Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तूप विक्रीच्या बहाण्याने चोरी; दोन महिलांना रंगेहात पकडले

तूप विक्रीसाठी आल्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून देवघरातील देवीच्या अंगावरील दागिने चोरून पळ काढणाऱ्या दोन महिलांना ग्रामस्थांनी सतर्कतेने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 29, 2025 | 03:27 PM
तूप विक्रीच्या बहाण्याने चोरी; दोन महिलांना रंगेहात पकडले

तूप विक्रीच्या बहाण्याने चोरी; दोन महिलांना रंगेहात पकडले

Follow Us
Follow Us:

शिक्रापूर : जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथे तूप विक्रीसाठी आल्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून देवघरातील देवीच्या अंगावरील दागिने चोरून पळ काढणाऱ्या दोन महिलांना ग्रामस्थांनी सतर्कतेने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. गीता रमेश एकणार आणि दुर्गा संजय भिसे (दोघी रा. कळंब, ता. यवतमाळ) अशी या चोर महिलांची नावे आहेत. ही घटना शनिवारी दुपारी घडली आहे.

जनाबाई उमाप या घरात जेवण करत असताना दोन अनोळखी महिला तूप विक्रीसाठी आल्या. त्यांनी तूप घ्यायचे आहे का, असे विचारत घरात प्रवेश केला आणि “देवाचे दर्शन घेऊ द्या” असे सांगत देवघराजवळ गेल्या. काही क्षणांतच त्या गडबडीत घराबाहेर पडल्या. यानंतर जनाबाई यांनी देवघर तपासले असता देवीच्या अंगावरील दागिने गायब असल्याचे लक्षात आले.

जनाबाई यांनी तात्काळ पोलीस पाटील चित्रकला इंगवले यांना माहिती दिली. त्यानंतर महेंद्र उमाप, राहुल क्षीरसागर, महेश मासळकर, मच्छिंद्र उमाप, महेश नवगिरे, अजित पवार या युवकांच्या मदतीने गावात दोघींचा शोध घेण्यात आला. महिलांना संशयास्पद स्थितीत गाठण्यात आले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलीस पाटील इंगवले यांनी महिलांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चोरी केलेले दागिने सापडले. त्यानंतर ग्रामस्थांनी महिलांना रंगेहात पकडून शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात दिले. जनाबाई दिनकर उमाप (रा. जातेगाव बुद्रुक) यांच्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात गीता रमेश एकणार (वय ३५) आणि दुर्गा संजय भिसे (वय ३५) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गणेश करपे करीत आहेत.

Web Title: Police have arrested two women for stealing jewelry and taken action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2025 | 03:25 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • Pune Crime
  • Pune Theft

संबंधित बातम्या

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; सिया-चेतनचा डाव उघड, केतनला परराज्यात नेऊन…
1

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; सिया-चेतनचा डाव उघड, केतनला परराज्यात नेऊन…

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…
2

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…

पुरंदरमध्ये खळबळ! धमकी देत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; हॉटेलमध्ये नेले अन्…
3

पुरंदरमध्ये खळबळ! धमकी देत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; हॉटेलमध्ये नेले अन्…

रुग्णालयावर कारवाई न करण्यासाठी २० लाखांची मागणी; लाच घेताना महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
4

रुग्णालयावर कारवाई न करण्यासाठी २० लाखांची मागणी; लाच घेताना महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.