Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॅग तपासली अन् ६ गुन्ह्यांची उकल, पिंपरी गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना भक्ती-शक्ती चौकात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या दोघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्या बॅगेत घरफोडीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 01, 2026 | 12:06 PM
बॅग तपासली अन् ६ गुन्ह्यांची उकल, पिंपरी गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

बॅग तपासली अन् ६ गुन्ह्यांची उकल, पिंपरी गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

Follow Us
Follow Us:
  • बॅग तपासली अन् ६ गुन्ह्यांची उकल
  • पिंपरी गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
  • लाखोंचा मुद्देमाल जप्त
पिंपरी : घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना भक्ती-शक्ती चौकात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या दोघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्या बॅगेत घरफोडीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले आहे. दोन घरफोड्या आणि चार दुचाकी चोरी अशा सहा गुन्ह्यांचा चौकशीतून उलगडा झाला आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून तीन लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विकास ऊर्फ जंगल्या मिलिंद कांबळे (वय ३५, रा. पिंपरी) आणि गौतम धर्मलिंगम नाडार (वय २८, रा. राजगुरुनगर, ता. खेड, जि. पुणे) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांना काळेवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट एकचे पथक सोमवारी (दि. २९ सप्टेंबर) घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या अनुषंगाने गस्त घालत होते. भक्ती-शक्ती चौकातील पीएमपीएमएल बसथांब्याजवळ दोन जण संशयास्पदरीत्या आढळले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील बॅग पंचांसमक्ष तपासली. त्यात मोठे स्क्रू ड्रायव्हर, हातोडा, छन्नी आणि करवत असे घरफोडीसाठी वापरण्यात येणारे साहित्य मिळाले. दोघांकडे अधिक चौकशी केली असता काळेवाडी आणि मार्केट यार्ड पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील प्रत्येकी एक घरफोडी तसेच चिखली पोलिस ठाण्यातील एक आणि संत तुकारामनगर पोलिस ठाण्यातील तीन दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याची त्यांनी कबुली दिली. या सहा गुन्ह्यांतील मुद्देमाल व दुचाकी असा एकूण तीन लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, सहायक आयुक्त डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे, उपनिरीक्षक कर्मराज गावडे, पोलिस अंमलदार विजय शेळकंदे, मनोज राठोड, अजय डगले, उद्धव खेडकर, संदेश देशमुख, विजय जानराव, तेजस भालचिम यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

हे सुद्धा वाचा : शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

Web Title: Pimpri chinchwad police have arrested thieves who broke into a house and committed theft

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • House Theft

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
1

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड
2

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड

Baramati Chain Snatching: दुचाकीवरुन भामटे आले; किराणा दुकानातून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लांबवले
3

Baramati Chain Snatching: दुचाकीवरुन भामटे आले; किराणा दुकानातून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लांबवले

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
4

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.