Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCMC News: पिंपरीत पोलिसाचा प्रताप: 12 च्या ठोक्याला पोलिस स्टेशनसमोर केले सेलिब्रेशन; पोलिस आयुक्तांनी थेट…

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर समाजातील विविध क्षेत्रांतून टीका होऊ लागली. याची दखल घेत पोलिस आयुक्त विनाकुमार चौबे यांनी सांगवी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह, चार पोलिस अंमलदारांवर कारवाई केली

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 07, 2025 | 06:42 PM
PCMC News: पिंपरीत पोलिसाचा प्रताप: 12 च्या ठोक्याला पोलिस स्टेशनसमोर केले सेलिब्रेशन; पोलिस आयुक्तांनी थेट...

PCMC News: पिंपरीत पोलिसाचा प्रताप: 12 च्या ठोक्याला पोलिस स्टेशनसमोर केले सेलिब्रेशन; पोलिस आयुक्तांनी थेट...

Follow Us
Follow Us:

पिंपरी: पोलिस ठाण्यासमोरच रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे एक पोलिस अंमलदराला चांगलेच महागात पडले आहे. बुधवारी (५ मार्च) रात्री बाराच्या ठोक्याला सांगवी पोलिस ठाण्यासमोर काही तरुणांनी पोलिस अंमलदराचा मोठ्या थाटामाटात वाढदिवस साजरा केला. याचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करून सर्वांनी समाजमाध्यमांवर व्हायरल केले.  मात्र, ही बाब पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी संबंधित तीन पोलिस अंमलदारांना निलंबित केले. तर, वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला नियंत्रण कक्षाला संलग्न केले आहे.

सांगवी पोलिस ठाण्यासमोर बुधवारी रात्री बारा वाजता ही घटना घडली. वाढदिवस असणारे पोलिस अंमलदार प्रवीण पाटील याच्यासह अंमलदार विवेक गायकवाड, सुहास डंगारे, विजय मोरे यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. तर, सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बनसोडे यांना नियंत्रण कक्षाला संलग्न करण्यात आले आहे.

गुरुवारी (६ मार्च) पोलिस अंमलदार प्रवीण पाटील यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्त बुधवारी (५ मार्च) रात्री बारा वाजताच त्यांचे काही मित्र सांगवी पोलिस ठाण्यासमोर जमा झाले.  त्यात पोलिस स्टेशनमधील इतर कर्मचारी आणि काही गुन्हेगारांचाही समावेश होता, असे प्रत्यक्षदर्शींचे मत होते. मध्यरात्री बाराच्या ठोक्याला ‘दादा’ लिहलेला दुमजली केक कापण्यात आला. त्यावेळी इतरांच्या हातात फायर गन, स्काय शॉट होते. रस्त्यातच फटाक्यांची आतिषबाजी केली. आकाशात भुईनळ, या जल्लोषाचे ड्रोनद्वारे चित्रीकरण केले आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल ही केला आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर समाजातील विविध क्षेत्रांतून टीका होऊ लागली. याची दखल घेत पोलिस आयुक्त विनाकुमार चौबे यांनी सांगवी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह, चार पोलिस अंमलदारांवर कारवाई केली आहे.

PCMC Crime: दरोडेखोरांचा उपायुक्तांवर कोयत्याने भीषण हल्ला; धुमश्चक्रीत पोलिसांनी…, वाचा थरारक घटनासांगवी पोलिस ठाण्यासमोर मध्यरात्री पोलिस कर्मचाऱ्याचा वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी चार पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांची नियंत्रण कक्षाला बदली करण्यात आली आहे.
– विशाल हिरे,सहाय्यक पोलिस आयुक्त

दरोडेखोरांचा उपायुक्तांवर कोयत्याने भीषण हल्ला

दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दरोडेखोरांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला केला.  या हल्ल्यात एक पोलिस उपायुक्त आणि एक सहाय्यक पोलिस निरिक्षक जखमी झाले. मात्र, पोलिस उपायुक्तांनी स्वरक्षणार्थ आणि टीमच्या रक्षणासाठी आपल्या सर्विस रिवोल्वरद्वारे दोन गोळ्या झाडून दरोडेखोराला जायबंदी केले. त्यानंतर दरोडेखोराला अटक केली. दरम्यान, दुसरा अल्पवयिन दरोडेखोर घाबरून पळून गेला असता पोलिसांनी त्यालाही पकडून अटक केले. चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन मार्च रोजी मध्यरात्री ही थरारक घटना घडली. सचिन चंदर भोसले आणि एका अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रसन्न जऱ्हाड हे या घटनेत जखमी झाले आहेत.

Web Title: Pcmc police commisioner suspended three police because officers celebrated birthday front of police station crime marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2025 | 06:42 PM

Topics:  

  • crime news
  • PCMC News
  • PCMC POLICE

संबंधित बातम्या

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
1

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
2

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
3

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
4

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.