Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pavai Crime: पित्याचा क्रूर चेहरा! ४ वर्षीय चिमुकला दुधासाठी रडला आणि जन्मदात्या पित्याने भिंतीवर आपटला

मुंबईच्या पवई परिसरात भूक लागल्याने आणि दुधासाठी रडणाऱ्या 4 वर्षीय यश सिंग या चिमुकल्याची त्याच्या जन्मदात्या पित्यानेच हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रागाच्या भरात मुलाला भिंतीवर आणि फरशीवर आपटल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 31, 2026 | 08:11 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • दुधासाठी रडणाऱ्या 4 वर्षीय मुलाला वडिलांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप.
  • मुलाला भिंतीवर आणि फरशीवर आपटल्याने गंभीर दुखापत होऊन मृत्यू.
  • पवई पोलिसांनी आरोपी वडिलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली.
मुंबई: मुंबई येथील पवई परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. ४ वर्षीय चिमुकल्याला भूक लागल्याने तो दुधासाठी रडत होता. याच रडण्याला कंटाळून जन्मदात्या पित्यानेच त्याला भिंतीवर आणि फरशीवर आपटून निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे पवई परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Crime News : बोगस डॉक्टरला खामगाव येथून ठोकल्या बेड्या; यवत पोलिसांची मोठी कारवाई

नेमकं काय घडलं?

या प्रकरणातील मृत्यू झालेल्या मुलाचे नाव यश सिंग (वय ४) असे आहे. आरोपी वडिलांचे नाव राजेश प्रकाश सिंग आहे. राजेश हा पवईतील गौतमनगर- मोरारजीनगर परिसरात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळच्या सुमारास यश हा भूक लागल्याने दुधासाठी हट्ट करत रडत होता. यामुळे राजेश संतापला. त्याने संतापून आपल्याला मुलाला बेदम मारहाण केली.

आरोपीने आधी मुलाला उचलून भिंतीवर आपटले. त्यानंतर त्याचे डोके फरशीवर आढळले आणि यश गंभीर जखमी झाला. मुलाची प्रकृती बिघडल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला तातडीने जवळील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच आरोपीच्या बहिणीला मिळाल्यानंतर तिने तातडीने पोलिसांना याबाबत कळवले. माहिती मिळताच पवई पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन अहवालानंतर मुलाच्या मृत्यूमागील नेमके कारण अधिक स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी आरोपी राजेश सिंग यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. या घटनेनें परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

कर्जत पळसदरी महामार्ग रस्त्याच्या कडेला महिलेचा मृतदेह, घातपाताची शक्यता

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत मुलाचे नाव काय होते?

    Ans: मृत मुलाचे नाव यश सिंग (वय 4) असे होते.

  • Que: मुलाच्या मृत्यूला कारणीभूत काय ठरले?

    Ans: दुधासाठी रडत असल्याच्या रागातून वडिलांनी त्याला भिंतीवर व फरशीवर आपटल्याने त्याचा मृत्यू झाला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पवई पोलिसांनी आरोपी राजेश सिंग याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Web Title: Pavai crime cruel face of father 4 year old chimukala milk satisfied milkmaid and mother in law father in law aaptala

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 08:11 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

MMRDA News: कोपरी पुलावर काळजाचा ठोका चुकवणारी घटना! कारवर कोसळल्या लोखंडी सळ्या; MMRDA ने ठोठावला २ कोटींचा दंड
1

MMRDA News: कोपरी पुलावर काळजाचा ठोका चुकवणारी घटना! कारवर कोसळल्या लोखंडी सळ्या; MMRDA ने ठोठावला २ कोटींचा दंड

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत
2

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
3

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Mumbai Credit Card: सणासुदीच्या खरेदीत मुंबईकर देशात अव्वल! क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर; ७७ टक्के शहरी भारतीयांचा खर्च वाढला
4

Mumbai Credit Card: सणासुदीच्या खरेदीत मुंबईकर देशात अव्वल! क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर; ७७ टक्के शहरी भारतीयांचा खर्च वाढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.