Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pimpri Chinchwad News: पत्नीने दारू पिण्यास नकार दिल्याने पतीची आत्महत्या; विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू

पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड येथे पत्नीने दारू पिण्यास विरोध केल्याच्या रागातून एका व्यक्तीने ढेकूण मारण्याचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 03, 2026 | 11:08 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पत्नीने दारू पिण्यास नकार दिल्याने पतीने विषारी औषध प्राशन केले.
  • उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला.
  • चिंचवड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने दारू पिण्यास मनाई केल्याचा राग अनावर झाल्याने एका पतीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या आत्महत्येच्या घटनेमुळे लोहार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे शहरात गेल्या काही दिवसांपूर्वी विषारी दारूमुळे १८ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. आता एका व्यक्तीने दारूसाठी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव अरविंद लक्ष्मण लोहार असे आहे. अरविंद लोहार यांना दारू पिण्याचे प्रचंड व्यसन होते. या व्यसनामुळे त्यांच्या घरात वारंवार वाद होत होते.

खान सरांच्या कोचिंग सेंटरबाहेर फायरिंग, सिक्योरिटी गार्डला मारहाण; स्वस्त फी ठरली कारणीभूत?

नेहमीप्रमाणे अरविंद यांनी दारू पिण्याचा हट्ट केला, त्यांच्या पत्नीने त्यांना दारू पुण्यास साद नकार दिला. यावरून पती-पत्नीमध्ये जोरदार वाद आणि भांडण झाले. पत्नीने आपल्याला दारू पिण्यापासून रोखल्याचा राग अरविंद यांच्या मनाला एवढा लागला की, त्यांनी तातडीने घरात ठेवलेले ढेकूण मारण्याचे विषारी औषध प्राशन केले.

काही वेळातच अरविंद यांची प्रकृती झपाट्याने बिघडू लागली आणि ते वेदनेने विव्हळू लागले. हे पाहताच त्यांच्या पत्नीने शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना तातडीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या थेरगाव येथील रुग्णालयात आयसीयू विभागात दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू केले. मात्र शरीरात विष पूर्णपणे पसरल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Beed Crime: घरासमोर लघुशंका आणि जुगार अड्ड्याला दलित महिलेचा विरोध; महिलेच्या गुप्तांगावर बेल्टने मारहाण, एवढेच नाही तर…

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत व्यक्तीचे नाव काय होते?

    Ans: मृत व्यक्तीचे नाव अरविंद लक्ष्मण लोहार असे होते.

  • Que: आत्महत्येमागचे प्राथमिक कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: पत्नीने दारू पिण्यास विरोध केल्यामुळे झालेल्या वादातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

  • Que: अरविंद लोहार यांना कुठे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते?

    Ans: त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या थेरगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Web Title: Pimpri chinchwad news husband commits suicide after wife refuses to drink alcohol dies after consuming poison

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • crime
  • Pimpri Chinchwad
  • Pimpri Chinchwad crime

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
2

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

कचरा कोंडीवरून पिंपरी महापालिकेत रणकंदन; मोशी डेपोला टाळे ठोकण्याचा नगरसेवकांचा इशारा
3

कचरा कोंडीवरून पिंपरी महापालिकेत रणकंदन; मोशी डेपोला टाळे ठोकण्याचा नगरसेवकांचा इशारा

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
4

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.