Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या टोळीला ठोकल्या बेड्या; 4 पिस्तुले अन् 7 जिवंत काडतुसे जप्त

अवैध पिस्तुलांची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 13, 2026 | 06:09 PM
पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या टोळीला ठोकल्या बेड्या; 4 पिस्तुले अन् 7 जिवंत काडतुसे जप्त

पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या टोळीला ठोकल्या बेड्या; 4 पिस्तुले अन् 7 जिवंत काडतुसे जप्त

Follow Us
Follow Us:

पिंपरी : अवैध पिस्तुलांची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. संशयितांकडून चार देशी बनावटीची पिस्तुले, सात जिवंत काडतुसे, तीन मोबाईल फोन आणि एक कार असा सुमारे १० लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमाटणे फाटा परिसरात करण्यात आली आहे.

 

सरदार अकबर सय्यद (वय २७, रा. तळेगाव दाभाडे), विशाल नाना कुडेकर (३५, रा. खेड), प्रशांत बबुशा सोनवणे (२८, सध्या रा. चेंबूर, मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पाेलिस उपायुक्त डाॅ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अवैध पिस्तूल बाळगणाऱ्या व त्यांची तस्करी करणाऱ्या संशयितांवर कारवाईचे आदेश पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिले होते. त्यानुसार मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.

पथकाला माहिती मिळाली की, संशयित हे सोमाटणे फाटा परिसरात पिस्तूल विक्रीसाठी येणार आहेत. त्यानुसार १० मार्च रोजी पोलिसांनी सापळा रचला. निर्जन ठिकाणी असलेल्या कारमधून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तीन देशी बनावटीची पिस्तुले व सहा जिवंत काडतुसे आढळून आली. पुढील तपासात संशयित प्रशांत सोनवणे याच्याकडून आणखी एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहायक पोलिस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक निरीक्षक गोरक्षनाथ बालवडकर, पांडुरंग देवकाते, रावसाहेब मोटे, श्रेणी उपनिरीक्षक महेश खांडे, पोलिस अंमलदार गणेश सावंत, विनोद वीर, हर्षद कदम, गणेश कोकणे, गणेश हिंगे, नितीन लोखंडे, प्रवीण कांबळे, विशाल गायकवाड, समीर रासकर, मोहसीन आत्तार, अमोल गोरे, ज्ञानेश्वर कौलगे, अमर कदम, चंद्रकांत गडदे, औदुंबर रौंगे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

हे सुद्धा वाचा : फॉर्च्यूनर गाडीमधून गांजाची तस्करी! पुणे पोलिसांनी आरोपीला सापळा रचून पकडले

अपहरण, खंडणीचेही गुन्हे दाखल

सरदार सय्यद याने ही पिस्तुले मध्यप्रदेशातील उमरटी येथील गुरुसिंग नावाच्या व्यक्तीकडून आणल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. सरदार सय्यद याच्याविरुद्ध चाकण पोलिस ठाण्यात अपहरण व खंडणीसंबंधी गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Pimpri chinchwad police have arrested a gang that came to sell pistols

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 06:09 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pimpri Crime

संबंधित बातम्या

धक्कादायक ! गतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार; एकाच परिसरात दोनवेळा घडलं भयानक कृत्य
1

धक्कादायक ! गतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार; एकाच परिसरात दोनवेळा घडलं भयानक कृत्य

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
2

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप
3

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
4

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.