Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: भावासोबत आनंदाने पोहायला गेली; काही वेळातच अनर्थ, १० वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत

मोठ्या भावासोबत पोहण्यासाठी गेलेल्या १० वर्षीय खुशबूचा आनंद काही क्षणांतच शोकांत ठरला. शिवापूरच्या वीटभट्टीजवळील शेततळ्यात पोहताना ती अचानक पाण्यात बुडाली. नागरिकांनी शोध घेऊन तिला बाहेर काढले, मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 08, 2026 | 01:07 PM
Pune News: भावासोबत आनंदाने पोहायला गेली; काही वेळातच अनर्थ, १० वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत

Pune News: भावासोबत आनंदाने पोहायला गेली; काही वेळातच अनर्थ, १० वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत

Follow Us
Follow Us:
  • भावासोबत पोहण्यासाठी शेततळ्यात गेली होती खुशबू
  • पाण्यात बुडून १० वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
  • राजगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद 
 

पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील शिवापूर गावच्या हद्दीत काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. मोठ्या भावासोबत वीटभट्टीजवळील शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या १० वर्षीय चिमुकलीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. खुशबू बसंत बसदेवा (वय १०, रा. आर्वी, ता. हवेली) असे मृत मुलीचे नाव आहे. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. या घटनेमुळे बसदेवा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

भावासोबत पोहण्यासाठी गेली अन् अनर्थ घडला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसदेवा कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील इंदवार जिल्ह्यातील आहे. रोजगाराच्या शोधात ते महाराष्ट्रात आले असून, वीटभट्टीवर मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ज्या ठिकाणी हे कुटुंब काम करते, त्याच वीटभट्टीजवळ शेततळे आहे. या शेततळ्यात पाणी असल्याने परिसरातील मुले पोहण्यासाठी जात असल्याचे सांगण्यात येते. मंगळवारी दुपारी खुशबू आपल्या मोठ्या भावासोबत शेततळ्यात पोहण्यासाठी गेली होती. दोघेही पाण्यात उतरले. मात्र, काही वेळातच खुशबू पाण्यात बुडाली. ती दिसेनाशी झाल्याने भावाने आणि परिसरातील नागरिकांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. या घटनेची माहिती तातडीने तिच्या वडिलांना देण्यात आली.

हेही वाचा: नाना पाटेकरांच्या अखेरच्या क्षणी नेमकं काय घडलं? पहाटे २.३० वाजता मेसेज, ४५ मिनिटे CPR अन्…

नागरिकांसह पोलिसांनी घेतला शोध

घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी शेततळ्यात खुशबूचा शोध सुरू केला. काही वेळाच्या प्रयत्नानंतर तिला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर खुशबूला मृत घोषित केले. अवघ्या दहा वर्षांच्या चिमुकलीचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वसंत गयाप्रसाद बसदेवा यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत. या घटनेनंतर शेततळे आणि जलसाठ्यांच्या ठिकाणी लहान मुलांनी पालकांच्या देखरेखीशिवाय जाऊ नये, अशी गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Web Title: Shivapur 10 year old girl drowns in farm pond pune satara highway sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 01:06 PM

Topics:  

  • Death Case
  • highway news
  • Latest pune news update
  • Satara

संबंधित बातम्या

परीक्षेची वेळ झाली, पण विद्यार्थिनी बाहेरच! पुण्यात महाज्योतीची स्कॉलरशिप परीक्षा अचानक रद्द; नेमकं काय घडलं?
1

परीक्षेची वेळ झाली, पण विद्यार्थिनी बाहेरच! पुण्यात महाज्योतीची स्कॉलरशिप परीक्षा अचानक रद्द; नेमकं काय घडलं?

साताऱ्याच्या शिलेदारांचा सन्मान! आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांची भव्य गौरव रॅली; साहिल, ऋतुजा अन् सुदेष्णाचा भव्य सत्कार
2

साताऱ्याच्या शिलेदारांचा सन्मान! आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांची भव्य गौरव रॅली; साहिल, ऋतुजा अन् सुदेष्णाचा भव्य सत्कार

Jallakshmi Irrigation Scheme: जललक्ष्मी सिंचन योजनेची गळती यंदा तरी थांबणार का? पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे वाईत पाणी वाया!
3

Jallakshmi Irrigation Scheme: जललक्ष्मी सिंचन योजनेची गळती यंदा तरी थांबणार का? पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे वाईत पाणी वाया!

Mumbai-Agra Highway : मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाटात अपघातांचे सत्र; प्रशासनाकडून पाहणी
4

Mumbai-Agra Highway : मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाटात अपघातांचे सत्र; प्रशासनाकडून पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.