणामारी, एकाच्या डोक्याला ९ टाके

Crime News: ‘टेम्पो हळू चालवा’ म्हटल्याचा राग; वराळेत दोन गटांत तुफान हाणामारी, एकाच्या डोक्याला ९ टाके

Follow Us
Follow Us:
  • टेम्पोच्या वेगावरून दोन गटांत तुफान हाणामारी
  • तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत; ९ टाके पडले
  • दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल
पिंपरी-चिंचवड : भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोला हळू चालवण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. तळेगाव-म्हाळुंगे परिसरातील वराळे गावात गुरुवारी (दि. ८ ऑक्टोबर) रात्री हा प्रकार घडला. या हाणामारीत एका तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन नऊ टाके पडले, तर दुसऱ्या गटातील व्यक्तीच्या हाताचे हाड मोडले. याप्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी (उत्तर म्हाळुंगे) पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

टेम्पोच्या वेगावरून वाद पेटला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वराळे गावच्या हद्दीत गुरुवारी रात्री एक टेम्पो भरधाव वेगाने जात होता. अपघात टाळण्यासाठी त्याला हळू चालवण्यास सांगण्यात आले. मात्र, याच कारणावरून दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये वाद सुरू झाला. काही वेळातच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटांनी लाकडी दांडक्यांसह मिळेल त्या वस्तूंचा वापर करून एकमेकांवर हल्ला केला. या घटनेत दोन्ही बाजूंचे काही जण जखमी झाले.

हेही वाचा: Crime News: गाडीची तोडफोड नाही, तरी ५० लाख गायब; पोलिसांनी आठ तासांत उलगडला चोरीचा धक्कादायक कट

दोन्ही बाजूंकडून तक्रारी

रणजित संतोष हिवाळे (वय ३०, रा. वराळे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी समाधान विलास गायकवाड (वय २८) आणि सचिन विलास गायकवाड (वय ३१) यांना अटक केली आहे. त्यांच्यासह विलास पांडुरंग गायकवाड यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात एका तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन नऊ टाके पडले. दरम्यान, विलास गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रणजित हिवाळे, अजय रोहिदास आणि इतर दोन अनोळखी व्यक्तींनी गायकवाड कुटुंबीयांवर हल्ला केला. रणजित हिवाळे याने लाकडी दांडक्याने केलेल्या प्रहारामुळे विलास गायकवाड यांच्या डाव्या हाताचे हाड मोडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. किरकोळ कारणावरून वाद वाढवून कायदा हातात घेऊ नये आणि परिसरात शांतता राखावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

Web Title: Talegaon mhalunge varale tempo speed dispute two groups clash sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • Pimpri Chinchwad crime
  • pune crime news
  • Tempo

संबंधित बातम्या

रुग्णवाहिका हॉस्पिटलमध्ये पोहोचली, पण पुढच्याच क्षणी घडलं धक्कादायक; नागरिकांनी चालकाला धरलं धारेवर
1

रुग्णवाहिका हॉस्पिटलमध्ये पोहोचली, पण पुढच्याच क्षणी घडलं धक्कादायक; नागरिकांनी चालकाला धरलं धारेवर

कोल्हापुरात खळबळ! गोड बोलून कड्यावर नेलं, काही तासांत रचला बेपत्ता होण्याचा बनाव; चौकशीत प्रियकराचं भयंकर सत्य उघड
2

कोल्हापुरात खळबळ! गोड बोलून कड्यावर नेलं, काही तासांत रचला बेपत्ता होण्याचा बनाव; चौकशीत प्रियकराचं भयंकर सत्य उघड

मृत्यूपूर्वी आई-बहिणीला सांगितलं पोलिस ठाण्यात काय घडलं; 31 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, पुण्यात खळबळ
3

मृत्यूपूर्वी आई-बहिणीला सांगितलं पोलिस ठाण्यात काय घडलं; 31 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, पुण्यात खळबळ

Mumbai Crime News: दुसऱ्या लग्नाला विरोध केला, पोटच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप; वडिलांचा विषारी कट उघड
4

Mumbai Crime News: दुसऱ्या लग्नाला विरोध केला, पोटच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप; वडिलांचा विषारी कट उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.