Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! तरुणीला जबरदस्ती वेश्या व्यवसायात ढकलले; बुधवार पेठेत नेले अन्…

एका अल्पवयीन मुलीला पुण्यातील बुधावर पेठेत जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 13, 2025 | 09:05 PM
धक्कादायक! तरुणीला जबरदस्ती वेश्याव्यवसायात ढकलले

धक्कादायक! तरुणीला जबरदस्ती वेश्याव्यवसायात ढकलले

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : बांगलादेशमधून कामाच्या निमित्ताने भारतात आणलेल्या एका अल्पवयीन मुलीला पुण्यातील बुधावर पेठेत जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिला ब्युटी पार्लरमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. मात्र, नंतर दलाल व्यक्तींनी तिला बुधवार पेठेतील कुंटणखान्यात ठेवले. तसेच, वेश्याव्यवसायासाठी जबरदस्तीही केली. नकार दिल्यानंतर या तरुणीला पट्ट्याने मारहाण करण्यात आली. एका सामाजिक संस्थेने हा प्रकार समोर आणत पोलिसांच्या मदतीने तरुणीची सुटका केली आहे.

याप्रकरणी अभिषेक प्रकाश संथेबेन्नूर (वय २२, कर्नाटक) व तमन्ना मुख्तार शेख (रा. बांगलादेश) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर रकीब खान फरार असून, याप्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा (पीटा), बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण प्रतिबंध कायदा (पोक्सो), पारपत्र अधिनियमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी १७ वर्षीय असून, तिची व आरोपी तमन्नाची ओळख आहे. तिने तिला भारतात नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. तेथून तिला बेंगलोरमध्ये आणले. पण, त्याठिकाणी तिच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यावसाय करून घेण्यात आला. नंतर तिला पुण्यात ब्युटी पार्लरमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखविले. पुण्यात आल्यानंतर मात्र आरोपींनी तिला वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले. तिला बुधवार पेठेत देखील नेले. पण, तिने नकार दिला. तेव्हा तमन्ना आणि अभिषेकने तरुणीला सहकारनगर भागातील एका खोलीत डांबून ठेवले. वेश्याव्यवसाय करण्यासाठी धमकाविले. तिने नकार दिल्यानंत तिला पट्ट्याने मारहाण केली.

तरुणीने बांगलादेशी पोलिसांना या घटनेची माहिती मोबाइलवरुन दिली. बांगलादेशातील पोलिसांनी देशपातळीवर काम करणाऱ्या ‘फ्रीडम’ या सामाजिक संस्थेशी संपर्क साधला. समाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सहकारनगर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राहुल गौड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुरेखा चव्हाण व पथकाने शुक्रवारी रात्रभर शोधमोहिम राबविली. शनिवारी दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून तरुणीची सुटका करण्यात आली, असे पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले.

१५ दिवसात आधार कार्ड..!

तमन्ना मुळची बाहेरची असल्याचा संशय पोलिसांना आहे. धक्कादायक म्हणजे, या बांगलादेशी तरुणीला भारतात आणल्यानंतर तिचे केवळ १५ दिवसात या आरोपींनी भारतीय आधार कार्ड काढल्याचेही प्राथमिक तपासातून समोर आले आहे. या दोघांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडे तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. अभिषेक हा तमन्नाचा ओळखीचा असून, तो एका हॉटेलमध्ये काम करतो.

Web Title: Police have arrested two people for forcing a young woman into prostitution

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2025 | 09:05 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

फोन करुन प्रेयसीला भेटायला बोलावले, नंतर गायरानामध्ये नेले अन्…; सासवडमधील धक्कादायक प्रकार
1

फोन करुन प्रेयसीला भेटायला बोलावले, नंतर गायरानामध्ये नेले अन्…; सासवडमधील धक्कादायक प्रकार

Karjat News : आत्महत्या की घातपात? दोन्ही अपत्ये मुली म्हणून सासरी जाच, मृतदेहावर संशयास्पद खुणा; पीडितेच्या वडिलांचा आरोप
2

Karjat News : आत्महत्या की घातपात? दोन्ही अपत्ये मुली म्हणून सासरी जाच, मृतदेहावर संशयास्पद खुणा; पीडितेच्या वडिलांचा आरोप

आधी महिलेने पोटच्या मुलीचा गळा दाबला, अन् नंतर मुलाला…; मंचरमधील धक्कादायक प्रकार
3

आधी महिलेने पोटच्या मुलीचा गळा दाबला, अन् नंतर मुलाला…; मंचरमधील धक्कादायक प्रकार

मनपाचे झोन कार्यालय लाचखोरीने हादरले! बांधकाम कामगार प्रमाणपत्रासाठी 550 रुपयांची लाच घेताना कर्मचारी अटकेत
4

मनपाचे झोन कार्यालय लाचखोरीने हादरले! बांधकाम कामगार प्रमाणपत्रासाठी 550 रुपयांची लाच घेताना कर्मचारी अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.