
‘मुलगी वाईट वळणावर होती’ म्हणाले वडील; शेजाऱ्यांनी सांगितली उलटीच कहाणी, सातारा हत्याकांडात नवा ट्विस्ट
मोतीलाल मराठे (वय ८३) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर, अभय माणिक मराठे (वय ३३) असे मृत्यू झालेल्या वकिलाचे नाव आहे. पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमोद क्षीरसागर यांच्यासह पथकाने ही करवाई केली आहे.
अपघातात मृत्यू झालेल्या घटनेतील अभय यांचे वडील माणिक मराठे हे लोणावळ्यातील माजी नगरसेवक आहेत. भुशी गावातील ‘हॉटेल मोतीराम’ हे मराठे कुटुंबीयांचे असून, त्यांच्या आजोबांच्या नावावर बारा बोअर रायफलचा परवाना आहे. ही रायफल शिकारीसाठी वापरली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सोमवारी (दि.५) अभय हे आजोबांची परवानाधारक रायफल साफ करत होते. रायफल साफ करताना अचानक ट्रिगर दाबला गेला आणि त्यातून सुटलेली गोळी अभय यांच्या छातीत लागल्याने जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला, असे सुरुवातीला कुटुंबीयांकडून पोलिसांना सांगण्यात आले. त्यानुसार लोणावळा शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता घटनेबाबत काही बाबी संशयास्पद आढळल्या.
छातीवर झालेली जखम, घटनास्थळी आढळलेले रक्ताचे डाग आणि मृतदेह व रायफलची स्थिती यामुळे पोलिसांना संशय आला. त्यानंतर ससून रुग्णालयातील डॉक्टरांकडून जखमेबाबत माहिती घेण्यात आली. पोलिसांच्या तपासात अभय यांनी स्वतः रायफल हाताळताना गोळी लागल्याची शक्यता नसल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी अभय यांच्या नातेवाईक, हॉटेल व्यवस्थापक आणि कामगारांकडे चौकशी सुरू केली. त्यातून अभय आणि त्यांच्या ८३ वर्षीय आजोबांमध्ये मालमत्तेवरून वाद सुरू असल्याचे समोर आले.
घटनेच्या आदल्या दिवशी सकाळी अकराच्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला होता. या वादातून आजोबांनी अभय यांच्यावर रायफलमधून गोळी झाडल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी आजोबांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आजोबांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींची चौकशी सुरू आहे. मालमत्तेचा वाद, गोळीबारानंतरचा घटनाक्रम आणि पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्नांबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
सीसीटीव्ही काढले, कामगारांना धमकी
गोळी अभय यांच्या छातीत लागल्यानंतर कुटुंबीयांनी हा प्रकार सुरुवातीला अपघात असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळावरील सीसीटीव्हीचा डीव्हीआर काढून टाकण्यात आल्याचेही तपासात समोर आले. तसेच काही कामगारांना धमकावण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार पोलिस अधिक तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : फोन करून बोलावले अन् कोयत्याने डोक्यात वार, लातुरातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?
आजोबांना होती शिकारीचा “आवड”
मोतीराम मराठे यांच्याकडे एकूण २ रायफल होते. १९७० मध्ये त्यांनी एक १२ बोर चे रायफल खरेदी केले होते तर दुसरे रायफल १९८० मध्ये खरेदी केले होते. मोतीराम मराठे यांना शिकारीची आवड असल्याने त्यांनी हे दोन्ही परवानाधारक रायफल खरेदी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. यापूर्वी शिकारीसाठी त्यांनी या दोन्ही रायफलचा वापर केल्याचं तपासातून निष्पन्न झालं आहे. यातील एका रायफल मधूनच मोतीराम यांनी त्यांच्या नातवाचा खून केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.