Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टोळक्याचा पोलिसावर दगडाने हल्ला, रक्तबंबाळ अवस्थेत गाठले पोलिस ठाणे; छावणीतील घटनेनं खळबळ

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आलेल्या पोलिसालाच ८ जणांच्या टोळक्याने घेरून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एवढ्यावर न थांबता एका आरोपीने रस्त्यावर पडलेला दगड उचलून त्याच्या डोक्यात घातला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 06, 2026 | 11:51 AM
टोळक्याचा पोलिसावर दगडाने हल्ला, रक्तबंबाळ अवस्थेत गाठले पोलिस ठाणे; छावणीतील घटनेनं खळबळ

टोळक्याचा पोलिसावर दगडाने हल्ला, रक्तबंबाळ अवस्थेत गाठले पोलिस ठाणे; छावणीतील घटनेनं खळबळ

Follow Us
Follow Us:
  • टोळक्याचा पोलिसावर दगडाने हल्ला
  • रक्तबंबाळ अवस्थेत गाठले पोलिस ठाणे
  • छावणीतील घटनेनं खळबळ
छत्रपती संभाजीनगर : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आलेल्या पोलिसालाच ८ जणांच्या टोळक्याने घेरून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एवढ्यावर न थांबता एका आरोपीने रस्त्यावर पडलेला दगड उचलून त्याच्या डोक्यात घातला. डोक्यातून रक्त वाहू लागल्यानंतर जीव वाचविण्यासाठी धाव घेतलेल्या या अंमलदाराचा पाठलाग करून पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे. ही घटना ४ ऑक्टोबर रोजी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास छावणीतील नेहरु चौकात घडली आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलिसालाच लक्ष्य करून झालेल्या या गंभीर हल्ल्याने छावणी परिसरात खळबळ उडाली आहे.

 

या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नितीन चौधरी, ऋषभ यादव, ओमकार भंडारी, व्यंकटेश यादव आणि लखन यादव ऊर्फ बाबा अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर आरोपी धिरज साकल, सागर केसरे आणि जगदीश यादव अशी पसार आरोपींची नावे असून पोलिस त्यांचा कसुन शोध घेत आहेत. छावणी ठाण्याचे अंमलदार दिपक भागवत सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे.

४ ऑक्टोबरच्या रात्री ९ ते ५ ऑक्टोबरच्या सकाळी ९ वाजेपर्यंत अंमलदार दीपक सोनवणे यांची होमगार्ड मुळे यांच्यासोबत ११२ मोबाइलवर पेट्रोलिंग ड्युटी होती. रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास नियंत्रण कक्षाकडून केशर मॉल, नेहरू चौक येथे सार्वजनिक रस्त्यावर भांडण सुरू असल्याचा कॉल मिळाला. सोनवणे आणि मुळे तातडीने तेथे पोहोचले. तेथे सुमारे ६० ते ७० मुले जमलेली होती. एक ट्रक (एमएच-१६-डीएल-५२८५) उभा होता. पोलिसांनी पाहणी केली असता त्यामध्ये गोवंशाची अंदाजे १० ते १२ जनावरे असल्याचे आढळले. ट्रकची चावी कोणीतरी काढून घेतली होती, तर चालक तेथेच उभा होता. सोनवणे यांनी ट्रकची चावी मागून तो पोलिस ठाण्यात घेऊन जाण्याचे सांगितले. मात्र, नितीन चौधरी, ऋषभ यादव, ओमकार भंडारी, धिरज साकल, व्यंकटेश यादव, सागर केसरे, जगदीश यादव आणि लखन यादव ऊर्फ बाबा यांनी विरोध केला. तुम्ही त्यांना सोडून कसे देता? असे म्हणत त्यांनी सोनवणे यांच्याशी हुज्जत घातल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

ट्रक अडविल्याने दिला चोप

परिस्थिती चिघळत असल्याने सोनवणे यांनी नाईट राऊंडचे ड्युटी अधिकारी उपनिरीक्षक सुरेश माळी यांना बोलावले. त्यांच्यासोबत ११२ मार्शलवरील अंमलदार समीर शेख व जमील शेखही तेथे पोहचले. ट्रक पोलिस ठाण्यात नेण्यासाठी सोनवणे यांनी होमगार्ड मुळे यांना ट्रकमध्ये बसविले. याचवेळी नितीन चौधरी, ऋषभ यादव, ओमकार भंडारी, धिरज साकल, व्यंकटेश यादव, सागर केसरे, जगदीश यादव आणि लखन यादव ऊर्फ बाबा यांनी सोनवणे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

दगडाचा घाव; डोक्यातून वाहिल्या रक्ताच्या धारा

मारहाणीच्या वेळी ओमकार ऊर्फ चिन्ना भंडारी याने तेथे पडलेला दगड उचलून सोनवणे यांच्या डोक्यात मारला. दगडाच्या घावाने त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. त्यांचा शर्ट आणि पँट रक्ताने माखली. जखमी झाल्यानंतर सोनवणे यांनी हल्लेखोरांपासून बचाव करण्यासाठी व्हॉलीबॉल मैदानाच्या बाजूने धाव घेतली. मात्र, वरिल आरोपींनी त्यांचा पाठलाग करुन शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी पुन्हा मारहाण केली.

हे सुद्धा वाचा : …अन्यथा पुणे शहर बंद पाडू!”; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून रोहित पवारांचा इशारा

छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद

हल्लेखोरांच्या तावडीतून कसेबसे सुटल्यानंतर सोनवणे यांनी छावणी पोलिस ठाणे गाठले, सरकारी कर्तव्य पार पाडत असलेल्या अंमलदारावरच अशा प्रकारे हल्ला झाल्याने पोलिस दलातही या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. प्रकरणात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास  उपनिरीक्षक काकासाहेब नागवे करित आहेत.

Web Title: An incident involving the assault of a police has occurred in sambhajinagar district nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 11:51 AM

Topics:  

  • Arrested
  • crime news
  • Police News

संबंधित बातम्या

धक्कादायक ! सांगलीत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; लॉजवर नेऊन दोन मित्रांनीच…
1

धक्कादायक ! सांगलीत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; लॉजवर नेऊन दोन मित्रांनीच…

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
2

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
3

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी
4

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.