Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: गाडीची तोडफोड नाही, तरी ५० लाख गायब; पोलिसांनी आठ तासांत उलगडला चोरीचा धक्कादायक कट

मुंबईहून आणलेली तब्बल ५० लाख रुपयांची रोकड पुण्यात कारमध्ये ठेवण्यात आली. काही वेळातच रोकड गायब झाली; मात्र कारची कोणतीही तोडफोड झालेली नव्हती. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या आठ तासांत चोरीचा पर्दाफाश केला. धक्कादायक म्हणजे फिर्यादीसोबत मुंबईला गेलेल्या व्यक्तीनेच साथीदाराच्या मदतीने हा कट रचला होता.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 12, 2026 | 12:33 PM
Crime News: गाडीची तोडफोड नाही, तरी ५० लाख गायब; पोलिसांनी आठ तासांत उलगडला चोरीचा धक्कादायक कट

Crime News: गाडीची तोडफोड नाही, तरी ५० लाख गायब; पोलिसांनी आठ तासांत उलगडला चोरीचा धक्कादायक कट

Follow Us
Follow Us:
  • मुंबईहून आणलेली ५० लाखांची रोकड कारमधून चोरीला
  • बनावट चावीने कार उघडून रोकड लंपास
  • फिर्यादीसोबत मुंबईला गेलेल्याचाच चोरीत सहभाग
पिंपरी-चिंचवड : एखाद्या व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवणे कधी कधी चांगलेच महागात पडू शकते. समोरची व्यक्ती आपली आणि विश्वासू वाटत असली, तरी तिच्या मनात काय कट शिजतोय, याची कल्पना नसते. असाच धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये समोर आला आहे. मुंबईहून आणलेली तब्बल ५० लाख रुपयांची रोकड पुनावळे येथे कारमध्ये ठेवण्यात आली होती. काही वेळातच ही रोकड कारमधून गायब झाली. विशेष म्हणजे कारची कोणतीही तोडफोड झालेली नव्हती. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या आठ तासांत या चोरीचा छडा लावला.

बनावट चावीने कार उघडून रोकड लंपास

एका व्यक्तीने मुंबईहून ५० लाख रुपयांची रोकड आणली होती. पुण्यात आल्यानंतर त्याने पुनावळे येथे आपली कार उभी केली. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी कारमधील रोकड लंपास केली. मात्र, कारची कोणतीही तोडफोड झालेली नसल्याने पोलिसांना सुरुवातीपासूनच चोरीबाबत संशय होता. तपासात बनावट चावीच्या साहाय्याने कार उघडून रोकड चोरण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे ही अचानक झालेली चोरी नसून रोकड आणली जात असल्याची माहिती असलेल्या व्यक्तीने पाळत ठेवून हा डाव आखल्याचा संशय बळावला.

हेही वाचा: Crime News: रेस्टॉरंट व्यावसायिक शिवा शर्मा मृत्यू प्रकरण; फरार मॉडेल श्रद्धा दुबेच्या फ्लॅटमध्ये आढळले संशयास्पद साहित्य

फिर्यादीसोबत मुंबईला गेलेल्याचाच सहभाग

तपास पुढे जात असताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. ही चोरी बाहेरील व्यक्तीने नव्हे, तर फिर्यादीसोबत मुंबईला ५० लाखांची रोकड आणण्यासाठी गेलेल्या व्यक्तीनेच केल्याचे निष्पन्न झाले. त्याने आपल्या एका साथीदाराच्या मदतीने चोरीचा कट रचला होता.  पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेचे युनिट दोन, मालमत्ता विरोधी पथक आणि रावेत पोलिसांनी संयुक्तपणे तपास सुरू केला. पोलिसांनी अवघ्या आठ तासांत दोन्ही संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीला गेलेली संपूर्ण ५० लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. मोठी रक्कम कारमध्ये असल्याची माहिती असलेल्या व्यक्तीनेच साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Web Title: Pimpri chinchwad punawale 50 lakh cash theft two arrested in eight hours sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 12:33 PM

Topics:  

  • Latest pune news update
  • PCMC . Pune . Pimpri . Chinchwad
  • Pune Theft
  • Theft Cases

संबंधित बातम्या

११ दिवसांच्या MPSC पेपरफुटी आंदोलनाला यश; अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर, अन् विद्यार्थ्यांवरील गुन्हेही…
1

११ दिवसांच्या MPSC पेपरफुटी आंदोलनाला यश; अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर, अन् विद्यार्थ्यांवरील गुन्हेही…

MPCB News: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील 6 अधिकारी निलंबित;पुण्यातील कथित आर्थिक गैरव्यवहाराने खळबळ
2

MPCB News: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील 6 अधिकारी निलंबित;पुण्यातील कथित आर्थिक गैरव्यवहाराने खळबळ

Pune News: भावासोबत आनंदाने पोहायला गेली; काही वेळातच अनर्थ, १० वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत
3

Pune News: भावासोबत आनंदाने पोहायला गेली; काही वेळातच अनर्थ, १० वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत

परीक्षेची वेळ झाली, पण विद्यार्थिनी बाहेरच! पुण्यात महाज्योतीची स्कॉलरशिप परीक्षा अचानक रद्द; नेमकं काय घडलं?
4

परीक्षेची वेळ झाली, पण विद्यार्थिनी बाहेरच! पुण्यात महाज्योतीची स्कॉलरशिप परीक्षा अचानक रद्द; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.