Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हडपसर, खडकीत पोलिसांची मोठी कारवाई; 21 किलो गांजा, तीन किलो दोडाचुरा जप्त

हडपसर आणि खडकी या दोन वेगवेगळ्या कारवाई करून गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अमली पदार्थ तस्कराना पकडले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 13, 2025 | 01:24 PM
हडपसर, खडकीत पोलिसांची मोठी कारवाई; 21 किलो गांजा, तीन किलो दोडाचुरा जप्त

हडपसर, खडकीत पोलिसांची मोठी कारवाई; 21 किलो गांजा, तीन किलो दोडाचुरा जप्त

Follow Us
Follow Us:

पुणे : हडपसर आणि खडकी या दोन वेगवेगळ्या कारवाई करून गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अमली पदार्थ तस्कराना पकडले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी ७ लाख ८८ हजार रुपयांचा अफूच्या बोंडांचा चुरा (पॉपी स्ट्रॉ/दोडाचुरा) आणि २१ किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी हडपसर आणि खडकी पोलिसांत दोन स्वंतत्र गुन्हे दाखल करून पाच जणांना अटक केली आहे.

ही कारवाई उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, उपनिरीक्षक अस्मिता लाड व त्यांच्या पथकाने केली आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे अधिकारी, कर्मचारी हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी मांजरी रोड चौकाजवळील इंद्रप्रस्थ कार्यालयाकडे जाणार्‍या रस्त्यावर दोघेजण अफूच्या बोंडांचा चुरा बाळगून असल्याची माहिती अंमलदार प्रफुल्ल मोरे यांना मिळाली. त्यानूसार राकेश अर्जुनदास रामावत (वय ४१) आणि ताराचंद सिताराम जहांगिर (वय २६, दोघे. रा. उरळी कांचन, मूळ रा. राजस्थान) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ३ किलो ५६० ग्रॅम अफूचा बोंडांचा चुरा (पॉपी स्ट्रॉ) तसेच इतर मुद्देमाल मिळून एकूण २ लाख १५ हजारांचा माल जप्त करण्यात आला.

तर, त्याच रात्री दुसर्‍या कारवाईत खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक यांना मिळालेल्या माहितीनूसार भागवत शिवाजी मंडलीक (वय २६, रा. रहाटणी), मुसीम सलीम शेख (वय २४, रा. बीड) आणि महेश नारायण कळसे (वय २४, रा. बीड) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून २१ किलो ८६० ग्रॅम गांजा आणि इतर साहित्यासह एकूण ५ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हे सुद्धा वाचा : पुण्यात कोयत्याने वार करुन तरुणाचा खून, हाताची बोटेही तोडली; कारण…

मेफेड्रोन विक्री करणाऱ्याला ठोकल्या बेड्या

मुंबईहून पुण्यात आलेल्या एकाकडून पोलिसांनी मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ पकडला आहे. त्याच्याकडून २ ग्रॅम एमडी, मोबाइल, रोकड असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संदीप सुकनराज जैन (वय ४२, रा. भुलेश्वर, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंध कायद्यान्वये फरासखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवार पेठेत पोलिसांचे पथक शनिवारी दुपारी गस्त घालत होते. त्यावेळी परिसरातील एका पानपट्टीजवळ जैन थांबला होता. त्याच्याकडे मेफेड्रोन असल्याची मााहिती पोलीस कर्मचारी प्रशांत पालांडे यांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने सापळा लावून जैन याला पकडले.

Web Title: Police arrest drug smugglers in hadapsar and khadki

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2025 | 01:20 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

शिरूर हादरलं! नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक बलात्कार; हॉटेलमध्ये नेले अन्…
1

शिरूर हादरलं! नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक बलात्कार; हॉटेलमध्ये नेले अन्…

१२ हजाराची लाच मागणं भोवलं! तलाठ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई
2

१२ हजाराची लाच मागणं भोवलं! तलाठ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

श्रीनिवास पवार हत्येप्रकरणी मोठी अपडेट; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

श्रीनिवास पवार हत्येप्रकरणी मोठी अपडेट; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; कारची ट्रकला जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू
4

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; कारची ट्रकला जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.