Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सायबर भामट्यांचे धाबे दणाणले! 11 कोटींच्या फसवणूक प्रकरणी टोळीवर ‘मकोका’; पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई

पिंपरी-चिंचवड शहरात सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी या भामट्यांना जबरदस्त दणका दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 22, 2026 | 12:30 AM
सायबर भामट्यांचे धाबे दणाणले! 11 कोटींच्या फसवणूक प्रकरणी टोळीवर 'मकोका'; पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई

सायबर भामट्यांचे धाबे दणाणले! 11 कोटींच्या फसवणूक प्रकरणी टोळीवर 'मकोका'; पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी या भामट्यांना जबरदस्त दणका दिला आहे. एका निवृत्त ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ११ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीवर ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कारवाई केली आहे. सायबर गुन्हेगारांविरुद्ध मकोका लावण्याची ही पहिलीच घटना ठरली आहे.

 

नेमकं प्रकरण काय?

काही महिन्यांपूर्वी एका ज्येष्ठ नागरिकाला बनावट ‘ट्रेडिंग ॲप’च्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून फिर्यादीने तब्बल ११ कोटींहून अधिक रक्कम गमावली होती. सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक तपास करून तपासाची चक्रे कोल्हापूर, पुणे, मुंबई आणि थेट राजस्थानच्या उदयपूरपर्यंत फिरवली. या तपासात पोलिसांनी आतापर्यंत २ कोटी ६५ लाख ७६ हजार रुपये जप्त करून ते न्यायालयामार्फत फिर्यादीला परत मिळवून दिले आहेत.

९ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

या संघटित टोळीमध्ये अभय बाबासाहेब पाटील (कोल्हापूर), शिवतेज पोटे (पुणे), युवराज मुदलियार (पुणे), रोनी गिरीगोस्वामी (उदयपूर) यांच्यासह एकूण ९ आरोपींचा समावेश आहे. हे आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून गुंतवणुकीचे खोटे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करायचे. विशेष म्हणजे, फसवणुकीची ही रक्कम ‘USDT’ सारख्या आभासी चलनात रूपांतरित करून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांशी संबंध जोडले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांनी या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (१९९९) नुसार कारवाईचे आदेश दिले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे आणि त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सायबर गुन्हेगारांना आता केवळ तुरुंगवास नाही, तर ‘मकोका’सारख्या कडक कायद्याचा सामना करावा लागणार आहे. ही कारवाई म्हणजे डिजिटल युगातील गुन्हेगारांसाठी एक मोठा इशारा आहे. नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये किंवा जादा परताव्याच्या आमिषाला बळी पडू नये.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक) बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे १) विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, प्रकाश कातकडे तसेच अंमलदार दिपक भोसले, हेमंत खरात, सुभाष पाटील, विनायक म्हसकर, अतुल लोखंडे, सौरभ घाटे, श्रीकांत कबुले, महेश मोटकर, प्रविण शेळकंदे, सोपान बोधवड, सुरज शिंदे, दिपक माने, स्वप्नील खनसे, शिवाजी बनसोडे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

Web Title: Pimpri chinchwad police have taken major action against a gang that was defrauding citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • cyber crime
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

Navi Mumbai : 42 हजाराचं लाच प्रकरण, पालिकेचे उपायुक्त निलंबित, नव्या अधिकाऱ्याकडे जाणार का पदभार?
1

Navi Mumbai : 42 हजाराचं लाच प्रकरण, पालिकेचे उपायुक्त निलंबित, नव्या अधिकाऱ्याकडे जाणार का पदभार?

Yusuf Pathan News: खासदार युसूफ पठाणच्या सासऱ्याला पोलिसांनी केलं अटक; मेहुण्यालाही ठोकल्या बेड्या; नेमकं प्रकरण काय?
2

Yusuf Pathan News: खासदार युसूफ पठाणच्या सासऱ्याला पोलिसांनी केलं अटक; मेहुण्यालाही ठोकल्या बेड्या; नेमकं प्रकरण काय?

Pune Crime News : व्यवहार पुर्ण न करता फ्लॅटचा ताबा घेतला; दाम्पत्यावर पुण्यात गुन्हा दाखल
3

Pune Crime News : व्यवहार पुर्ण न करता फ्लॅटचा ताबा घेतला; दाम्पत्यावर पुण्यात गुन्हा दाखल

अनैसर्गिक संबंधासाठी पोलिसाचा दबाव; 24 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
4

अनैसर्गिक संबंधासाठी पोलिसाचा दबाव; 24 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.