Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बेशिस्त वाहनचालकांचा कहर! कारवाईचा वेग वाढला, मात्र, बेशिस्ती सुरूच; पाच वर्षात तब्बल…

पुणे शहरातील वाहतूकीला शिस्त लावण्यासोबतच बेशिस्तांना चाप लावण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न होत असताना बेशिस्तांची संख्या मात्र, कमी होत नसल्याचे वास्तव आकडेवारीतून समोर आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 20, 2026 | 11:52 AM
बेशिस्त वाहनचालकांचा कहर! कारवाईचा वेग वाढला, मात्र, बेशिस्ती सुरूच; पाच वर्षात तब्बल...

बेशिस्त वाहनचालकांचा कहर! कारवाईचा वेग वाढला, मात्र, बेशिस्ती सुरूच; पाच वर्षात तब्बल...

Follow Us
Follow Us:

पुणे/अक्षय फाटक : पुणे शहरातील वाहतूकीला शिस्त लावण्यासोबतच बेशिस्तांना चाप लावण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न होत असताना बेशिस्तांची संख्या मात्र, कमी होत नसल्याचे वास्तव आकडेवारीतून समोर आले आहे. या कारवाईत सर्वाधिक कारवाई वन-वे तसेच नो-एंट्रीचे उल्लघंन करणाऱ्यांची असून, पोलिसांनी प्रमुख दहा प्रकारात कारवाई केली आहे. केवळ ६ महिन्यात शहरातील तब्बल ५ लाख ८९ हजार २६४ वाहनचालकांवर कारवाई केली आहे. तर, गेल्या ५ वर्षांत २० लाख १३ हजार ९३९ वाहनचालकांवर कारवाई केली आहे.

 

पुणे शहरातील वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी पुणे पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. जनजागृतीसोबतच विशेष मोहिम देखील राबविल्या जात आहेत. दुसरीकडे बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाईचा वेग वाढविला आहे. मात्र, तरीही बेशिस्तांची संख्या कमी होत नसल्याचे दिसत आहे. प्रामुख्याने पोलिसांकडून शहरात हेल्मेट, ट्रिपल सीट, ड्रंक अँड ड्राइव्ह, मॉडिफाईड सायलेंसर, राँग साईड ड्रायव्हिंग आणि सिग्नल जंपिंगविरोधात कारवाई सुरू आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा वेग वाढवला आहे. परंतु, वाहनसंख्येबरोबरच वाहतूक शिस्तीचा अभाव कायम असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे अपघाताची संख्याही वाढत असल्याचे निरीक्षण आहे. त्यातही अहिल्यानगर व सोलापूर महामार्गावर अपघात वाढल्याचे दिसून आले आहे.

सर्वाधिक कारवाई वन-वे आणि नो-एंट्रीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर झाली असून, अशा १० लाख ५७ हजार ९४४ प्रकरणांची नोंद आहे. त्यानंतर सिग्नल तोडण्याच्या ४ लाख ५ हजार १४६ घटना आढळून आल्या. ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या २ लाख १ हजार ३९३, तर मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्या १ लाख ४ हजार ७७३ चालकांवर कारवाई करण्यात आली.

याशिवाय राँग साईडने वाहन चालविण्याच्या १ लाख ४ हजार ७६३, काळ्या फिल्मच्या काचा लावण्याच्या ६५ हजार ३७४, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविण्याच्या १९ हजार ६२, धोकादायक वाहन चालविण्याच्या २२ हजार ४८४, फुटपाथवर वाहन चालविण्याच्या २१ हजार २६६ आणि फुटपाथवर पार्किंग करण्याच्या ११ हजार १२ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : समृद्धी महामार्गावर काळाचा कहर! टेम्पोच्या धडकेनंतर कार पेटली, पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

पाच वर्षांतील प्रमुख कारवाई

नियमभंग कारवाई ५ वर्षातील आकडेवारी
नो-एंट्री / वन-वे उल्लंघन ३४६३०० १०,५७,९४४
सिग्नल तोडणे ९२०५५ ४,०५,१४६
ट्रिपल सीट ५९६१२ २,०१,३९३
मोबाईलवर बोलत वाहन चालविणे २५३१३ १,०४,७७३
राँग साईड ड्रायव्हिंग १८२८० १,०४,७६३
काळ्या फिल्मच्या काचा २०४९३ ६५,३७४
धोकादायक वाहन चालविणे ६९१५ २२,४८४
फुटपाथवर वाहन चालविणे ७५५९ २१,२६६
मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे ६७९० १९,०६२
फुटपाथवर पार्किंग ५९४७ ११,०१२
एकूण कारवाई २०,१३,९३९

नेमकी कारवाईत वाढ का?

नो-एंट्री आणि वन-वे उल्लंघन हे सर्वाधिक गंभीर आव्हान असून एकूण कारवाईंपैकी निम्म्याहून अधिक प्रकरणे या प्रकारातील आहेत. सिग्नल जंपिंग अजूनही मोठ्या प्रमाणात सुरू असून अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या प्रमुख उल्लंघनांमध्ये त्याचा समावेश आहे. ट्रिपल सीट आणि मोबाईलवर बोलत वाहन चालविण्याचे प्रकार सरास होत आहेत. पोलिसांच्या विशेष मोहिमा आणि ई-चलन प्रणालीमुळे कारवाई वाढली; मात्र वाहतूक शिस्तीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही.

Web Title: Police are taking action against motorists driving indisciplinedly in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 11:52 AM

Topics:  

  • pune news
  • Pune Traffic
  • Pune Traffic Police

संबंधित बातम्या

‘हातात मोबाईल पण मनात कान्हा!’ पुण्यात चिमुकल्यांसाठी पारंपरिक पोशाख अन् सजावटीच्या वस्तूंची खरेदी जोरात
1

‘हातात मोबाईल पण मनात कान्हा!’ पुण्यात चिमुकल्यांसाठी पारंपरिक पोशाख अन् सजावटीच्या वस्तूंची खरेदी जोरात

‘खेलेगा इंडिया, खिलेगा इंडिया!’ जयराज क्लबमध्ये रंगल्या बॅडमिंटन, टेबल टेनिसच्या चुरशीच्या लढती
2

‘खेलेगा इंडिया, खिलेगा इंडिया!’ जयराज क्लबमध्ये रंगल्या बॅडमिंटन, टेबल टेनिसच्या चुरशीच्या लढती

Vidyanand Bapat यांना मारहाण होताच Devendra Fadnavis अ‍ॅक्शन मोडमध्ये; दिले ‘हे’ तातडीचे आदेश
3

Vidyanand Bapat यांना मारहाण होताच Devendra Fadnavis अ‍ॅक्शन मोडमध्ये; दिले ‘हे’ तातडीचे आदेश

Table Tennis चा थरार! वर्धेत पुण्याच्या खेळाडूंचा डंका; रुचिता दारवटकर अन् ‘हे’ खेळाडू पुढील फेरीत
4

Table Tennis चा थरार! वर्धेत पुण्याच्या खेळाडूंचा डंका; रुचिता दारवटकर अन् ‘हे’ खेळाडू पुढील फेरीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.