Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साताऱ्यातील ‘त्या’ महिलेच्या खुनाचा लागला छडा; धक्कादायक कारणही आलं समोर

महिलेच्या खून प्रकरणाचा उलगडा सातारा तालुका पोलिसांनी अवघ्या बारा तासात केला आहे. पोलिसांनी आरोपीला रात्री पुणे येथील स्वारगेट मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 08, 2025 | 06:03 PM
Pimpri Crime : काळेवाडीत सात जणांच्या टोळक्याचा राडा; आधी दोघांवर कोयत्याने वार केले अन् नंतर...

Pimpri Crime : काळेवाडीत सात जणांच्या टोळक्याचा राडा; आधी दोघांवर कोयत्याने वार केले अन् नंतर...

Follow Us
Close
Follow Us:

सातारा : शिवथर येथील खून प्रकरणाचा उलगडा सातारा तालुका पोलिसांनी अवघ्या बारा तासात केला आहे. विवाहितेचा खून गावातील अक्षय रामचंद्र साबळे (वय २८) याने केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी त्याला रात्री पुणे येथील स्वारगेट मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपण हा खून केल्याची कबुली दिली. सातारा तालुका पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून संशयिताला ताब्यात घेतले. अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

शिवथर (ता. सातारा) येथे सोमवारी (दि. ७) दुपारच्या दरम्यान अज्ञात व्यक्तींने एका महिलेचा दिवसाढवळ्या गळा चिरून खून केला होता. याबाबत सातारा तालुका पोलिस स्टेशनला ही बातमी समजल्यानंतर तातडीने अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, उपअधीक्षक राजीव नवले, सातारा तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक निलेश तांबे, पोलिस उपनिरीक्षक नेवसे यांनी तातडीने घटनास्थळी भेट घेऊन अवघ्या बारा तासाच्या आत खून करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

पूजा जाधव हिचे घर शिवथर गावापासून मालगाव रस्त्याला एक किलोमीटर अंतरावर होते. सासू-सासरे शेतामध्ये कामासाठी गेले हाेते. पती प्रथमेश लहान मुलगा शाळेमध्ये सोडून कामाला निघून गेला होता. याचाच फायदा घेऊन दुपारच्या वेळी घरामध्ये कोणी नसताना अक्षय रामचंद्र साबळे याने घरामध्ये घुसून पूजा जाधव हिचा कटरच्या साह्याने गळा चिरुन खून केला व तो तेथून पसार झाला होता.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर, उपअधीक्षक राजीव नवले, पोलिस निरीक्षक नीलेश तांबे, पोलिस उपनिरीक्षक नेवसे, पोलीस उपनिरीक्षक मोर्डे, पीएसआय गुरव, हवालदार ‘ मालोजी चव्हाण, ए. एस. माने, आर. जी. गोरे, कुमठेकर यांनी खूनाचा तपास करून जलद गतीने यंत्रणा राबवून खुनी ताब्यात घेतला.

पळून जाण्यासाठी टाकत होता दबाव

सातारा तालुका पोलिस स्टेशनने दोन टीम (डिबी पथक) तयार करून मोबाईलच्या लोकेशनवरून संशयीतास पुणे येथील स्वारगेट एसटी स्टँडवरून रात्री साडे अकराच्या दरम्यान ताब्यात घेतले. पाेलिस त्याला सातारा तालुका पोलिस स्टेशनला घेऊन आले. खुनाबाबत त्याला माहिती विचारली असता त्याने खून केल्याची कबुली दिली. अक्षय संबंधित विवाहितेच्या मागे पळून जाण्यासाठी सातत्याने दबाव टाकत होता. तिने नकार दिल्याने त्याने तिचा गळा चिरून खून केल्याचे पोलिस चौकशीत सांगितले.

Web Title: Police have arrested the accused who murdered a woman in satara taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 06:03 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Satara Crime
  • Satara Police

संबंधित बातम्या

अवैध शस्त्रांविरुद्ध नांदेडमध्ये मोठी कारवाई; ७ अग्निशस्त्रे, ७६ जिवंत काडतुसे जप्त; १७ आरोपी जेरबंद
1

अवैध शस्त्रांविरुद्ध नांदेडमध्ये मोठी कारवाई; ७ अग्निशस्त्रे, ७६ जिवंत काडतुसे जप्त; १७ आरोपी जेरबंद

सातारा जिल्हा शासकीय रूग्णालयात मृतदेहांची अदलाबदल; नातेवाईकांचा व्यवस्थापनावर संताप
2

सातारा जिल्हा शासकीय रूग्णालयात मृतदेहांची अदलाबदल; नातेवाईकांचा व्यवस्थापनावर संताप

Accident News : दिवे घाटात भीषण अपघातात बाप-लेकीचा मृत्यू; मुलगा गंभीर जखमी
3

Accident News : दिवे घाटात भीषण अपघातात बाप-लेकीचा मृत्यू; मुलगा गंभीर जखमी

Mira Bhayander : रक्षक होतायत भक्षक ! वाहतूक पोलिसांकडूनच हप्त्याची मागणी; वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह एपीआयवर गुन्हा
4

Mira Bhayander : रक्षक होतायत भक्षक ! वाहतूक पोलिसांकडूनच हप्त्याची मागणी; वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह एपीआयवर गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.