Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मला खुश कर, दोन काय दहा दिवस सुट्या देतो…’; कंपनीतील वरिष्ठाकडून महिलेचे लैंगिक शोषण

कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने एका महिला कर्मचाऱ्याला 'तू खूप सुंदर आहेस, मला आवडतेस, मला खुश कर, दोन दिवस काय दहा दिवस सुट्या देईन आणि पगारही कापणार नाही', असे म्हणत लैंगिक शोषण केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 30, 2026 | 08:30 AM
प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार

प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार

Follow Us
Follow Us:

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यातच महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता सुट्टीच्या नावाने कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने एका महिला कर्मचाऱ्याला ‘तू खूप सुंदर आहेस, मला आवडतेस, मला खुश कर, दोन दिवस काय दहा दिवस सुट्या देईन आणि पगारही कापणार नाही’, असे म्हणत लैंगिक शोषण केल्याची घटना बांभोरीतील अॅस्टोमो कंपनीत घडली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून जनार्दन नामक अधिकाऱ्यावर धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आजारी मुलीच्या शुश्रुषेसाठी सुटी मागितली असता हा प्रकार झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. आरोपी अधिकारी फरार असून, पोलिस आरोपीचा शोध घेत असल्याचे पोलीस अंमलदार अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले.

मारहाण, जमिनीवर पाडून अश्लील चाळे 

या कृत्याचा प्रतिकार केला तेव्हा अधिकाऱ्याने पीडित महिलेच्या कानशिलात लगावली. पीडितेला जमिनीवर पाडून तिच्याशी अश्लील चाळे केले. गुंड आणि राजकारणी माझ्या ओळखीचे आहेत. तू कोणाला काही सांगितले, तर तुझ्यासह कुटुंबाला संपवून टाकीन, अशी धमकीही त्याने पीडितेला दिली. घटनेचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेला गप्प करण्याचा प्रयत्न केला.

52 वर्षीय नराधमाचा चिमुरडीवर अत्याचार

दुसऱ्या एका घटनेत, बारामती शहरातील अनंतआशा नगर परिसरात राहणाऱ्या एका 52 वर्षीय नराधमाने ओळखीचा गैरफायदा घेत 10 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. हसन शमशुद्दीन झारे उर्फ राजू (वय ५२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो पीडित बालिकेच्या शेजारीच राहत असून, पीडितेच्या कुटुंबाशी त्याची जुनी ओळख होती. याच ओळखीचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या घरी नेले. घरात कोणीही नसताना त्याने मुलीवर अत्याचार केला. यानंतर ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती.

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार; ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली अन् अडीच लाखही उकळले

Web Title: Physical harassment of a woman by a senior colleague at the company

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • crime news
  • jalgaon Crime
  • physical harassment

संबंधित बातम्या

वांद्र्यात नशेचा धिंगाणा; हाताला जोरदार चावा घेतल्याने  महिला पोलिसाचा हात रक्तबंबाळ, नेमके प्रकरण काय?
1

वांद्र्यात नशेचा धिंगाणा; हाताला जोरदार चावा घेतल्याने महिला पोलिसाचा हात रक्तबंबाळ, नेमके प्रकरण काय?

Pune Crime: हत्या कशी करावी ते चौकशीत कसे वागावे; केतन प्रकरणात आरोपींच्या ऑनलाइन सर्चचा खुलासा
2

Pune Crime: हत्या कशी करावी ते चौकशीत कसे वागावे; केतन प्रकरणात आरोपींच्या ऑनलाइन सर्चचा खुलासा

Sahil Wakode IIT Bombay Suicide Case: साहिलसोबतच्या ‘शेवटच्या भेटीत नक्की काय घडलं?’ जवळच्या मित्राने सांगितली हकीकत
3

Sahil Wakode IIT Bombay Suicide Case: साहिलसोबतच्या ‘शेवटच्या भेटीत नक्की काय घडलं?’ जवळच्या मित्राने सांगितली हकीकत

Delhi Crime: रस्त्यात धक्का लागला अन् वाद वाढला; चाकूहल्ल्याच्या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक
4

Delhi Crime: रस्त्यात धक्का लागला अन् वाद वाढला; चाकूहल्ल्याच्या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.