Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News : खंडणी प्रकरणात मोठी कारवाई; पिंपरीत काँग्रेसच्या नेत्यासह दोघाना अटक

दुकानदाराकडे ५० हजार रुपयाची खंडणी मागितल्याप्रकरणी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीससह दोघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार पिंपरी कॅम्पात १७ सप्टेंबर रोजी घडला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 02, 2025 | 01:45 PM
खंडणी प्रकरणात मोठी कारवाई; पिंपरीत काँग्रेसच्या नेत्यासह दोघाना अटक

खंडणी प्रकरणात मोठी कारवाई; पिंपरीत काँग्रेसच्या नेत्यासह दोघाना अटक

Follow Us
Follow Us:

पिंपरी : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, लुटमार, दरोडे, धमकावणे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. दुकानाबाहेरील शेड अनाधिकृत असल्याबाबत महापालिकेत तक्रार करणार आहे, अशी धमकी देऊन दुकानदाराकडे ५० हजार रुपयाची खंडणी मागितल्याप्रकरणी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीससह दोघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार पिंपरी कॅम्पात १७ सप्टेंबर रोजी घडला आहे. तक्रार दाखल होताच पिंपरी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

काँग्रेस युवा प्रदेश सरचिटणीस पंकज बगाडे (वय ४०, रा. आकुर्डी), गणेश दराडे (वय ५०, रा. रमाबाईनगर, पिंपरी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. शाम अर्जुनदास मेघराजानी (वय ५८, रा. सुखवाणी सिटी समोर, वैभवनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपी बगाडे हा युवक काँग्रेसचा प्रदेश सरचिटणीस आहे. फिर्यादी यांचे किराणा दुकान आहे. १७ सप्टेंबर रोजी आरोपी हे फिर्यादी यांच्या दुकानामध्ये आले. तुमच्या दुकानाबाहेरील शेड हे अनाधिकृत आहे. त्याबाबत आम्ही पिंपरी चिंचवड महापालिकेत तक्रार करणार आहे, असे म्हणून फिर्यादी यांच्याकडे ५० हजार रुपयाची मागणी केली. पैसे दिले नाही तर गाडी अंगावर घालुन जिवे मारण्याची धमकी देवुन शिवीगाळ केली. याप्रकरणी फिर्यादी यांनी २६ सप्टेंबर रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपींनी फिर्यादी यांच्या ओळखीचे दुकानदार यांनाही यापुर्वी अशीच धमकी देऊन वेळोवेळी पैशाची मागणी केल्याचेही उघडकीस आले. सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे तपास करीत आहेत.

पुण्यातील कोथरूडमध्ये गुंडांचा हैदोस

पुण्यातील कोथरूडमध्ये गेल्या आठवड्याभरात निलेश घायवळ याच्या गुंडांनी गोळीबार केला होता. एका नागरिकावर कोयत्याने हल्ला पण केला होता. ते प्रकरण मिटत नाही तोपर्यंत एका सोसायटीत दोन जणांनी हातात शस्त्र घेवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. पहाटे ५ च्या सुमारासच ही घटना घडली आहे. एका सोसायटीत दोन जण घुसले आणि त्यांच्या हातात काहीतरी होतं त्यामुळे भीतीच वातावरण निर्माण झाल आहे. पुणे पोलिसांच्या माहितीनुसार हे दोघे जण चोरी करण्यासाठी सोसायटीत घुसले होते. त्यांच्या हातात पिस्तुल नव्हते तर लाइटर होत. ते सीसीटीव्हीमध्ये पिस्तुल सारखे दिसत आहे. मात्र चोरी करण्याच्या उद्देशाने ते आतमध्ये घुसले होते. कॅमेऱ्याच्या मदतीने त्यांचा शोध घेतला जात आहे. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून आता कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. कोथरूडसारख्याव सोसायट्यामध्ये हा प्रकार होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Pimpri police have arrested two people in an extortion case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2025 | 01:45 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

Maharashtra Live breaking News in Marathi:  आशियाई खेळात तिरंदाजी संघाकडून देशाला सातवे सुवर्णपदक
1

Maharashtra Live breaking News in Marathi: आशियाई खेळात तिरंदाजी संघाकडून देशाला सातवे सुवर्णपदक

Thane Crime: ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या; कार्यालयात घुसून गोळीबार, धारदार शस्त्रानेही हल्ला
2

Thane Crime: ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या; कार्यालयात घुसून गोळीबार, धारदार शस्त्रानेही हल्ला

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र
3

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी
4

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.