Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिंजवडी येथील आयटी कंपनी रातोरात बंद; पोलिसांनी ‘थिंकटेक’च्या मालकाला नाशिकमधून पकडले

हिंजवडीतील थिंकटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला रातोरात टाळे ठोकून शेकडो आयटी अभियंत्यांना बेरोजगार करणाऱ्या कंपनीच्या मालकाला अखेर अटक करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 04, 2026 | 11:45 AM
हिंजवडी येथील आयटी कंपनी रातोरात बंद; पोलिसांनी 'थिंकटेक'च्या मालकाला नाशिकमधून पकडले

हिंजवडी येथील आयटी कंपनी रातोरात बंद; पोलिसांनी 'थिंकटेक'च्या मालकाला नाशिकमधून पकडले

Follow Us
Follow Us:

पिंपरी : हिंजवडीतील थिंकटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला रातोरात टाळे ठोकून शेकडो आयटी अभियंत्यांना बेरोजगार करणाऱ्या कंपनीच्या मालकाला अखेर अटक करण्यात आली आहे. कंपनीचे सीईओ हर्षल ठाकरे यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्या, तरी संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, हर्षल ठाकरे यांनी सुमारे 700 आयटी अभियंत्यांकडून लॅपटॉप डिपॉझिटच्या नावाखाली प्रत्येकी 15 हजार रुपये घेतले होते. याशिवाय जानेवारी 2026 पासून कर्मचाऱ्यांचे पगारही थकवण्यात आले होते. अचानक कंपनी बंद करून व्यवस्थापन फरार झाल्याने शेकडो कर्मचारी आर्थिक संकटात सापडले.

या प्रकरणी पीडित आयटी अभियंत्यांनी 21 मे रोजी हिंजवडी पोलिसांकडे तक्रार दिली होती. मात्र, गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. माध्यमांनी हा विषय उचलून धरल्यानंतर पोलिसांनी “आरोपीचा शोध सुरू आहे” असे स्पष्टीकरण दिले. परंतु आरोपीचा मोबाईल सुरू असूनही त्याला अटकेपासून संरक्षण दिले जात असल्याचा आरोपही समोर आला. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी कंपनीचे सीईओ हर्षल ठाकरे, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट हेड ध्रुवील पारेख, एचआर प्रमुख सौम्या सिंग तसेच इतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, फिर्यादीमध्ये तक्रारदार आयटी अभियंते उशिरा तक्रार देण्यासाठी आले असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी पोलिसांनी पीडितांवरच अप्रत्यक्षपणे ठपका ठेवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात केवळ 11 लाख 25 हजार रुपयांच्या फसवणुकीचा उल्लेख केला आहे. प्रत्यक्षात 700 कर्मचाऱ्यांकडून जमा केलेले डिपॉझिट आणि अनेक महिन्यांचे थकीत वेतन विचारात घेतल्यास फसवणुकीची रक्कम कोट्यवधी रुपयांमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गुन्ह्याची तीव्रता कमी दाखवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय बळावला आहे.

हे सुद्धा वाचा : पैशाच्या जुन्या वादातून रक्तरंजित संघर्ष, करडे घाटातील गोळीबारात सराईताची हत्या; एक जण गंभीर जखमी

दरम्यान, आरोपी हर्षल ठाकरे याला अटक झाल्यानंतर आता पोलिसांनी सखोल आणि निष्पक्ष तपास करून संपूर्ण आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आणावा, तसेच फसवणुकीमुळे बेरोजगार झालेल्या शेकडो आयटी अभियंत्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी पीडित कर्मचाऱ्यांकडून होत आहे. या प्रकरणातील पोलिसांच्या भूमिकेबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरेही तपासातून स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Police have arrested the owner of a thinktech company in hinjewadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

लग्न लावून दिले नाही म्हणून संताप; वडील आणि सख्ख्या भावाचा दगडाने ठेचून केला खून
1

लग्न लावून दिले नाही म्हणून संताप; वडील आणि सख्ख्या भावाचा दगडाने ठेचून केला खून

‘विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला…’, पंढरीच्या वारीची तयारी सुरू; संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर
2

‘विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला…’, पंढरीच्या वारीची तयारी सुरू; संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर

एसटी कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीगृहाची दयनीय अवस्था! मुंबई सेंट्रल आगारातील सुविधांवर प्रश्नचिन्ह, चालक-वाहक हैराण
3

एसटी कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीगृहाची दयनीय अवस्था! मुंबई सेंट्रल आगारातील सुविधांवर प्रश्नचिन्ह, चालक-वाहक हैराण

महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर अटक; आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणाला वेग
4

महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर अटक; आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणाला वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.