Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संशयास्पद महिलेला पकडले, चिमुरड्याच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला; दुपारी नेमकं काय घडलं?

काळभोरनगर परिसरात सोमवारी दुपारी एका संशयास्पद महिलेने एका बालकाला जवळ बोलावून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 04, 2026 | 05:21 PM
संशयास्पद महिलेला पकडले, चिमुरड्याच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला; दुपारी नेमकं काय घडलं?

संशयास्पद महिलेला पकडले, चिमुरड्याच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला; दुपारी नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:

​पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून मुले पळवणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवांना ऊत आला असतानाच, काळभोरनगर परिसरात सोमवारी दुपारी एका संशयास्पद महिलेने एका बालकाला जवळ बोलावून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र, संबंधित मुलाने प्रसंगावधान दाखवत तिथून धूम ठोकल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, पालकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.

​
सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास काळभोरनगर परिसरात एक अनोळखी महिला बराच वेळ घुटमळत होती. परिसरात खेळत असलेल्या एका लहान मुलावर तिची नजर पडली. तिने त्याला खुणावून जवळ बोलावले आणि त्याच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली. मात्र, त्या महिलेच्या हालचाली आणि बोलण्यावरून त्या चिमुरड्याला धोक्याची जाणीव झाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याने क्षणाचाही विलंब न लावता तेथून पळ काढला आणि थेट घर गाठून पालकांना हकीकत सांगितली.

​नागरिकांचा संताप आणि पोलिसांची एन्ट्री

मुलाने सांगितलेला प्रकार ऐकून घाबरलेल्या पालकांनी तत्काळ बाहेर धाव घेतली. ती महिला अद्याप तिथेच उभी असल्याचे पाहून नागरिकांनी आरडाओरडा केला. बघता बघता तिथे मोठी गर्दी जमा झाली आणि वातावरण तणावपूर्ण बनले. जमावाने महिलेला घेराव घातला असता तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित महिलेला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले.
​
पोलिसी खाक्या दाखवताच या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. सुरुवातीला त्या महिलेने ‘आर्थिक अडचणीमुळे मुलाला पळवण्याचा विचार केला होता’, अशी कबुली दिली. ही महिला मोहननगर परिसरातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी तिच्या पतीला बोलावून विचारपूस केली असता, पतीने दावा केला की, “संबंधित महिलेची मानसिक स्थिती ठीक नाही, तिच्यावर उपचार सुरू आहेत.” त्यामुळे ही घटना केवळ मानसिक आजारातून घडली की त्यामागे काही मोठे रॅकेट आहे, याबाबत पोलीस आता अधिक तपास करत आहेत.
​
या घटनेमुळे काळभोरनगरसह संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असले, तरी पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यावे आणि अनोळखी व्यक्तींपासून सावध राहावे, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : संभाजीनगरमध्ये बनावट खत रॅकेटचा पर्दाफाश; २६ लाखांचा साठा जप्त, नामांकित कंपन्यांच्या नावाखाली फसवणूक

Web Title: Pimpri police have detained a suspicious woman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pimpri Police

संबंधित बातम्या

तू शहर सोडून जा, नाहीतर तुला…; संभाजीनगरमध्ये जीम ट्रेनर तरुणीचा 7 महिने पाठलाग
1

तू शहर सोडून जा, नाहीतर तुला…; संभाजीनगरमध्ये जीम ट्रेनर तरुणीचा 7 महिने पाठलाग

तक्रार दिल्याचा राग, दुकानदार महिलेला 4 दिवस घराबाहेर पडू दिले नाही; चाकू दाखवत दिल्या धमक्या
2

तक्रार दिल्याचा राग, दुकानदार महिलेला 4 दिवस घराबाहेर पडू दिले नाही; चाकू दाखवत दिल्या धमक्या

Bihar : सतत रडत होते बाळ, आवाज सहन न झाल्याने आईनेच कोयत्याने चिरला ६ महिन्यांच्या मुलीचा गळा; घटनेनंतर आत्महत्येचा प्रयत्न
3

Bihar : सतत रडत होते बाळ, आवाज सहन न झाल्याने आईनेच कोयत्याने चिरला ६ महिन्यांच्या मुलीचा गळा; घटनेनंतर आत्महत्येचा प्रयत्न

पूर्ववैमनस्यातून मित्रानेच केला मित्राचा धारदार हत्याराने खून; दोघे एकत्र पार्टीला बसले अन् नंतर अचानक…
4

पूर्ववैमनस्यातून मित्रानेच केला मित्राचा धारदार हत्याराने खून; दोघे एकत्र पार्टीला बसले अन् नंतर अचानक…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.