Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: संभाजीनगरमध्ये डॉक्टरला 5 लाखांची मागणी; पोलिसांकडून ‘फिल्मी’ स्टाईलने भांडाफोड, माजी नगरसेविकेसह 6 जणांना अटक

छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी देऊन ५ लाखांची खंडणी मागणाऱ्या ६ आरोपींना अटक. पोलिसांनी खेळण्यांच्या नोटांचा सापळा रचून टोळीला पकडले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 15, 2026 | 03:19 PM
संभाजीनगरमध्ये डॉक्टरला 5 लाखांची मागणी (Photo Credit- X)

संभाजीनगरमध्ये डॉक्टरला 5 लाखांची मागणी (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • संभाजीनगरमध्ये डॉक्टरला 5 लाखांची मागणी
  • पोलिसांकडून ‘फिल्मी’ स्टाईलने भांडाफोड
  • माजी नगरसेविकेसह 6 जणांना अटक
छत्रपती संभाजीनगरमध्ये कॅन्सर रुग्णाच्या मृत्यूचा मुद्दा पुढे करून हॉस्पिटलची बदनामी करण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या सहा जणांना सिटीचौक पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून कारसह सहा मोबाइल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई 13 मार्च रोजी एन 12 हडको परिसरातील सत्यविष्णु हॉस्पीटलमध्ये करण्यात आली. जफर नुर खटीक, मोहम्मद समीर मोहम्मद जाकीर, सय्यद मुशाहिद अली मुमताज अली, शाईन बानो अबु हमजा, रुबीना हबीब कुरैशी आणि सिद्धार्थ कैलास रायमाळे (सर्व रा. धुळे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रकरणात डॉ. इफ्तेखार गफ्फार पटेल (52, रा. एन-12 हडको) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादी यांचे सत्यविष्णु हॉस्पिटल येथे कॅन्सर रुग्णांवर उपचार केले जातात.

खंडणी मागितल्याचे फिर्यादीत नमूद

धुळे येथील हमजा अन्सारी यांनी मार्च 2023 मध्ये या हॉस्पिटलमध्ये सुमारे चार महिने उपचार घेतले होते. त्यानंतर त्यांनी इतरत्र उपचार घेतले आणि दोन वर्षांनंतर त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा आधार घेत रुग्णाचे काही नातेवाईक डॉक्टरांकडे आले. त्यांनी हॉस्पिटलचे व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर टाकण्याची व तोडफोड करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. खंडणीची मागणी करत आरोपींनी डॉक्टरांना फोन करून धमकावले. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत तुझ्यासाठी कबर खोदून ठेवली, असेही सांगितले. तसेच तातडीने पाच हजार रुपये पाठवण्याची मागणी केली. घाबरलेल्या डॉ. इफ्तेखार यांनी आरोपींच्या मोबाइल क्रमांकावर फोनपे द्वारे 5 हजार रुपये पाठवले.

पोलिसांनी रचला सापळा

खेळण्यांच्या नोटांची बॅगतक्रारीनंतर सिटीचीक पोलिसांनी सापळा रचला. पाच लाख रुपयांची बनावट रक्कम तयार करण्यात आली. त्यासाठी मुलांच्या खेळण्यातील इंडियन बच्चों का बैंक अशा नोटांचे बंडल तयार करून त्यामध्ये वर-खाली खऱ्या 500 रुपयांच्या नोटा ठेवण्यात आल्या, ही बेंग डॉक्टरांना देण्यात आली व आरोपी पैसे घ्यायला आल्यास पोलिसांना इशारा देण्याचे सांगण्यात आले.

Beed Crime: “तू काळी आहेस” म्हणत छळ, पैशांसाठी तगादा, सततच्या अपमानाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

पैसे घेताच सहा जणांना अटक

13 मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता तीन जण हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी स्वतःची नावे जफर नूर खाटीक, मोहम्मद समीर मोहम्मद जाकीर व सय्यद मुशाहिद अली अशी सांगितली. त्यांनी खंडणीची मागणी करताच डॉक्टरांनी त्यांना बॅग दिली. पैसे स्वीकारताच डॉक्टरांनी पोलिसांना इशारा दिला. पोलिसांनी छापा टाकून तिघांना पकडले, त्यांच्या सोबत बाहेर थांबलेल्या शाईन बानो अबु हमजा, रुबीना हबीब कुरैशी व सिद्धार्थ कैलास रायमाळे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सहा मोबाइल तसेच कार जप्त करण्यात आली. प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

माजी नगरसेविकेचे कनेक्शन उघड

पोलिसांनी या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेतले असून, त्यात धुळ्याची माजी नगरसेविका रुबीना हबीब कुरैशी हिचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपीकडून एक आलिशान कार, ६ मोबाईल फोन आणि खंडणीची बैंग जप्त केली आहे. ही कारवाई सपोनि मनोज शिंदे, पोउपनि बुधा शिंदे, राहुल शिंदे यांच्या पथकाने केली.

माफी मागूनही खंडणीसाठी तगादा

तीन वर्षापासुन आरोपी हे डॉक्टरांना खंडणी मागत होते. डॉक्टरांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली होती, पोलिसांनी आरोपींना बोलावून घेतले. त्यानंतर आम्ही डॉक्टरांना त्रास देणार नाही असे माफी मागीतली होती. डॉक्टरांनी देखील त्यांना माफ केले. परंतु आरोपींनी त्रास देणे सुरूच ठेवले.

दौंड तालुक्यात एकाच दिवशी तीन विवाहित महिला बेपत्ता; पोलिसांसमोर शोध मोहीमेचे मोठं आव्हान

Web Title: Police arrests ex corporator and five others for extorting doctor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news
  • Doctor

संबंधित बातम्या

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
1

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
2

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
3

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात
4

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.