Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नगरसेवकाच्या शयर्तीतील इच्छुक उमेदवाराला ठोकल्या बेड्या; नेमकं काय आहे प्रकरण?

एका राजकीय पक्षाकडून निवडणूक लढविण्याची तयारीत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यासह पाच जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 22, 2025 | 01:10 PM
नगरसेवकाच्या शयर्तीतील इच्छुक उमेदवाराला ठोकल्या बेड्या; नेमकं काय आहे प्रकरण?

नगरसेवकाच्या शयर्तीतील इच्छुक उमेदवाराला ठोकल्या बेड्या; नेमकं काय आहे प्रकरण?

Follow Us
Follow Us:
  • राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या
  • नगरसेवकाच्या शयर्तीतील इच्छुक उमेदवार ठोकल्या बेड्या
  • बेकायदेशीर पिस्तुल बाळगल्याप्रकरणी कारवाई
पुणे : आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. इच्छुक उमेदवारही सोशल मिडीयावर जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. अशातच आता पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. एका राजकीय पक्षाकडून निवडणूक लढविण्याची तयारीत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यासह पाच जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. बेकायदेशीर पिस्तुल बाळगल्याप्रकरणात ही कारवाई केली आहे. त्यामुळे बाणेर आणि पाषाण व बालेवाडी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

विनायक नागनाथ गायकवाड ( वय २१, रा उंड्री रोड पिसोळी), विजय उर्फ चाँद राजु काळे (वय ३०, रा भालेकर नगर), जॉन जोसक जाधव (वय ४० जुनी सांगवी), विशाल कृष्णा गांधिले (वय ४७,रा. पॅनकार्ड रोड बाणेर) निसर्ग अर्जुन गांधिले (वय. ३७,रा. ऋतुजा पार्क बाणेर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर अभय सुरेश ससाणे (रा. श्रीरामपुर, अहिल्यानगर ) हा फरार असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पोलिस निरीक्षक वर्षा देशमुख, उपनिरीक्षक गौरव देव, कर्मचारी दिलीप गोरे, सुरेंद्र जगदाळे व त्यांच्या पथकाने केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीपैकी विशाल गांधीले याचे एका व्यक्तीसोबत वाद झाले होते. त्या कारणातून त्याने हे पिस्तूल स्वसंरक्षणासाठी खरेदी केले असल्याचे समोर आले आहे. गांधीले हा एका पक्षाचे काम करतो. तो महापालिकेच्या निवडणूकीत इच्छुक उमेदवार होता. दरम्यान गायकवाडने विक्री करण्यासाठी गावठी पिस्तूल श्रीरामपूर अहिल्यानगर येथील ससाणे याच्याकडून खरेदी केले. नंतर ते पिस्तूल त्याने काळे आणि जाधव याच्या मार्फत गांधिले याला विक्री केले. ४५ हजार रुपयात हे पिस्तूल गांधिलेने विकत घेतले होते. दरम्यान, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकातील कर्मचारी सुरेंद्र जगदाळे आणि पवन भोसले यांना या पिस्तूलाची खबर मिळाली. त्यांनी विशाल गांधिले याच्यासह पाच जणांना बेड्या ठोकल्या.

असे अडकले जाळ्यात

पोलिस कर्मचारी जगदाळे यांना हे पिस्तूल गायकवाड याच्याकडे असल्याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेतले त्यावेळी त्याने सांगितले ते पिस्तूल विजय उर्फ चाँदला विक्री केले. त्याला पकडताच त्याने जॉन उर्फ रिंक्या जाधव याला दिल्याचे सांगितले. त्याच्या चौकशीत त्याने विशाल गांधिलेला विक्री केल्याचे सांगितले. पोलिसांनी आपला मोर्चा गांधिलेकडे वळविला. त्याला बाणेर परिसरातून ताब्यात घेतले. त्याने हे पिस्तूल निसर्ग गांधिले याच्याकडे ठेवले होते. त्याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले. त्यानंतर या सर्वांना पोलिसांनी अटक केली.

Web Title: Police have arrested an aspiring candidate for the post of corporator

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 01:10 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.