Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिंजवडीत पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; नागरिकांची फसवणूक करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

दोन बनावट कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणार्‍या टोळीचा पिंपरी चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दोन्ही बनावट कॉल सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी मालक व मॅनेजर अशा चार जणांना अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 15, 2025 | 03:23 PM
हिंजवडीत पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; नागरिकांची फसवणूक करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

हिंजवडीत पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; नागरिकांची फसवणूक करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यासह जगभरात फसवणुकीच्या घटना वाढल्या
  • आयटी पार्कमधील दोन बनावट कॉल सेंटरवर छापा
  • नागरिकांची फसवणूक करणार्‍या टोळीचा पर्दाफाश
पिंपरी : राज्यासह जगभरात फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील दोन बनावट कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणार्‍या टोळीचा पिंपरी चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दोन्ही बनावट कॉल सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी मालक व मॅनेजर अशा चार जणांना अटक केली आहे. तर, १८ कर्मचार्‍यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान त्यामध्ये स्काय हाय तोलुशन या कंपनीचा मालक सागर कुमार यादव (वय ३२, रा. हिंजवडी), मॅनेजर आनंद पंकज सिन्हा (वय २९, रा. वृंदावन सोसायटी, वाघोली) तसेच, टेक लॉ सोलुशन कॉल सेंटरचा मालक धनंजय साहेबराव कासार (वय २५, रा. माण, ता. मुळशी) व मॅनेजर हर्षद शंकर खामकर (वय २८, रा. सेल पेट्रोल पंपाजवळ, हिंजवडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर, या दोन्ही कॉल सेंटरमधील एकूण १८ कर्मचार्‍यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत हिंजवडी भागात वेगवेगळे बनावट कॉल सेंटर असल्याची माहिती पोलीस आयुक्त विनयकुमार
चौबे यांना प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांनी सायबर पोलीस ठाणे व गुन्हे शाखा युनिट दोनची दोन पथके तयार करुन संबधीत कॉल सेंटरवर छापा टाकून कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार, सायबर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे व युनिट दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांच्या पथकाने हिंजवडी टप्पा येथील दोन वेगवेगळ्या अनधिकृत कॉल सेंटरवर छापा टाकला.

या दोन्ही कॉल सेंटरमधील कर्मचारी अमेरीकेतील नागरीकांशी वेगवेगळ्या नावाने इंग्रजीमध्ये अमेरिकेतून मेडीकल हेल्थ डिपार्टमेंट बोलत असल्याचे सांगून काही औषधांमुळे कॅन्सर होतो, असे सांगत ही औषधे वापरणार्‍या व्यक्तींची कॉलद्वारे माहिती घेत असत. तसेच, त्यांना सबंधित कंपनी विरोधात कोर्टात जाण्यासाठी व त्यामधून चांगले कम्पेंसेशन मिळवून देण्याचे आमीष दाखवून त्यांची माहीती अमेरिकेतील लॉ फर्मला दिली जात असे. त्यानंतर लॉ फर्म कडून डॉलर स्वरुपात कमिशनची रक्कम प्राप्त करण्यात येत होती.

Web Title: Pimpri chinchwad police have busted a gang that was cheating citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2025 | 03:22 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Froud News

संबंधित बातम्या

येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पळाला; जेवून येतो म्हणून गेला अन्…
1

येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पळाला; जेवून येतो म्हणून गेला अन्…

दुसऱ्या लग्नाला विरोध; संतापलेल्या माजी सैनिक वडिलांनी मुलावर झाडली गोळी, नंतर स्वतःलाही संपवलं
2

दुसऱ्या लग्नाला विरोध; संतापलेल्या माजी सैनिक वडिलांनी मुलावर झाडली गोळी, नंतर स्वतःलाही संपवलं

Pune Crime : धारधार हत्याराने सपासप वार करून तरुणाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर
3

Pune Crime : धारधार हत्याराने सपासप वार करून तरुणाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर

Sindhudurg : इंधन समस्या मोठी समस्या आहे त्यासाठी अधिकारी, लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणं गरजेच !
4

Sindhudurg : इंधन समस्या मोठी समस्या आहे त्यासाठी अधिकारी, लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणं गरजेच !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.