Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाघोलीतून आणखी एक ड्रग्ज रॅकेट उघड, 6 जणांना ठोकल्या बेड्या; 34 लाखांचे एमडी पकडले

वोघीली परिसरातून पुन्हा एकदा ड्रग्ज रॅकेट उघडकीस आले असून, दोन वेगवेगळ्या कारवाईत पोलिसांनी तब्बल सहा जणांना अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 04, 2026 | 01:25 PM
वाघोलीतून आणखी एक ड्रग्ज रॅकेट उघड, 6 जणांना ठोकल्या बेड्या; 34 लाखांचे एमडी पकडले

वाघोलीतून आणखी एक ड्रग्ज रॅकेट उघड, 6 जणांना ठोकल्या बेड्या; 34 लाखांचे एमडी पकडले

Follow Us
Follow Us:

पुणे : वोघीली परिसरातून पुन्हा एकदा ड्रग्ज रॅकेट उघडकीस आले असून, दोन वेगवेगळ्या कारवाईत पोलिसांनी तब्बल सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल ३४ लाखांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. लोणीकंदमधील काटेवाडी फाटा व पेरणे फाटा या परिसरात कारवाया करण्यात आल्या आहेत.

 

पुंपाजी जयचंद्र चौधरी (वय ४०, रा. बुलढाणा), राजेंद्र केरू टेळे (वय ३५, रा. शिक्रापूर), करन सचिन मोहिते (वय २१, सणसवाडी), भागीरथसिंग सज्जनसिंग राजपुरोहित (वय २८), आदिनाथ दशरथ शिर्के (वय २९, मांजरी) आणि योगेश लक्ष्मण चव्हाण (वय ३७, रा. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई परिमंडळ सातचे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सुनिता रोकडे, उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे तुकाराम सुरवसे, पोलिस अंमलदार कैलास सांळुके, स्वप्नील जाधव व त्यांच्या पथकाने केली आहे.

शहरातील पसरलेले ड्रग्जचे जाळे मोडून काढण्यासाठी पोलिसांकडून जोरदार कारवाई सुरू आहे. मात्र, हे जाळे उपनगरांत देखील मोठ्या प्रमाणात पसरल्याचे दिसत आहे. विशेषत: महामार्गालगत असलेल्या वाघोली, लोहगाव, लोणीकंद, लोणी काळभोर अशा परिसरात या तस्करांनी अड्डाच थाटल्याचे दिसत आहे. दरम्यान, वाघोली पोलिसांना पहिल्या कारवाईत काटेवाडी फाटा येथे पुंपाजी चौधरी याच्याबाबत माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे साडे चार लाखांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. त्याच्यावर लोणीकंद पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे.

दुसऱी कारवाई पेरणे फाटा येथे करण्यात आली आहे. करण मोहिते व राजेंद्र टेळे यांच्याबाबत माहिती मिळाली होती. या माहितीवरून दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ११ लाख ८३ हजारांचे एमडी जप्त केले. त्यांच्याकडे केलेल्या तपासानंतर भागीरथसिंग आणि आदिनाथ शिर्के यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडूनही सव्वा चार लाखांचे एमडी जप्त करण्यात आले आहे. या आरोपींकडे केलेल्या सखोल तपासातून योगेश चव्हाण याच्याबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला पकडून तब्बल १४ लाख ५० हजारांचे एमडी जप्त केले आहे.

वाघोली तसेच लोणीकंद परिसरात राहून किरकोळ स्वरूपात हे ड्रग्ज विकत असल्याचे समोर आले आहे. आता पिणाऱ्या व हे एमडी विक्री करणाऱ्या या आरोपींना कोण पुरवत होते, याची साखळी शोधण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणात दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत. त्याचा अधिक तपास वाघोली पोलिस करत आहेत.

हे सुद्धा वाचा : कौटुंबिक वादातून सासऱ्याने केला सुनेचा खून; भिंतीवर डोकं आपटलं अन्…

Web Title: Police have busted a drug racket in wagholi area and arrested 6 people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 01:25 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • Drugs Case

संबंधित बातम्या

MPSC Student Protest : मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली आंदोलनाची दखल; आयोगाच्या अध्यक्ष-सदस्यांवर कारवाईसाठी मोठी शिफारस
1

MPSC Student Protest : मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली आंदोलनाची दखल; आयोगाच्या अध्यक्ष-सदस्यांवर कारवाईसाठी मोठी शिफारस

काँग्रेस कार्यालयात घुसून आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड, ‘पोलिसांनी गुन्हेगारांसारखी वागणूक दिली’; NSUIचा गंभीर आरोप
2

काँग्रेस कार्यालयात घुसून आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड, ‘पोलिसांनी गुन्हेगारांसारखी वागणूक दिली’; NSUIचा गंभीर आरोप

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
3

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

अटक केलेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ सोडा, अन्यथा वर्षा बंगल्याला…; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारला इशारा
4

अटक केलेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ सोडा, अन्यथा वर्षा बंगल्याला…; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.