Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बनावट नोटाप्रकरणी पाटस पोलिसांची मोठी कारवाई; चार आरोपींना घेतले ताब्यात

पाटस पोलीसांनी पाटस येथे बनावट नोटांचा वापर करण्यासाठी आलेल्या दोन‌ परप्रांतीयांना तब्बल दीड लाख रुपयांसह ताब्यात घेतले होते.‌ या प्रकरणी पाटस पोलिसांनी ठाणे आणि धुळे येथून आणखी चार आरोपींना अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 04, 2024 | 03:00 PM
बनावट नोटाप्रकरणी पाटस पोलिसांची मोठी कारवाई; चार आरोपींना घेतले ताब्यात

बनावट नोटाप्रकरणी पाटस पोलिसांची मोठी कारवाई; चार आरोपींना घेतले ताब्यात

Follow Us
Follow Us:

पाटस/राजेंद्र झेंडे : पाटस पोलीसांनी पाटस येथे बनावट नोटांचा वापर करण्यासाठी आलेल्या दोन‌ परप्रांतीयांना तब्बल दीड लाख रुपयांसह ताब्यात घेतले होते.‌ या प्रकरणी पाटस पोलिसांनी ठाणे आणि धुळे येथून आणखी चार आरोपींना अटक केली आहे.

पुणे- सोलापूर महामार्गावरील पाटस येथे सोमवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या अमित कुमार रामभाऊ यादव (वय ३१, बिहार, सध्या रा. कोंढवा, पुणे) व‌ राकेश चंद्रशेखर यादव (वय ४२, बिहार, हल्ली रा. पाटस ता. दौंड जि. पुणे ) या दोघांना सापळा रचून अटक केली होती. पोलीसांनी दुचाकीसह अडीच लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या.‌ या प्रकारचा तपास पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांच्याकडे सोपवण्यात आला होता.

पोलीस उपनिरीक्षक यांनी शेख यांनी ठाणे आणि धुळे जिल्ह्यातून चार आरोपांना याप्रकरणी अटक केली आहे. या प्रकरणात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असून, बनवट नोटा छापून त्याची महाराष्ट्रासह परराज्यात मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे, बनावट नोटा छापाई करणारे मोठे रॅकेट असल्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे.

पोलीसांनी भावेश संतोष पाटील (वय-२४ रा. भिवंडी जि. ठाणे , नयन धनाजी चौधरी ( वय-२१ रा. तुलई मुरबाड जि. ठाणे), भावगीर उर्फ महेश छोटुगीर गोसावी (वय ३० कांतीनगर शिरपुर जि. धुळे, संजय भगवान निकुंभे ( वय ४९ रा. कांतीनगर शिरपुर जि. धुळे) चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. या आरोपींना गुरुवारी ( दि. ३) दौंड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवार (दि. ७ ) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.‌ ही माहिती पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी दिली.‌

दरम्यान, काही वर्षांपूर्वी दौंड शहरात आहे बनावट नोटा छपाई प्रकरणी काही जणांवर कारवाई केली होती. दौंड तालुक्यात एवढ्या मोठ्या बनवट नोटा आल्या कुठून. आत्तापर्यंत या बनावट नोटांचा किती ठिकाणी वापर करण्यात आला.‌ तालुक्यात बनावट नोटा छापणारे रॉकेट आहे का ? यामध्ये काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे किंवा राजकीय व्यक्तींचा सहभाग आहे का ? अशी शक्यता वर्तवली जात असून, पोलीसांनी त्या अनुषंगाने तपास करण्याची मागणी होत आहे.‌

Web Title: Patas police have arrested four accused in the case of fake notes nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2024 | 03:00 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Patas
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
1

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
2

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
3

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
4

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.