
‘तो’ VIDEO गुन्हा नाही! PFI सदस्याला हायकोर्टाकडून जामीन; न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण
Pune Crime : पुण्यात अनैतिक संबंधाचा थरार! भरचौकात तरुणावर चाकूने सपासप वार, बायको-मुलासमोरच मृत्यू
खटला लवकर संपण्याची शक्यता नसल्यामुळे मोहम्मद इक्बाल इब्राहिम खानला जामिनावर मुक्त करणे योग्य असल्याचे निरीक्षण न्या. सारंग कोतवाल आणि न्या. रणजितसिंह राजे भोंसले यांच्या खंडपीठाने आपल्या आदेशात नमूद केले. खानचा कथित गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे दर्शवणारा कोणताही ठोस पुरावा सादर करण्यास सरकारी पक्ष अपयशी ठरला. त्यामुळे खानविरोधात पोलिसांकडे नोंदवलेले साक्षीदारांचे जबाब निरुपद्रवी ठरत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. खानवरील आरोपांवरून तो पीएफआयचा सदस्य होता; परंतु त्याच्यावरील ठेवण्यात आलेल्या कोणतेही गुन्हे सिद्ध होत नाहीत.
खानच्या फोनवरील पेट्रोल बॉम्ब बनवण्याच्या पद्धतीचा व्हिडिओ विचारात घेतल्यास त्याने ती क्लिप इतर कोणालाही पाठवली नव्हती किंवा ती पद्धत वापरण्यासाठी कोणालाही प्रवृत्त केले नव्हते, असेही न्यायालयाने खानला जामीन देताना नमूद केले, तसेच या प्रकरणी मार्चमध्ये आरोप निश्चित केले असले तरी, आजपर्यंत एकाही साक्षीदाराची साक्ष नोंदवलेली नाही. किमान ९० साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात येणार आहे, त्यामुळे हा खटला भविष्यात वेळेत पूर्ण होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट करून न्यायालयाने खानला जामीन मंजूर केला.
Crime News : खंडणी न दिल्याने रचला हत्येचा डाव; पोलिसांनाच धक्काबुक्की, दोघे अटकेत
सरकारने काय केला होता दावा?
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) खानला सप्टेंबर २०२२ मध्ये अटक केली होती आणि तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्यावर भारतीय दंड संहिता आणि बेकायदा कारवाया प्रतिबंधच्या (युएपीए) विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले होते. खान पीएफआयचा सक्रिय सदस्य होता. त्याने या प्रकरणातील इत्तर आरोपीसह भारताविरुद्ध बड करण्याचा कट रचला होता आणि फेब्रुवारी ते जून २०२२ या काळात शहरात अनेक बैठका घेतल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला. त्याच्या मोबाईल फोनमध्ये पेट्रोल बॉम्ब कसे बनवायचे हे दाखवणारे व्हिडिओ सापडल्याचेही सरकारच्या वतीने न्यायालायाला सांगण्यात आले.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)