Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shikrapur Crime News: भाडेकरुने दुचाकी चोरली अन्…; आरोपीला नाशिकमधून अटक

Sanaswadi Crime: दरम्यान खोलीमालक रोहिदास गाडेकर यांनी गुरुदास परस्पर खोली खाली करुन फरार झाल्याचे सांगितल्याने विनोद रघुनाथ वाघे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 09, 2025 | 05:12 PM
Shikrapur Crime News: भाडेकरुने दुचाकी चोरली अन्...; आरोपीला नाशिकमधून अटक

Shikrapur Crime News: भाडेकरुने दुचाकी चोरली अन्...; आरोपीला नाशिकमधून अटक

Follow Us
Follow Us:

शिक्रापूर: सणसवाडी ता. शिरुर येथील आनंदनगर येथून भाजी विक्रेते विनोद वाघे यांच्या दुकानासमोरील रोहिदास गाडेकर यांच्या खोलीमध्ये राहणाऱ्या गुरुदास पाटील या भाडेकरुने विनोद यांची उधारी देण्यासाठी गावावून पैसे आणि पत्नी व मुलांना आणतो असे म्हणत विनोद यांची के ए ०१ जे पी ६२८१ ही  दुचाकी घेउन गावाला गेला.  त्यांनतर गुरुदास पुन्हा आलाच नाही.

दरम्यान खोलीमालक रोहिदास गाडेकर यांनी गुरुदास परस्पर खोली खाली करुन फरार झाल्याचे सांगितल्याने विनोद रघुनाथ वाघे वय ३३ वर्षे रा. मलठण फाटा शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी गुरुदास पाटील याच्या विरुद्ध गुन्हा करत तपास केला असता सदर आरोपी नाशिक मध्ये असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलीस हवालदार रविकिरण जाधव व राहुल वाघमोडे यांनी थेट नाशिक गाठत गुरुदास राजेंद्र पाटील रा. त्रिमूर्ती चौक नाशिक जि. नाशिक याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्या जवळील दुचाकी देखील जप्त केली. पुढील तपास पोलीस हवालदार रविकिरण जाधव हे करत आहे.

शिक्रापूर पोलिसांची मोठी कारवाई

राज्यात गांजा तस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गांजा विक्रीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता  शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन स्कॉर्पिओ जप्त करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले असून, शिक्रापूर पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमध्ये पोलिसांनी 53 किलो गांजा तब्यात घेतला आहे. तसेचं वैष्णव वैजनाथ ढाकणे, स्वप्नील गोरक्षनाथ खेडकर, हर्षद देविदास खेडकर, शुभम बंडू जवरे, तुषार रामनाथ जवरे व अक्षय कांतीलाल आव्हाड या सहा जणांना अटक केली आहे.

हेही वाचा: शिक्रापूर पोलिसांची मोठी कारवाई; दोन स्कॉर्पिओसह 53 किलो गांजा जप्त

शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पुणे- नगर महामार्गावरून दोन पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून काही युवक गांजा घेऊन जाणार असल्याची माहिती पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांना मिळाली, त्यांनतर पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पुणे नगर रस्त्यावर सापळा लावला असता त्यांना दोन पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ आल्याचे दिसून आले, यावेळी पोलिसांनी दोन्ही स्कॉर्पिओमध्ये तपासणी केली असता त्यामध्ये गांजा असल्याचे दिसून आले.

गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना ठोकल्या बेड्या

दरम्यान गेल्या काही दिवसाखाली पुणे शहराच्या मध्यभागात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्या दोघांकडून ८२० ग्रॅम गांजा जप्त केला असून, युनिट एकच्या पथकाने ही कारवाई शुक्रवार पेठेत केली आहे. समाधान केदा पवार (वय ३३, रा. नाशिक), संदीप सखाराम खैरनार (वय ३८, रा. पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलीस अंमलदार सुजय रिसबुड व त्यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: Police arrested at bike stolen accused sanaswadi shikrapur crime news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2025 | 05:12 PM

Topics:  

  • crime
  • crime news
  • police
  • Shikrapur

संबंधित बातम्या

कारमधून तरुणाचे अपहरण अन् बर्दापूरला नेऊन खून; लातुरातील घटनेने खळबळ
1

कारमधून तरुणाचे अपहरण अन् बर्दापूरला नेऊन खून; लातुरातील घटनेने खळबळ

रक्ताच्या नात्याला काळिमा! प्रॉपर्टीच्या वादातून 83 वर्षीय आजोबांकडून नातवाची हत्या
2

रक्ताच्या नात्याला काळिमा! प्रॉपर्टीच्या वादातून 83 वर्षीय आजोबांकडून नातवाची हत्या

फोन करून बोलावले अन् कोयत्याने डोक्यात वार, लातुरातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?
3

फोन करून बोलावले अन् कोयत्याने डोक्यात वार, लातुरातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?

टोळक्याचा पोलिसावर दगडाने हल्ला, रक्तबंबाळ अवस्थेत गाठले पोलिस ठाणे; छावणीतील घटनेनं खळबळ
4

टोळक्याचा पोलिसावर दगडाने हल्ला, रक्तबंबाळ अवस्थेत गाठले पोलिस ठाणे; छावणीतील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.